fbpx
-1.2 C
London
Thursday, December 8, 2022

आर्थिक अडचणींमुळे तुमचे शिक्षण थांबले आहे का ? थांबले असेल तर PM विद्यालक्ष्मी योजनेच्या पोर्टलला द्या भेट

अनेकदा कुटुंबाची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने शिक्षण घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. खासकडून मुलींना तर अशा परिस्थितीचा सर्वात जास्त फटका बसतो. त्यामुळे आता भारत सरकारकडून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज दिले जात आहे. बरेचदा अशा योजना सरकारकडून बनवल्या जातात. मात्र त्या तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत.

सध्या भारत सरकारकडून पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न केला जातो. एनएसडीएल ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर या पोर्टलचा विकास आणि देखभाल करत आहे. या योजनेंतर्गत शिक्षण कर्जाशी संबंधित सर्व माहिती पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

13 बँकांकडून कर्ज घेऊ शकता

पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजनेच्या मदतीने विद्यार्थी आपला अभ्यास सुरू ठेवू शकतात. पोर्टलद्वारे विद्यार्थी त्यांच्या गरजेनुसार 13 बँकांकडून 22 प्रकारच्या कर्ज घेऊ शकतात. विशेष म्हणजे पोर्टलवर शिष्यवृत्तीची माहितीदेखील देण्यात आली आहे. सरकारच्या या पुढाकारानंतर कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व व्यासपीठावर सर्व माहिती मिळेल आणि त्यांना इकडे तिकडे धावण्याची गरज भासणार नाही.

विद्या लक्ष्मी योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज कसा करावा?

  • विद्या लक्ष्मी योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर https://www.vidyalakshmi.co.in/Students/ भेट द्या.
  • या दुव्यावर, नोंदणी केल्यानंतरच आपल्याला कर्जासाठी अर्ज करण्याची संधी मिळेल. (https://www.vidyalakshmi.co.in/Students/signup)
  • विद्या लक्ष्मी योजनेत नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी व पासवर्ड मिळेल.
  • यानंतर, आपण आपला ईमेल आयडी आणि संकेतशब्द प्रविष्ट केल्यानंतर लॉगिन करण्यास सक्षम असाल.
  • शैक्षणिक कर्जासाठी आपण कॉमन एज्युकेशन लोन फॉर्म भरा.
  • विद्या लक्ष्मी योजनेंतर्गत शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या सोयीनुसार कर्जासाठी अर्ज करावा लागेल.
  • कर्ज मंजूर झाल्यानंतर आपल्याला या पोर्टलवर त्याची माहिती मिळेल.

अनेक विद्यार्थ्यांना परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असते. मात्र आर्थिक अडचणी असल्याने त्यांना परदेशी जाता येत नाही. पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजनेंतर्गत अशा विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी देखील कर्ज आणि शिष्यवृत्ती दिली जाते. जेणेकरून विद्यार्थ्याच्या शिक्षणात कोणतीही अडचण येणार नाही.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here