मी पक्षी झालो तर निबंध मराठी | mi pakshi zalo tar marathi nibandh

0

mi pakshi zalo tar : मित्रहो आज आपण मी पक्षी झालो तर या विषयावर एक कल्पना निबंध अभ्यासणार आहोत. या निबंधा द्वारे me pakshi zalo tar काय काय करेल या बद्दलची कल्पना करण्यात आली आहे. 



mi pakshi zalo tar


जर मी पक्षी झालो तर.. | me pakshi zalo tar nibandh

आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना पाहून बऱ्याचदा माझ्या मनात विचार येतो की जर मला सुद्धा पंख राहिले असते तर..! किंवा जर मी पक्षी राहिलो असतो तर..! किती मजा आली असती. कोणीही रोकटोक करणारे नसते. स्वच्छंदपणे मी आकाशात उडालो असतो. इच्छेनुसार जेवलो असतो. झाडांच्या फांद्या मध्ये माझी शय्या राहिली असती. माझे जीवन पूर्णपणे स्वतंत्र राहिले असते. थंडगार हवेचा आनंद घेत मी इकडून तिकडे उडालो असतो. 



मनुष्याला कुठेही जाण्यासाठी बस, मोटार गाडी चा प्रवास करावा लागतो. परंतु मी जर पक्षी राहिलो असतो तर मला कोणत्याही वाहनाची आवश्यकता राहिली नसती. उडत उडत निसर्गाचा आनंद घेत मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलो असतो. मला पक्ष्यांचे गाणे खूप आवडते. ते झाडांच्या फांद्यांवर अथवा पर्वतांच्या शिखरावर बसून आपली गाणी गातात. मी पक्षी राहिलो असतो तर मी देखील सुंदर आवाजात गाणे गायिली असते. माझ्या मधुर आवाजाने लोकांना मोहित केले असते. 



पक्ष्यांना कोणत्याही झाडावर बसता येते त्या झाडाची फळे खाता येतात. मी जर पक्षी राहिलो असतो तर मी सुद्धा गोड गोड फळांचा आस्वाद घेतला असता. आणि या फळांना खाण्यासाठी मला कोणतेही पैसे द्यावे लागले नसते. पक्षी रूपात मी नेहमी मनुष्याची मदत केली असती. लहान मोठे कीटकांना खाऊन मी शेतीचे रक्षण केले असते. 



एका पक्षाच्या रूपात मला कधीही पिंजऱ्यात राहायला आवडेल नसते. कारण जर मला पिंजऱ्यात टाकले असते तर माझ्या जीवनाला काही अर्थच राहिला नसता. एका पक्ष्याचे खरे जीवन स्वतंत्रपणे उडण्यातच आहे. म्हणून मी पक्षी रूपात दृष्ट मनुष्यापासून दूरच राहिलो असतो. प्राणी संग्रालयातील त्या लहान पिंजर्यांमधे पक्षी आपल्या इच्छेने उडू शकत नाहीत. 



आज आपल्या देशात प्रदूषण खूप वाढत आहे. मी जर पक्षी राहिलो असतो तर याचा सरळ प्रभाव माझ्यावर झाला असता. प्रदूषण आणि दूषित वायु मुळे माझे आरोग्य खराब झाले असते. याशिवाय आकाशात उडणाऱ्या पतंग व त्यांची दोर मला खूप हानिकारक ठरली असती. कारण या पतंगच्या दोराने अनेक पक्ष्यांचे पंख कापले जातात, ज्यामुळे ते कायम चे अपंग होतात. पक्षी जीवन जेवढे आनंद आणि मजेचे आहे तेवढेच जोखमीचे देखील आहे. म्हणून जर मी पक्षी राहिलो असतो तर मौज सोबत मला अनेक संकटांना देखील सामोरे जावे लागले असते.

–समाप्त–



तर मित्रहो हा होता mi pakshi zalo tar या विषयावरील लहानसा marathi nibandh आशा आहे की तुम्हाला हा निबंध आवडला असेल. आपण या निबंधाला आपल्या मित्रांसोबत शेयर करून आम्हाला सपोर्ट करू शकता धन्यवाद…



READ MORE:

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.