मराठी भाषेचे महत्व मराठी निबंध | Marathi bhasheche mahatva
Marathi bhasheche mahatva : मित्रांनो महाराष्ट्राच्या मराठी मातीचा इतिहास फार प्राचीन आहे. अनेक वीरांच्या बलिदानाने हा महाराष्ट्र बनलेला आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्राचा इतिहास प्राचीन आहे त्याचपद्धतीने महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी भाषा ही अनेक शूरवीरांची अशी सुंदर भाषा आहे.
आजच्या या लेखात आपण मराठी भाषेचे महत्व माहिती (marathi bhasheche mahatva) व मराठी भाषेवर मराठी भाषा निबंध पाहणार आहोत. तर चला सुरू करूया..
मातृभाषेचे महत्त्व निबंध <<वाचा येथे
मराठी भाषेचे महत्व निबंध | Marathi Bhasheche Mahatva
(400 शब्द)
महाराष्ट्र अधिनियम 1964 नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठीला घोषित केले आहे. 27 फेब्रुवारी या दिवसाला मराठी राजभाषा दिन म्हणून साजरे केले जाते. या दिवशी साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ज्येष्ठ कवी श्री विष्णु वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म झाला होता. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना स्मरण म्हणून मराठी राजभाषा दिवस 27 फेब्रुवारी म्हणजेच त्यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो.
मराठी ही अतिशय सुंदर भाषा आहे. ही मुख्यतः महाराष्ट्र व गोवा च्या काही भागात बोलली जाते. जगभरात बोलल्या जाणाऱ्या लोकांच्या संखेनुसार मराठी ही 10 व्या क्रमांकाची भाषा आहे. व भारतात बोलल्या जाणाऱ्या एकूण भाषापैकी मराठी तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. मराठी ही जगातील प्राचीन भाषापैकी एक आहे. मराठी भाषेचा इतिहास प्राचीन आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13 व्या शतकात आपल्या साहित्यातून मराठी भाषेचा महिमा गायला होता. महाराष्ट्राला मराठी भाषिकांचे राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. व आजवर अनेक महान लेखकांनी आपल्या लिखानाने मराठी भाषेच्या साहित्यात भर केली आहे. एक न अनेक साहित्यकृतीमुळे मराठी भाषा जगभरात पोहचली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात मराठी भाषिकांची एकूण संख्या 9 कोटी आहे.
मराठी भाषेचे महत्व हे शब्दात वर्णन करणे फार कठीण आहे. मराठी भाषेत अनेक महान लेखकांनी साहित्य लिहिले आहे. परंतु मराठी भाषेचे उत्कृष्ट कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी व योग्य महत्व प्राप्त करवून देण्यासाठी अथक परिश्रम केले. त्याच्या स्मृतींना स्मरण म्हणून दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मराठी राजभाषा दिवस 27 फेब्रवारी ला साजरा केला जातो. कुसुमाग्रजां शिवाय अनेक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखकांनी मराठी भाषेच्या विकासासाठी कार्य केले. काही प्रसिद्ध मराठी लेखकांची नावे पुढील प्रमाणे आहेत. कृष्णाजी केशव दामले, गोविंद विनायक करंदीकर, त्र्यंबक बापुजी ठोंबरे, प्रल्हाद केशव अत्रे, राम गणेश गडकरी, विष्णु वामन शिरवाडकर, निवृत्ती रामजी पाटील, चिंतामण त्र्यंबक खानोलकर, आत्माराम रावजी देशपांडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, विनायक जनार्दन करंदीकर इत्यादी.
आज मराठी भाषा ज्या रूपात जिवंत आहे, त्या रूपात तिला जिवंत ठेवण्यामागे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान आहे. शिवरायांमुळे महाराष्ट्र व मराठी भाषा टिकून आहे. मध्ययुगात अनेक विदेशी आक्रमकांनी भारतावर आक्रमण केले, शिवरायांनी मोठ्या शौर्याने यांच्याशी लढत महाराष्ट्र व मराठी भाषेचे रक्षण केले. मराठी ही आपल्यासाठी केवळ एक भाषा नसून ममतेचे, वात्सल्याचे आणि संस्काराचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरासाठी हळुवार आणि प्रेमळ असतात व वेळप्रसंगी जी आई मुलाच्या चांगल्यासाठी कठोर शब्दही बोलते तशीच आपली मराठी आहे. तिच्या शब्दाची शक्ती प्रचंड आहे. जागतिकीकरणाच्या या स्पर्धेत आपण आपली मराठी भाषा विसरू नये अशी माझी इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या माय मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे रक्षण केले होते.
***
मराठी भाषा निबंध- marathi bhasheche mahatva
(200 शब्द)
महाराष्ट्र राज्याची भाषा म्हणजे मराठी. मराठी संपूर्ण भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषा पैकी तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य आहे. महाराष्ट्रातील अनेक लेखकांनी आपल्या साहित्यातून मराठी भाषेचा महिमा सांगितला आहे. दरवर्षी 27 फेब्रुवारीला कवी कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्मृतींना स्मरून मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. मराठी ही 1500 वर्षांचा इतिहास जपणारी भाषा आहे.
महाराष्ट्रातील घरा घरामध्ये मराठी माय बोली भाषा बोलली जाते. आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात जेवढे लेखक साहित्यकार लाभले आहेत त्यांनी मराठी भाषेचे महत्व जपून ठेवले आहे. या भाषेमुळेच आपण आपले सुरुवाती लेखन-वाचन शिकलो. मराठी ही अतिशय सुंदर भाषा आहे. परंतु आज दिवसेंदिवस वाढत्या इंग्रजी भाषेच्या आकर्षणामुळे मराठी भाषा जपणे काळाची गरज झालेली आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण बरेचसे इंग्रजीचे शब्द वापर करत असतो. सगळीकडे इंग्रजी भाषेचा प्रसार झालेला आहे. महाराष्ट्रातील अनेक कंपनी मध्ये कामाच्या ठिकाणी इंग्रजी भाषेतूनच व्यवहार केले जातात. शाळेत दाखल करताना देखील पालक आपल्या पाल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकावे अशी इच्छा दर्शवतात.
मराठी भाषा टिकली तरच महाराष्ट्रीयन समाज टिकेल. आपल्या विचारांची, संस्कृतीची देवाणघेवाण ही मातृभाषेतूनच होऊ शकते. आपल्या बर्थडेला वाहू आपल्या मातृभाषेतूनच मिळेल. आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला आपल्या मातृभाषेशी निगडीत असणे फार महत्त्वाचे आहे. आपली मराठी भाषा आपण समृद्ध केली पाहिजे व विविध मराठी पुस्तकांचे वाचन करून मातृभाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.
***
तर मित्रांनो हा होता मराठी भाषेवर लिहिलेला निबंध तुम्हाला मराठी भाषेचे महत्व (marathi bhasheche mahatva) हा निबंध कसा वाटला आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की सांगा व मराठी भाषा निबंध ला आपले मित्र व इतर मंडळीसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद..
To view this video please enable JavaScript, and consider upgrading to a
web browser that
supports HTML5 video
अधिक वाचा :