fbpx
6.1 C
London
Monday, February 6, 2023

[गाय मराठी निबंध] आवडता प्राणी गाय निबंध मराठी | Essay on Cow in Marathi

गाय मराठी निबंध | majha avadta prani Gaay Nibandh Marathiमाझा आवडता प्राणी गाय निबंध मराठी | Essay on Cow in Marathi.1) गाय मराठी निबंध (Cow Marathi Essay)

गाय आपल्या पृथ्वीवर हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. भारतीय परंपरेत गाईला आईचे स्थान दिले आहे. म्हणून गाईला ‘गोमाता’ पण म्हटले जाते. गाय एक पाळीव प्राणी आहे आणि जवळपास सर्वच ठिकाणी गाईला पाळले जाते. एका रिपोर्ट अनुसार भारतात 1 करोड 90 लाख गायी आहेत. संपूर्ण जगात सर्वात जास्त प्रमाणात गायी भारतातच आढळतात. या मागे कारण असे आहे की भारतात गायी ला सन्मानाने ठेवले जाते. असे म्हटले जाते की गायी मध्ये 33 कोटी देवी देवता असतात. तसे पाहता गाय प्रत्येक देशात आढळते. पण प्रत्येक ठिकाणानुसार गायीची शरीर रचना वेगवेगळी असते. काही गायी कमी दूध देतात तर काही जास्त. गायीचे शरीर खूप मोठे असते तिचे वजन 700 किलो पेक्षा पण जास्त असू शकते. गायीचे शरीर पुढील बाजूने बारीक व मागे जाड असते. तिला मागच्या बाजूला लांब शेपटी असते, या शेपटीच्या मदतीने ती शरीरावर लागलेली माती व घाण काढते. गायीच्या तोंडात 32 दात असतात. गायीला हिरवा चारा खायला आवडतो.  गाय खाल्लेले अन्न परत तोंडात आणून व्यवस्थित चावू शकते या प्रक्रियेला ‘रवंथ करणे’ म्हटले जाते.गायीला घरामध्ये पाळले जाते ती शांत स्वभावाची असते. गाय सकाळ संध्याकाळ दूध देते. एक गाय एका वेळेस 5 ते 10 लिटर दूध देऊ शकते. वेगवेगळ्या प्रजातीच्या गायी वेगवेगळ्या प्रमाणात दूध देतात. आधीच्या काळात गायीला शेत नांगरणीसाठी पण वापरले जायचे. गाईच्या दुधापासून दही, ताक, पनीर, मिठाई इत्यादी स्वादिष्ट पदार्थ बनवता येतात. गाईच्या शेणाला सुखावून इंधन च्या रूपात उपयोग केले जाते. वर्तमान काळात काही लोक गायीचे मांस खाऊ लागले आहेत. गायीच्या या मांसला ‘बिफ’ म्हटले जाते. गाय ही मनुष्याला आयुष्यभर काही न काही देत राहते. तिच्या मृत्यू नंतरही हाडांपासून वेगवेगळ्या शिल्पकला कृती बनवल्या जातात. गाय मनुष्यासाठी अतिशय उपयुक्त प्राणी आहे. व तिला भारतीय संस्कृतीत आई म्हटले आहे. म्हणून तिला मारून मांस खाणे योग्य नाही.

–समाप्त–2) माझा आवडता प्राणी गाय निबंध मराठी | Maza Avadta prani gaay

भारतात खूप सारे प्राणी व प्राण्यांच्या जाती पाहायला मिळतात. यातील बरेच प्राणी मनुष्याच्या उपयोगाचे असल्याने त्यांना पाळले देखील जाते. असाच एक प्राणी ज्याला संपूर्ण भारत पाळले जाते त्याचे नाव आहे गाय. गाय ही माझा आवडता प्राणी आहे. गायीला भारतात गोमाता म्हणजे आईचा दर्जा दिला जातो. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये गाईचा उल्लेख केला आहे. गायीला अती पवित्र मानले जाते. भारतासह अनेक देशात गायीला पाळले जाते. गायीची शरीर रचना प्रदेश व देशानुसार वेगवेगळी असते. गायीच्या चारही पायात खुर असतात त्याच्या सहायतेने गाय कठोर स्थानी पण चालू शकते. गायीच्या पूर्ण शरीरावर केस असतात. मागच्या बाजूला एक मोठी शेपटी असते. या शेपटीच्या मदतीने ती शरीरावर लागलेली माती तसेच माश्या उडवते. गाय सकाळ संध्याकाळ दूध देते. गाय एका वेळेला 5 ते 10 लिटर दूध देते. गाईच्या दुधापासून वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. गाय पूर्णपणे शाकाहारी असते, ती फक्त हिरवा चारा खाते. लहान मुलांना गायीचे दूध पाजण्याचा सल्ला दिला जातो. गायीचे दूध व्यक्तीला मजबूत आणि स्वस्थ बनवते. या दुधामुळे रोग प्रतिरोधक क्षमता वाढून शरीराचा विकास होतो.गाय अतिशय शंतीप्रिय पशू आहे. तिला आईचा दर्जा दिला जातो. गायीचे दूध नवजात बालकांना पाजले जाते. गायी पासून आपण खूप काही शिकू शकतो गाय सर्वांना सारखे समजून प्रेम देते. आपण गायीचे रक्षण व सन्मान करायला हवा.

–समाप्त–WATCH VIDEO:माझा आवडता प्राणी 20 निबंधासह पुढील PDF Download करा
 

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here