fbpx
3.8 C
London
Sunday, February 5, 2023

लोकसंख्या वाढ: कारणे, दुष्परिणाम & उपाय | loksankhya / population information in marathi

2011 च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या 125 कोटी आहे. ही लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 17.5% आहे. आपला देश भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश चीन (134.1 कोटी) नंतर दुसरा देश आहे. भारताची एकूण लोकसंख्या अमेरिका, जपान, इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्तान या सर्व देशांच्या एकूण लोकसंख्या एवढी आहे व ही लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 1941 साली भारताची लोकसंख्या 31.86 कोटी होती. आणि 2011 येईपर्यंत ही लोकसंख्या 121 कोटी झाली. आजची हालत अशी आहे की जगातील सहा व्यक्तीं मधून एक व्यक्ती भारतीय आहे. भारतात होत असलेल्या जनसंख्या विस्फोटावर जर आळा घातला नाही तर, तज्ञांच्या मते 2030 पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनून जाईल. 

लोकसंख्या म्हणजे काय ?

कोणत्याही देशातील शहर, जिल्हे, तालुके आणि खेड्या गावात राहणाऱ्या लोकांच्या एकूण संख्येला देशाची लोकसंख्या म्हटले जाते. गरजेपेक्षा जास्त लोकसंख्या वाढल्याने देश व संपूर्ण जगाला याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. पुढे आम्ही loksankhya vadhiche parinam आणि लोकसंख्या कमी करण्यासाठीचे काही उपाय सांगितले आहेत.लोकसंख्या वाढ म्हणजे काय आहे ? (loksankhya vadh)

कोणत्याही देशातील, शहर आणि क्षेत्रातील लोकांची संख्या वाढणे म्हणजेच लोकसंख्येची वाढ होय. लोकसंख्यावाढ ही भारतासह जगभरा समोरील मोठी समस्या आहे. लोकसंख्यावाढीची व्याख्या सोप्या शब्दात सांगायची झाली तर जेव्हा देशातील मृत्यु दरात कमी येते व जन्मदर वाढतो तेव्हा मोठ्या प्रमाणात लोकसंख्येत वृद्धि होते या स्थितीला ‘लोकसंख्या विस्पोट’ देखील म्हटले जाते.  लोकसंख्या वाढीची कारणे loksankhya vadhiche karan

1) 1951 ते 1961 ह्या काळात भारतातील सरासरी वार्षिक जन्मदर 42/हजार होता. सन 2011 मध्ये हा जन्म दर कमी होऊन 24.8/हजार झाला. याच पद्धतीने 1951 ते 1961 ह्या काळात मृत्यू दर हा 27/हजार होता. जो सन 2011 मध्ये कमी होऊन 8/हजार वर आला. या मध्ये जन्म दरात थोडी कमी झाली परंतु मृत्यू दरात मोठ्या प्रमाणात कमी झाली ज्यामुळे जन्मदर आणि मृत्युदरातील अंतर वाढले. या दोघांमधील वाढते अंतर वाढत्या लोकसंख्ये मागील पहिले कारण आहे.2) वाढते विज्ञान व चिकित्सा क्षेत्रातील प्रगतीमुळे अनेक रोगांवरील दवा व्यापक प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. ह्या औषधींच्या उपयोगामुळे शिशू मृत्यू दरात खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तसे पाहता हे एक सकारात्मक पाऊल आहे. परंतु विज्ञान क्षेत्रातील या प्रगतीमुळे मागील काही दशकांमध्ये देशाची लोकसंख्या वाढली आहे. 3) देशातील वाढत्या लोकसंख्या मागील आणखी एक कारण निरक्षरता होय. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या अशिक्षित आहे. कुटुंबनियोजनाचे योग्य ज्ञान नसल्याने हे लोक 2 पेक्षा जास्त अपत्य जन्माला घालतात. व यामुळे देशातील लोकसंख्या वाढते.4) देशातील काही धार्मिक रूढीवादी लोक कुटुंबनियोजनाचे नियम अवलंबण्यास विरोध करतात. ज्यामुळे त्यांची लोकसंख्या वाढते.5) वाढत्या लोकसंख्येमागील आणखी एक कारण देशातील गरिबी होय. अनेक गरीब आई वडील फक्त एवढ्यासाठी मुले जन्माला घालतात कारण त्यांना आर्थिक मदत हवी असते. या मुलांना कमी वयात बाल मजुरी व इतर श्रमाच्या कामांवर लावून दिले जाते.लोकसंख्या वाढीचे परिणाम – loksankhya vadhiche parinam

वाढत्या लोकसंख्येचा सरळ परिणाम देशातील लोकांच्या जीवनावर पडतो. स्वातंत्र्या नंतर आपल्या देशात कृषी व उद्योग क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती झाली. परंतु या आर्थिक प्रगती नंतरही देशातील प्रतिव्यक्ती उत्पन्न वाढले नाही. वाढत्या लोकसंख्येने देशाच्या प्रगतीला रोखले आहे. 1) देशाच्या संसाधनांवर दबाव: 

जर एखाद्या देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर त्या देशात असलेल्या पायाभूत सुविधा आणि संसाधनांवर दबाव पडतो. वीज, पेट्रोल, डिझेल, परिवहन, अन्न, पाणी, घरे इत्यादी गोष्टींची मागणी वाढल्यावर त्या गोष्टींचा तुटवडा निर्माण व्हायला लागतो. परिणामी महागाई वाढून देश गरिबीच्या कुचक्रात अडकतो.2) लोकांच्या राहणीमानात घट:

ही तर अतिशय सामान्य गोष्ट आहे की जेव्हा कमवणारे कमी आणि खाणारे जास्त राहतील तेव्हा शारीरिक गरजेनुसार अन्न वस्त्र इत्यादी मिळणार नाही. भारतातील आज अनेक गावांमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे, ज्यामुळे मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्याने लोकांच्या राहणीमानात घट येते.3) वाढती गरिबी:

लोकसंख्या वाढीच्या कारणांमध्ये सांगितल्याप्रमाणे देशातील गरीब आई वडील आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून जास्त मुले जन्माला घालतात. परंतु मुलांना शिक्षित करण्याएवढी चांगली परिस्थिती नसल्याने ही मुले शिक्षण सोडून लहानपणापासून मजुरी करतात. व या चक्रात अडकून त्यांच्या येणाऱ्या पिढ्याही गरीबच जन्मतात. 4) देशाचा विकास प्रभावित होतो:

ज्या देशातील लोक फक्त आपल्या पोटाच्या भरण पोषणात लागलेले राहतील, त्या देशाची विज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील प्रगती होणे शक्य नाही. अश्या देशात विकासाची कल्पना करणेही कठीण आहे. आज दक्षिण आफ्रिकेतील अनेक द्वीप समूहांवर ही परिस्थिती उभी आहे. आज ज्या पद्धतीने देशातील लोकसंख्येत वृद्धी होत आहे, जर हे चक्र असेच सुरू राहिले तर येत्या काही वर्षातच आपल्यासमोर बेरोजगार, भुकेलेले, निराश लोकांची एक फौजच उभी राहील. आणि ही फौज देशाची सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रणालीला मुळांपासून हलवून देईल. म्हणून आज आवश्यकता आहे की शासनाने देशाच्या वाढत्या लोकसंख्या समस्येकडे लक्ष देऊन वेळीच उपाय योजना करायला हव्यात. READ MORE:

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here