fbpx
4.4 C
London
Friday, January 27, 2023

माझा देश [भारत] मराठी निबंध | Maza desh marathi nibandh

Maza desh marathi nibandh : मित्रानो आपला देश भारताचा इतिहास खूप प्राचीन आहे. एकेकाळी भारत हा विश्वगुरू होता, आपल्या देशात प्राचीन काळात मोठमोठे साधू संत होऊन गेलेत. 

आजच्या ला लेखात आपण Maza desh nibandh मिळणार आहोत. याला तुम्ही माझा देश भारत  किंवा भारत माझा देश निबंध म्हणूनही वापरू शकतात. तर चला सुरू करूया.. 


Maza desh

माझा देश मराठी निबंध | majha desh nibandh  (200 शब्द)

माझ्या देशाचे नाव भारत आहे. भारत हा एक विशाल देश आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जगात सातव्या क्रमांकावर आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारताची राजधानी दिल्ली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकतान्त्रिक देश आहे म्हणजेच भारतात सत्ता ही जनतेच्या हातात आहे. जनतेद्वारे निवडलेले प्रतिनिधी देश चालवतात. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. भारतात कोणत्याही धर्माचे लोक राहू शकतात. आपल्या देशात सर्वांना समान अधिकार आहे.भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. हा पर्वत खूप विशाल व उंच आहे. हिमालयातून भारतातील बऱ्याच नद्या उगम पावतात. आपल्या देशात गंगा, यमुना, तापी, गोदावरी, नर्मदा ई अनेक नद्या वाहतात. पण भारतात गंगेच्या पाण्याला खूप महत्त्व आहे. गंगा भारतीय संस्कृतीत सर्वात पवित्र मानली जाते. भारतात अनेक प्रदेश आहेत. जेथे वेगवेगळया जाती धर्माचे लोक राहतात. पंजाब प्रदेशात शीख लोक राहतात, अनेक राज्यांमध्ये मुस्लिम लोक बहुसंख्य आहेत. भारतात प्रत्येक प्रदेशामध्ये भाषा ही बदलत जाते. मराठी, नेपाळी, पंजाबी, तमिळ, तेलगू, मल्याळम, गुजराती, बंगाली, हिंदी, काश्मिरी, मणिपुरी, उडिया यासारख्या 20 पेक्षा जास्त प्रमुख भाषा भारतात बोलल्या जातात.भारताचा इतिहास सुद्धा अतिशय प्राचीन आहे. भारतावर आधुनिक व मध्ययुगीन काळात अनेक विदेशी शासकांनी आक्रमण देखील केले. पूर्वी भारत ‘सोन्याची चिमणी’ म्हणून ओळखला जायचा. पण मुघल आणि इंग्रजांनी भारतात मोठ्या प्रमाणात लूट केली. पण तरीही आज भारत जगातील राजनीतित आपले उच्च स्थान मिळवून आहे. भारताची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. चाहुमुखी प्रगती मुळे भारत आज आशियामध्ये महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करीत आहे.माझा देश भारत | Maza Desh Nibandh (300 शब्द)

भारत आज लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमंकाचा देश आहे. भारताची लोकसंख्या 135 कोटी पेक्षा जास्त आहे. भारतात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध आणि इतर सर्व धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात. वर्तमान काळात भारत जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतातील 70% लोकसंख्या गावामध्ये राहते. प्रत्येक भारतीयाप्रमाणे मला देखील माझा देश खूप आवडतो. भारत हा तीनही दिशांनी समुद्राने वेढलेला आहे. पूर्वेला बंगालचा उपसागर, दक्षिणेला हिंदी महासागर, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. भारत आपली संस्कृती आणि सभ्यतेसाठी विश्र्वभरात ओळखला जातो. भारतातील 77% लोकसंख्या हिंदू आहे. भारताला इंग्रजीत इंडिया म्हंटले जाते. इंडिया हे नाव सिंधू नदीवरून ठेवण्यात आलेले आहे. भारतात खूप साऱ्या भाषा बोलल्या जातात. मराठी, नेपाळी, पंजाबी, तमिळ, तेलगू, मल्याळम, गुजराती, बंगाली, हिंदी, काश्मिरी, मणिपुरी, उडिया यासारख्या 20 पेक्षा जास्त प्रमुख भाषा भारतात बोलल्या जातात. भारताच्या शेजारी पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, भूतान, इंडोनेशिया, चीन, मलेशिया, श्रीलंका ई. देश आहेत. भारतातील ताजमहल हे जगातील सात आश्चर्यामध्ये समाविष्ट आहे. या शिवाय भारतात अनेक ऐतिहासिक आणि सुंदर पर्यटन स्थळे आहेत. दरवर्षी लाखों विदेशी लोक भारतात येतात. भारतात मोठ मोठी प्राचीन मंदिरे आहेत. या मंदिरांची वस्तु कला आणि सौन्दर्य अनुभवण्यासाठी भारतसह जगभरातील लोक येतात. भारताचे राष्ट्र गीत ‘जन गण मन’ आहे ज्याला रवींद्रनाथ टागोरांनी लिहिले आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली आहे. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् आहे ज्याला बकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले आहे. भारताचा झेंडा तीन रंगांनी बनलेला आहे. ज्यात केशरी, पांढरा आणि हिरवा समाविष्ट आहेत. तिरंग्याच्या मधोमध 24 आरे असलेले अशोक चक्र आहे. भारत एक लोकशाही देश आहे. आपल्या देशात जनतेद्वारे निवडलेले प्रतिनिधी देश चालवतात. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. भारतात कोणत्याही धर्माचे लोक राहू शकतात. आपल्या देशात सर्वांना समान अधिकार आहे. इतकी विविधता असताना देखील भारतीयांमध्ये आपापसातील प्रेम आणि बंधुत्वाची भावना कायम आहे. वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या भाषा असतांनाही एकामेकांसोबत न भांडत प्रत्येक धर्माचा सन्मान करणे आपली भारतीय संस्कृति शिकवते आणि हेच अनेकतेत एकतेचे प्रतीक आहे. खरोखर आपला भारत देश महान आहे. व प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान वाटला पाहिजे. जय हिंद.माझा देश मराठी निबंध | Maza Desh Marathi (500 शब्द)

माझ्या देशाचे नाव भारत आहे. भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने संपूर्ण जगात सातव्या क्रमांकाचा देश आहे. भारतात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध इत्यादी सर्व धर्माचे लोक सोबत राहतात. भारताला भारत, इंडिया, हिंद, हिंदुस्तान इत्यादी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. माझ्या देशाला संपूर्ण जगात विविधतेतील एकता असलेला देश म्हणून ओळखले जाते. कारण जेव्हा केव्हा देशावर काही संकट येते तेव्हा आम्ही सर्व भारतीय सोबत मिळून त्या समस्येचा सामना करतो.माझ्या भारत देशात 200 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. भारताच्या भौगोलिक परिस्थितीत देखील फार विविधता आहे. जसे काही ठिकाणी बर्फ असतो तर काही ठिकाणी वाळवंट, कोठे घनदाट जंगल असते तर कोठे मोकळे मैदान, काही ठिकाणी पर्वते असतात तर काही ठिकाणी खोल खोल दऱ्या. भारत तीन मुख्य ऋतु येतात. अशा पद्धतीने भारताच्या भौगोलिक परिस्थितीत अनेक विविधता आहे.तसे पाहता प्रत्येक देशात कोणत्या न कोणत्या शूर वीराने जन्म घेतलेला असतो. परंतु भारत एकमात्र असा देश आहे जेथे जगातील सर्वाधिक क्रांतिकारी व शूर वीर जन्मले, ज्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता देशाची सभ्यता आणि संस्कृती चे रक्षण केले. या वीरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रज व अनेक विदेश आक्रमकांशी लढा दिला. भारताची संस्कृती अतिथी देवो भव वाली आहे. आपल्या देशात अतिथीचे सन्मानाने स्वागत गेले जाते. म्हणूनच भारताला लुटणाऱ्या इंग्रज व मुघलांचे देखील भारतीयांनी आदराने स्वागत केले होते. याशिवाय माझा देश भारत त्याची प्राचीन वास्तुकला, शिल्पकला, नृत्य, संगीत इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. आपण भारतीयांनी 4000 वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या हडप्पा आणि सिंधू संस्कृती ला देखील महत्त्व दिले. आपल्या पूर्वजांनी आपल्याला भारतीय संस्कृतीचा आदर व सन्मान करायला शिकवले आणि म्हणूनच आज आपण आपल्या संस्कृतीला महत्त्व देत आहोत. भारतात प्रत्येक धर्माचे सण उत्सव साजरे केले जातात. जरी भारताची बहुसंख्य लोकसंख्या हिंदू आहे तरी भारतात दिवाळी सोबत ईद, क्रिसमस इत्यादी सण देखील उत्साहाने साजरे केले जातात. भारत देशाला कृषिप्रधान देश म्हणूनही ओळखले जाते कारण भारतात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय केला जातो. आपल्या देशातील मोठ्या प्रमाणात लोकसंख्या गावाकडे राहते व शेती आणि पशुपालन हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. आपल्या देशात शेतकऱ्यांना सन्मान दिला जातो. प्रत्येक शेतकरी गहू, मका, बाजरी, ऊस, कापूस, तांदूळ, ज्वारी इत्यादीचे पीक घेतो. भारताच्या एकूण जमिनीच्या 51% भागावर शेती केली जाते आणि भारताचे 52% पेक्षा जास्त लोक शेती करतात.  शेतीशिवाय विज्ञानाच्या क्षेत्रात ही भारत पुढे आहे. एकाहून एक महान शास्त्रज्ञ भारतात जन्मले आहे व त्यांचे शोध जगभरात प्रसिद्ध आहेत. भारतीय शास्त्रज्ञांमध्ये श्रीनिवास रामानुजन, जगदीश चन्द्र बसु, सी व्ही रमण, होमी जहांगीर भाभा, अब्दुल कलाम इत्यादींचे नाव प्रसिद्ध आहे. या सर्व शास्त्रज्ञांनी खगोल, चिकित्सा आणि भौतिक विज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. या शास्त्रज्ञाच्या प्रयत्नांमुळेच आज भारत एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून उभे आहे. भारताजवळ अनेक मिसाईल आणि परमाणु बॉम्ब आहेत. परंतु आज पर्यंत भारताने कधीही या हत्यारांचा दुरुपयोग केलेला नाही. या गोष्टीचा सर्व भारतीयांना अभिमान वाटायला हवा.आधीच्या काळात भारत सोन्याची चिडिया म्हणून ओळखला जायचा. भारतीय व्यापारी जगभरात आपले पदार्थ विकत असत. परंतु मध्ययुगात आलेले मुघल व आधुनिक युगातील इंग्रज यांनी भारताला मोठ्या प्रमाणात लुटले. त्यांच्या आक्रमणामुळे सोन्याची चिडिया असलेला भारत अतिशय निर्धन झालं. परंतु आज पुन्हा एकदा भारतीयांची मेहनत व इमानदारी भारताला प्रगतीच्या मार्गावर नेत आहे. भारताच्या या पवित्र भूमीवर जन्म मिळाल्याबद्दल आपण खरोखर भाग्यवान आहोत आणि या भूमीच्या रक्षणासाठी आपण नेहमी तत्पर राहायला हवे.

माझ्या स्वप्नातील भारत निबंधतर मित्रांनो हे होते माझा देश भारत – My country essay In Marathi या विषयावर लिहिलेले मराठी निबंध तुम्हाला हे निबंध कसे वाटले आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद…

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here