[माझे स्वप्न] निबंध मराठी Maze Swapna Essay in Marathi

0

My Dream Marathi Essay | maze dhey marathi nibandh

माझे ध्येय / माझे स्वप्न डॉक्टर निबंध maze swapna Doctor nibandh in marathi

प्रत्येक व्यक्ती आयुष्यात काही न काही स्वप्न रचून ठेवतो. त्याला आयुष्यामध्ये काय काय करायचे आहे, काय मिळवायचे आहे आणि काय बनायचे आहे इत्यादी गोष्टीचा प्रत्येक विद्यार्थी विचार करीत असतो. काहींचे स्वप्न इंजिनियर बनायचे असते, काही लेखक तर काही पोलिस व शास्त्रज्ञ बनण्याचे स्वप्न पाहत असतात. मी सुद्धा मला मोठे होऊन काय बनायचे आहे याचा विचार करून ठेवला आहे. माझ्या आयुष्याचे ध्येय डॉक्टर बनायचे आहे व अनेकांचे प्राण वाचवून नवीन जीवन द्यायचे आहे. जरी डॉक्टर देव नसतो तरी त्याच्या हातात जीवन मृत्यूचा निर्णय असतो. जरी डॉक्टर मृत व्यक्तीला जिवंत करू शकत नाही तरी तो कठीण परिस्थितीतून रुग्णांना काढू शकतो. मी लहानपणापासून डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहत आहे. मी पाहिले आहे की काही डॉक्टर फक्त पैशांसाठी आपले काम करतात. परंतु माझ्या जीवनाचे ध्येय डॉक्टर बनून पैसे कमावणे नाही आहे. मला लोकांची मनोभावे सहायता करायची आहे. जे गरीब आहेत व मोठं मोठ्या रोगांनी ग्रस्त आहेत त्याची सेवा मी करणार आहे. आज आपल्या देशासह जगभरात नवनवीन रोग पसरत आहेत. जर मी डॉक्टर बनून या रोगांच्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले तर मला खूप आवडेल. आज आपल्या समाजात खूप सारे असे लोक आहेत ज्यांना कमी वयात अनेक रोगांनी ग्रासले आहे. मी डॉक्टर बनून लोकांना जास्त प्रमाणात दवा औषधी खाण्यापेक्षा व्यायामाचे महत्त्व समजावून सांगेल. आयुर्वेदिक पद्धतीने रोगांना नियंत्रणात करण्यासाठी मी प्रयत्न करेल.मी लहान असताना माझे वडील मला सांगायचे की बेटा तुला मोठे होऊन काहीतरी असे करायचे आहे की तू अधिकाधिक लोकांची मदत करू शकशील. डॉक्टर बनण्याचे स्वप्न मी तेव्हापासून पाहू लागलो. कारण डॉक्टर बनुनच मी रोगांनी ग्रस्त लोकांची सेवा करू शकेल. मी डॉक्टर बनल्यावर कमी पैश्यात अधिकाधिक लोकांची सेवा करेल व समाजाला निरोगी बनवण्यासाठी कार्य करेल.माझे ध्येय इंजीनियर निबंध Maze swapna engineer nibandh in marathi.

मुलांना लहान पानापासून आयुष्यात काहीतरी मोठे बनण्यासाठी प्रेरित केले जाते. व शाळा कॉलेज मध्ये जाणाऱ्या प्रत्येक मुला मुलींचे करीयर विषयी काहीतरी स्वप्न असतेच. मी सुद्धा दुसरी तिसरीत असताना शास्त्रज्ञ बनायचे स्वप्न पहायचो. या नंतर जेव्हा मी टीव्ही पाहू लागलो व मला बाहेरील जगाबद्दल कळू लागले तेव्हा मी अभिनेता होण्याचे स्वप्न पाहू लागलो. परंतु जेव्हा मी 8 वी मध्ये गेलो तेव्हा माझ्या लक्षात आले की माझी खरी आवड तंत्रज्ञानात आहे आणि मी निर्णय घेतला की मला इंजिनिअर बनायचे आहे. आता माझे स्वप्न इंजिनिअर बनणे आहे. तसे पाहता इंजिनीरिंग हे एक विस्तृत करीयर क्षेत्र आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल,सिव्हिल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, केमिकल, बायो केमिकल इत्यादी प्रकार समाविष्ट आहेत. परंतु मला कॉम्प्युटर सायन्स मध्ये अधिक आवड आहे. माझ्या वडिलांनी माझी ही आवड ओळखून मला एक लॅपटॉप आणून दिले आहे. या मध्ये मी बेसिक कोडींग शिकत आहे. जेणेकरून कॉलेज मध्ये गेल्यावर मला कॉम्प्युटर सायन्स जास्त कठीण वाटणार नाही. मी इंजिनिअर बनण्याचे स्वप्न यासाठीही पाहिले आहे कारण मला मोठे होऊन देशाच्या तांत्रिक विकासामध्ये मोठे योगदान द्यायचे आहे आणि यासाठी इंजिनिअरिंग शिवाय दुसरे कोणतेच शिक्षण योग्य नाही. मला कॉम्प्युटर बद्दल आधी पासूनच कुतूहल आहे. व आता तर मी खूपच मन लाऊन त्याचा अभ्यास करीत असतो. मागील दोन वर्षात शालेय परीक्षेत मला संगणक विषयात संपूर्ण वर्गात सर्वात जास्त गुण मिळाले आहे. पुढील शिक्षणासाठी माझे वडील मला उच्च महाविद्यालयात प्रवेश करवून देणार आहेत. त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ते म्हणतात की एक दिवस तू तुझे स्वप्न नक्कीच पूर्ण करशील.

WATCH VIDEO:

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.