‘नाग-नागीण’, ‘नागमणी’ , ‘इच्छाधारी नाग-नागीण’ या गोष्टी आपण आधीच्या भाकडकथांमध्ये नक्की ऐकल्या असणार. इच्छाधारी नाग-नागिणींकडे सौंदर्याची अमाप संपत्ती असते, असे त्या कथांमध्ये ऐकायला मिळते. पण या गोष्टींना रिअल समजण्यास हातभार लावला तो आपल्या बॉलीवूड इंडस्ट्रीने- अभिनेत्री ‘श्रीदेवी’, ‘रीना रॉय’ यांनी आपल्या सौंदर्याने आपल्या चित्रपटामधून इच्छाधारी नागिणी किती सुंदर असू शकतात याबद्दल लोकांना जाणीव करून दिली. श्रीदेवीचा ‘नगिना’ आणि अभिनेत्री रीना रॉयचा ‘नागीन’ चित्रपट त्यावेळी भरपूर गाजला. या अभिनेत्रींच्या ‘नागीन’ लुकने त्यावेळी सगळ्यांवर जादू केली होती.
इतकेच नाही तर यानंतर छोट्या पडद्यावर देखिल नाग-नागिणींवर आधारित मालिका बनवल्या जाऊ लागल्या. या मालिका देखील चित्रपटांसारख्या गाजू लागल्या. यामुळे नागांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या किती पसंतीच्या आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आले.
सध्याच्या काळात ‘एकता कपूर’ निर्मित ‘नागिन’ ही मालिका ‘कलर्स’ चॅनेलवर सुरू आहे. या मालिकेने भरपूर प्रसिद्धी मिळवली असुन ही मालिका भरपूर लोकप्रिय झाली आहे. आतापर्यंत या मालिकेचे तीन सिझन झालेले असून चौथा सिझन सुरु आहे. या मालिकेतील अभिनेत्रींनीं आपल्या नागीण लुकद्वारे भरपूर प्रसिद्धी आणि प्रशंसा मिळवली. इतकेच नाही तर या अभिनेत्रींचे ‘नागिन लुक’ म्हणजेच साड्या, दागिने मेकअप ट्रेन्डी झाले आहे . चला तर बघुयात या ‘नागिन’ सिरीजमधील बेस्ट ‘नागिन लूक्स’….
मौनी रॉय –
सौंदर्याची एक वेगळीच ठेवी असलेली अभिनेत्री मौनी रॉयचा ‘नागिन सिझन १ आणि सिझन २’ मधील शिवन्या आणि शिवांगी लुक हा त्या वेळी फार गाजला होता. एक मोठा मांगटिक्का आणि त्यावर भारी कानातले घालून हा लुक होता. यामुळे बाजरात ‘शिवन्या पॅटर्न इअरिंग्स’ देखील आले आहेत. मौनीच्या साड्या, झुमके, हायलाईट केलेले डोळे, बर्गंडी हायलाईट केलेले खुले केस आणि एक छोटा मंगळसूत्र असा लुक तरुण मुलींचा आवडता झाला होता. काही मुलींनी मौनीच्या या लुक संबंधित व्हिडीओज देखील ‘यु ट्युब’वर बनवले आहेत.
अदा खान –
‘नागिन’ सिझन १ आणि सिझन २ मध्ये अभिनेत्री अदा खानने ‘शेषा’ म्हणून काळ्या नागिणीची भूमिका निभावली होती. यामध्ये अदाचे वेस्टर्न ड्रेसेस फार चर्चेत आले होते. याबरोबरच तिचे लांब सरांचे कानातले आणि केसांवरील ‘रेड हायलाईट्स’ खूप ट्रेंडी झाले आहेत. या लुकमध्ये एक गोष्ट प्रसिद्ध झाली ती म्हणजे अदाच्या वेगवेगळ्या ‘हेअरस्टाईल्स’. मुलींनी या हेअरस्टाईल्सना खूप पसंती दिली.
सुरभी ज्योती –
‘नागिन सिझन ३’ मध्ये अभिनेत्री सुरभी ज्योती हिने लीड रोल केले होते. बेलाच्या भूमिकेत सुरभी ज्योतीने मौनी रॉयच्या लुकच्या तुलनेत आकाराने मोठे असलेले मांगटिक्का आणि कानातले घातले होते. सुरभीच्या साडया आणि त्यावर कॉन्ट्रास्ट ब्लॉऊज सोबतचा लुक त्यावेळी फार चर्चेत आला होता. या सिझन मध्ये नागिणींचा लुक काही जास्तच हॉट दाखवण्यात आला होता.
अनिता हसनंदानी –
अभिनेत्री अनिता हसनंदानी हिने ‘ये है मोहोब्बते’ या मालिकेतून शगुनच्या लुकद्वारे सर्वांना आपल्या लूकंच दिवाना बनवल होतं. अभिनेत्रीने मालिकेमध्ये घातलेले वेगववेगळ्या पॅटर्न ब्लॉऊज जास्तच चर्चेत आले होते. तर ‘नागिन’ सिझन ३ मध्ये ‘विष’ च्या लुकने सर्वत्र अनिताची चर्चा होत आहे. या लुकमध्ये तिचे दागिने, तिचे वेगवेगळ्या ड्रेसवरील लुक ट्रेंडी होत आहेत. अनिताच्या नागीण लुक मधून ‘फ्रील सारी’ ट्रेंडी झाली आहे.
निया शर्मा-
‘नागिन’ सीझन ४ मध्ये अभिनेत्री निया शर्मा ‘ब्रिन्दा’ च्या भूमिकेत प्रसिद्ध झाली आहे. ब्रिन्दाचे सुरुवातीचे लुक ‘लॉन्ग कुर्ती सोबत दुपट्टा पॅटर्न’ हे होते. नियाच्या या लुकमुळे ‘लॉन्ग कुर्ती विथ दुपट्टा’ हा पॅटर्न परत एकदा ट्रेंडमध्ये आला आहे. त्यांनतर नियाचे लुक आता प्रिंटेड नेट सारीज आणि स्लिव्हलेस ब्लॉउजसोबत असतो. त्यासोबतच भारी झुमके आणि छोटा मंगळसूत्र असतो. या लुकसोबत निया अप्रतिम दिसत आहे.