शाळा लवकरच सुरु होण्याची शक्यता ! केंद्र सरकारकडून हालचालींना सुरवात

0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असलेला देश आता अनलॉक होत आहे. अनेक व्यवसायिक घटकांना सूट आणि काही नियम लागू करत केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार सुरु केले आहेत. मात्र आता शाळा कॉलेज कधू सुरु करणार असा सवाल वारंवार विचारला जात असतानाचं केंद्र सरकारने यबाबतही निर्णय घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत.

गेले 4 महिने शाळा कॉलेज बंद आहेत. विद्यार्थ्यी सध्या ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मात्र ऑनलाईन शिक्षण घेताना अनेक अडचणी निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होत आहे. यासाठी केंद्र सरकार 1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर या काळात टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा विचार करत आहे.

बँक खात्यावर रोख रक्कम किंवा ओव्हरड्राफ्ट सेवा घेणाऱ्यांना चालू खाते उघडता येणार नाही : RBI

मिळालेल्या माहितीनुसार, अनलॉक 4 च्या ज्या गाईडलाईन्स ऑगस्टअखेरीस येतील त्यात शाळांबाबतही नियमावली राज्यांना दिली जाऊ शकते. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही याबाबतच्या गाईडलाईन्सवर काम करणार आहे. तसेच शाळा सरु करण्यासाठी केंद्र सरकारने स्वित्झर्लंडचं मॉडेल डोळ्यासमोर ठेवलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनेही सलग इतका काळ शाळा बंद असणं हे मुलांसाठी चांगलं नाही, असं म्हटलं आहे. इतका मोठा गॅप शाळेविषयी, अभ्यासाविषयी अनास्था निर्माण करु शकतो, अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

धक्कादायक माहिती : कोरोनाच्या 90% रुग्णांचा आजार बरा होऊनही फुफ्फुसावर होतोय दीर्घकालीन परिणाम

शाळा सुरु करण्याबाबत केंद्राने गाईडलाईन्स केल्या तरी अंतिम निर्णय हा राज्य सरकारांवरच सोपवला जाणार आहे. त्या त्या ठिकाणी कशी स्थिती आहे त्यानुसार राज्य सरकारं हा निर्णय घेतील, असंही केंद्राने म्हटलं आहे.

सुरवातीला दहावी ते बारावी इयत्तेचे वर्ग  सुरु होतील. त्यानंतर खालच्या म्हणजे 5वी ते 9वी आणि सगळ्यात शेवट प्राथमिक आणि शिशु वर्ग सुरु होतील.

जुलैमध्ये केंद्राने याबाबत जेव्हा सर्व्हे केला होता, तेव्हा बहुतांश पालकांनी शाळा सुरु करण्यास विरोधच दर्शवला होता. त्यामुळे बदलत्या स्थितीत त्यावर कसा प्रतिसाद येतो हे देखील पाहावं लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.