माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी | Mazya Swapnatil Bharat essay in Marathi

0

या लेखात माझ्या स्वप्नातील भारत मराठी निबंध – Mazya swapnatil Bharat देण्यात आलेला आहे. हा Mazya swapnatil bharat Essay in marathi शाळा कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त कल्पनापर निबंध आहे.

आपला देश भारत हा विविधता असलेला देश आहे, विविधतेतील एकता आपल्या देशात पाहवायला मिळते. परंतु आजही आपल्या देशातील काही लोक जात पात व धर्माच्या नावावर भांडत आहेत. देशात भ्रष्ट्राचार, अशिक्षितता, बेरोजगारी, स्त्रियांवरील अत्याचार इत्यादी गोष्टी मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु मी एक वेगळ्याच भारताचे स्वप्न पाहतो. माझ्या स्वप्नातील भारत हा आजच्या भारताच्या उलट असेल. majhya swapnatil bharat मध्ये लोक एकजुता, प्रेम व बंधुतेने राहितील.



mazya swapnatil bharat essay in marathi माझ्या स्वप्नातील भारत निबंध


माझ्या स्वप्नातील भारत निबंध – Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi

(300 शब्द)

माझ्या स्वप्नातील भारत एक असा देश असेल जिथे समानता व स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने उपभोग घेता येईल. हा भारत एक अशी भूमी राहील जेथे व्यक्तीला जाती, धर्म, पंथ, सामाजिक आर्थिक स्थिती इत्यादी गोष्टींवर भेदभाव न करता समान भावनेने पाहिले जाईल. मी भारताला एक अश्या देशाच्या रूपात पाहू इच्छितो जेथे औद्योगिक आणि तांत्रिक विकास विपुल प्रमाणात असेल. आज भारतातील काही क्षेत्रात विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.



महिला सशक्तिकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जरी आज मोठ्या प्रमाणात महिला घरातून बाहेर निघून स्वतःची ओळख निर्माण करीत आहे तरी आजही महिलांविरुद्ध भेदभाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. स्त्री भ्रूण हत्येपासून तर स्त्रियांवर होत असलेले घरेलू अत्याचार पर्यंत अश्या अनेक गोष्टींवर कार्य करणे आवश्यक आहे. 



भारतातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षण होय. आज जरी भारत सरकार शिक्षणावर भर देऊन लोकांना शिक्षणाविषयी जागृत करीत आहे तरीही देशातील काही भाग असे आहेत जेथे अजुनही शिक्षण पोहोचलेले नाही. यासाठी शासनाला आणखी एक पाऊल पुढे टाकून देशातील कोणताही व्यक्ती अशिक्षित राहता कामा नये याची खात्री करायला हवी.



देशातील तिसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी होय. आज देशातील मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित युवा रोजगारापासून वंचित आहेत. त्यांना योग्यता असतानाही योग्य रोजगाराची संधी मिळत नाही आहेत. यासाठी भारत शासनाने देशात उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करायला हव्यात. माझ्या स्वप्नातील भारतात प्रत्येक नागरिकाला काही न काही नोकरीची संधी उपलब्ध राहील. 



आपल्या देशातील चौथी समस्या म्हणजे धर्म, जात-पात इत्यादी गोष्टी मधील भेदभाव. अनेक लोक आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी कट्टर तेचा आधार घेतात. मी स्वप्न पाहतो कि एक दिवस भारत हा जात-पात मुक्त होऊन सशक्त राष्ट्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण करेल.



भारतातील पाचवी समस्या म्हणजे भ्रष्टाचार होय. शिक्षणामुळे आज देशातील नागरिक समजदार झाले आहेत, म्हणून देशात पूर्वीपेक्षा भ्रष्टाचार कमी आहे परंतु आजही अनेक नेता, राजनेता स्वतःचे खिसे भरण्यात लागलेले आहेत. मी अश्या भारताचे स्वप्न पाहतो जेथील सर्व मंत्री पूर्णपणे देशाला समर्पित राहून, देशवासीयांच्या विकासासाठी कार्य करतील.

***



माझे स्वप्न मराठी निबंध <<वाचा येथे



माझ्या स्वप्नातील भारत निबंध | Mazya Swapnatil Bharat Nibandh

मी भारताच्या एक नागरिक आहे व मला माझ्या देशावर अभिमान आहे. मी माझ्या स्वप्नात भारताला एक महान राष्ट्र बनवण्याची कल्पना करतो. 



माझ्या स्वप्नातील भारत असा असेल जेथे सर्व लोक सुख शांती व प्रेमाने राहतील. हा भारत अतिप्राचीन व गौरवशाली भारत असेल. आधीच्या काळात भारताला ‘सोन्याची चिमणी’ म्हटले जायचे. परंतु वर्तमान काळात भारतात खूप मोठ्या प्रमाणात दरिद्रता निर्माण झाली आहे. आज आपला देश बऱ्याच जीवनावश्यक गोष्टींसाठी दुसऱ्या देशांवर विसंबून आहे. मी अश्या भारताची कल्पना करतो जो पूर्णपणे संपन्न असेल. 



भारत फार पूर्वीपासून सांस्कृतिक व आध्यात्मिक दृष्टीने संपूर्ण जगाचा मार्गदर्शक आहे. आपल्या देशातील नालंदा व तक्षशिला विश्वविद्यालयात जगभरातून विद्यार्थी शिक्षण घ्यायला यायचे. परंतु आज आपल्या देशातील तरुण विदेशात जाऊन शिक्षण घेत आहेत. मी अश्या भारताचे स्वप्न पाहतो जो पुन्हा एकदा विश्वगुरू बनून संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल आपल्या देशाची संस्कृती पुन्हा एकदा विश्वातील सर्वश्रेष्ठ संस्कृती म्हणून उदयास येईल.



मी अश्या भारताची कल्पना करतो जो शोषणमुक्त असेल. अश्या भारतात शेतकरी मजूर तसेच इतर साधारण जनतेचे शोषण होणार नाही. देशातील जनतेत समानता व बंधुता निर्माण होईल. वर्तमानात आपल्या देशात बऱ्याच ठिकाणी निरक्षरता आहे. गावागावात शिक्षण पोहोचायला हवे. जेणेकरून सर्व नागरिक शिक्षित होऊन आपले जीवन यशस्वी बनवतील. 



साने गुरुजींनी आपल्या कवितेत त्यांच्या स्वप्नातील भारत कसा असावा याबद्दल सांगितले आहे. या कवितेच्या काही ओळी पुढीलप्रमाणे आहेत.

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो ||

हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले,

राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो ||

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन,

तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो ||

***



तर मित्रानो हा होता माझ्या स्वप्नातील भारत निबंध (Mazya Swapnatil Bharat Essay in Marathiया विषयावरचा निबंध तुम्हाला हा निबंध कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या शिवाय कोणत्याही विषयावरील मराठी भाषणे व निबंध मिळवण्यासाठी आपण आमच्या वेबसाइट च्या मराठी निबंध या पेजला भेट देऊ शकतात. धन्यवाद..

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.