fbpx
3.8 C
London
Sunday, February 5, 2023

मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध | Mi pahileli jatra marathi nibandh

मित्रहो आज आपण मी पाहिलेली जत्रा या विषयावरील (Mi pahileli jatra) मराठी निबंध पाहणार आहोत. तर चला सुरू करूया.. 

मी पाहिलेली जत्रा निबंध / माझ्या गावाची जत्रा

आपल्या देशात विविध भागांमध्ये जत्रेचे आयोजन केले जाते. यामधून काही जत्रा या धार्मिक असतात तर काही राष्ट्रीय. प्रत्येक लहान मोठ्या खेड्या तसेच शहरी भागात जत्रेचे आयोजन केले जाते. माझ्या गावचे नाव भैरवी गाव आहे. हे गाव पुण्याजवळ स्थित आहे. माझ्या गावात दरवर्षी श्रावण महिन्यात जत्रा भरते. ही जत्रा भगवान शंकराच्या मंदिर परिसरात भरते. गावची जत्रा म्हटली म्हणजे एक वेगळाच उत्साह वाटतो. श्रावण महिन्याची ही जत्रा श्रावण सोमवारी भरते. श्रावण महिना सुरू होण्याअगोदरच मंदिरातील साफसफाई सुरू होते संपूर्ण जागा स्वच्छ केली जाते. आणि मग तो जत्रेचा दिवस देखील उजाडतो. दरवर्षी मी माझे मित्र तसेच कुटुंबासोबत जत्रेत फिरायला जातो. मागील वर्षी देखील जत्रेच्या सकाळीच मला माझ्या मित्राचा फोन आला तो, मी आणि माझा शेजारी मित्र असे आमचा तिघांचा जत्रेत सोबत जाण्याचा बेत ठरला. जत्रेची विशेष शोभा संध्याकाळ च्या वेळी पाहायला मिळत असे. जेव्हा आम्ही गावाच्या जत्रा मैदानात पोहोचलो, पाहतो तर काय या वर्षी तोबा गर्दी जमली होती. पाय ठेवायला देखील जागा शिल्लक नव्हती. गावातील भगवान शंकराचे मंदिर जत्रे पासून थोडे दूर टेकडीवर होते. माझ्या वडिलांनी मला आधी मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला सांगितले होते. म्हणून आम्ही तिघी जन कशीतरी वाट काढत शिखरावर पोहोचलो. भगवान शंकराचे दर्शन घेतले व वरून जत्रा मैदान पाहिले. वरून जत्रेचे दृश्य अतिशय सुंदर दिसत होते. चारही बाजूंना दूकानी लागल्या होत्या आणि सर्वजण आनंदी होते. जत्रेत खाण्यापिण्याची, खेळण्यांची, पुस्तकांची अशी वेगवेगळी दुकाने लागली होती. याशिवाय जत्रेत अनेक मोठ मोठे झोके आलेले होते. आम्ही खाली उतरलो आणि जत्रेत शिरलो. माझ्या मित्रांनी मोठ्या गोल फिरणाऱ्या झोक्यात बसण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणून आम्ही त्या झोक्यात बसलो. माझा तर जीव घाबरत होता. मी पहिल्यांदा या झोक्याची स्वारी करणार होतो. जसा झोका सुरू झाला मी माझे डोळे घट्ट मिटले. तेव्हा माझ्या मित्रांनी मला धीर देत डोळे उघडायला सांगितले. काही होत नाही म्हणून त्यांनी मला समजावले. मग मी पण हळू हळू डोळे उघडले आणि चारही बाजूंचे सौंदर्य पाहायला लागलो. पहिल्यांदा बसल्याने जीव तर घाबरत होता. परंतु आनंद देखील वाटत होता. 5 मिनिटांनी झोका थांबला व आम्ही खाली उतरलो. परंतु मला अजूनही असेच वाटत होते की मी झोक्यात बसलो आहे आणि माझे डोके गरगर फिरत होते.नंतर आम्ही मौत का कुहा पाहायला गेलो. या मध्ये एका बंद खोलीत चारही बाजूंना मोठमोठ्या भिंती असतात. व या भिंतींवर बाईकस्वर वेगवेगळे कर्तब करतात. यांना पाहून आमचे खूप चांगले मनोरंजन झाले व त्यांचे आश्चर्यकारक कर्तब पाहून आम्ही थक्क झालो. यानंतर आम्ही नाश्त्याच्या दुकानावर गेलो आणि मस्तपैकी समोसा, भेळ आणि पाणीपुरी खाल्ली. हळू हळू रात्र होत होती आणि इतर गावाहून आलेले लोक परत जयायला लागले होते. म्हणून जत्रेतील गर्दी कमी व्हायला लागली होती. यानंतर आम्ही देखील पुन्हा आपापल्या घराकडे निघालो. अशा पद्धतीने मी पाहिलेली ही जत्रा आनंद आणि उत्साहाने संपन्न झाली.READ MORE:

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here