fbpx
2.9 C
London
Saturday, January 28, 2023

माझी आवडती मैत्रीण निबंध | Mazi avadti maitrin in marathi

Mazi Aavadti Maitrin in Marathi: शाळा कॉलेज मध्ये आपले अनेक मित्र मैत्रिणी असतात. परंतु एखादा मित्र अथवा मैत्रिण आपली प्रिय असते. 

म्हणून आजच्या या लेखात मी तुमच्यासाठी माझी आवडती मैत्रीण या विषयावर मराठी निबंध घेऊन आलो आहे.  माझी आवडती मैत्रीण निबंध


माझी आवडती मैत्रीण निबंध | Mazi avadti maitrin Nibandh Marathi

असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीचे मित्र राहत नाही, तो सर्वात दुर्भाग्यशाली असतो. आणि असेही म्हणतात की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. खरे मित्र मैत्रीण नेहमी एकमेकांचे सुखदुःख वाटून घेतात. खरे मित्र बनवले जात नाहीत तर ते स्वभावानेच बनून जातात. जीवनाच्या प्रवासात माझी भेट अशाच एका खऱ्या मैत्रिणीशी झाली. माझ्या प्रिय मैत्रिणीचे नाव आहे निकिता. निकिता आणि मी एकाच वर्गात शिकतो. आम्ही दोघी जवळपास पाचव्या इयत्तेपासून एकामेकांच्या प्रिय मैत्रिणी आहोत. निकिता चे घर आमच्या घरापासून थोड्या अंतरावर आहे. पण तरीही ती दररोज शाळेत जाण्यासाठी माझी वाट पाहते. आणि मग मी आली की आम्ही दोघे सोबतच शाळेत जातो. निकिता आणि मी एकाच बाकावर बसतो. परंतु शाळेत असताना आम्ही विनाकारण कधीही गप्पा मारीत नाहीत. शिक्षक काय शिकवता त्याकडे आमचे संपूर्ण चित्त असते. घरी आल्यावर निकिता आणि मी आमच्या घराच्या गच्चीवर थोडे फार खेळतो व सोबत बसूनच अभ्यास करतो. निकिता चे वडील सरकारी कार्यालयात कामाला आहेत. ज्यामुळे आम्ही दोघीही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत. निकिता एका खऱ्या मैत्रिणीचे कर्तव्य पुरेपूर सांभाळते. ती मला प्रत्येक ठिकाणी मदत करते. मी देखील तिला काहीही काम असले कि साहाय्य करते. निकिताचा स्वभाव खूप शांत आहे. आमच्या वर्गातील मुलींमध्ये सर्वात हुशार विद्यार्थीनी माझी मैत्रीण निकिताच आहे. निकिता विनाकारण कोणाला त्रास देत नाही, आजवर तिचे कोणाशी भांडण देखील झालेले नाही आहे. अभ्यासात हुशार आणि स्वभावाने प्रेमळ असल्याने वर्गातील सर्वच मैत्रिणी तिचा सन्मान करतात. जर मला अभ्यासात काही अडचण आली तर मी सर्वात आधी निकिताला विचारते, निकिता माझ्या सर्व समस्यांचे निराकरण करते. अभ्यासाशिवाय निकिता ने खेळांमध्ये देखील प्राविण्य मिळवले आहे. कबड्डी हा तिचा आवडता खेळ आहे. कबड्डी च्या खेळात ती एकदा राज्यस्तरावर देखील खेळून आली आहे. या खेळात तिला अनेक ट्रॉफी आणि पदक प्राप्त झालेले आहेत. एक चांगली मैत्रीण तिला म्हटले जाते, जी आपल्या मैत्रिणीला योग्य सल्ला देऊन चुकीच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करते. निकिता च्या बाबतीत ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे. मला काहीही समस्या असली तर मी सर्वात आधी निकितालाच सांगते आणि ती मला नेहमी योग्य सल्ला देखील देते. आम्ही दोघी एकामेकांचे सर्व रहस्य चर्चा करतो. निकिता माझी मैत्रीण असण्यासोबत खूप चांगली सल्लागार देखील आहे. शेवटी येवढेच सांगू इच्छिते की, मैत्रिणी तर खूप असतात पण खरी मैत्रीण तीच असते जिच्या सोबत राहिल्यावर वेळेचे भान राहत नाही. खऱ्या मैत्रिणीच्या सानिध्यात नेहमी प्रसन्नता, आनंद, प्रेम आणि समाधानाची प्राप्ती होते. ज्या व्यक्तीला खरे मित्र मैत्रीण असतात तो आयुष्य आनंदी आणि प्रसन्न जीवन जगतो. चांगली मैत्रीण हे परमेश्वराने दिलेली एक उपहार आहे.

–समाप्त–तर हा होता माझी आवडती मैत्रीण Majhi avadti maitrin essay in marathi आशा आहे की तुम्हाला हा निबंध आवडला असेल ह्या निबंधला आपल्या इतर मैत्रिणीनसोबतही शेयर करा धन्यवाद. READ MORE:

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here