fbpx
2 C
London
Thursday, February 9, 2023

नेपोटिझमच्या गरमा गर्मीत महेश भट्ट यांंचा सडक 2 होतोय रिलीज, ट्रेलर झाला लॉन्च

सिने अभिनेता संजय दत्त याला कॅॅन्सर झाल्याच्या वृत्त्तानंतर आता संजय दत्त यांच्या आगामी सडक 2 या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. हा चित्रपट महेश भट यांनी दिग्दर्शित केला असून यामध्ये अभिनेत्री आलिया भट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त, आणि महाराणीच्या भूमिकेत मकरंद देशपांडे दिसणार आहे.

हा ट्रेलर कालचं रिलीज होणार होता. मात्र संजय दत्तची तब्येत खालवल्याने ट्रेलर थांबवला होता. हा चित्रपट 28 ऑगस्टला डीस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या ट्रेलरमधूनचं समजते की हा सिनेमा प्रेम, रोमांन्स आणि अॅक्शन वर आधारित असणार आहे.

1991 मध्ये आलेला पहिला सडक चित्रपट हा चांगलाचं गाजला होता. या चित्रपटात संजय दत्त आणि पूजा भट यांची जोडी हिट झाली होती. तसेच महाराणीच्या भूमिकेत असणारे सदाशिव अमरापूरकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांना अचाट केले होते.

खरंतर पहिल्या पोस्टरपासूनच सडक 2 वादात सापडला होता. पहिल्या पोस्टरवरून काही लोकांनी कोर्टात धावही घेतली होती. हिंदू लोकांच्या भावना दुखावल्याचा ठपका यावर ठेवण्यात आला होता.

तसेच सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमचा मुद्दा गरम असतानाचं. हा सिनेमा रिलीज होत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात महेश भट्ट आणि आलिया भट्ट यांचे नावही बरेच चर्चेत आहे. त्यामुळे दर्शक या सिनेमाला पसंती देणार का हे पाहवे लागणार आहे.

संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर

संजय दत्त याला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचं समोर आले आहे. संजय दत्तला मंगळवारी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल होत. यावेळी त्याची कोरोन टेस्टही करण्यात आली मात्र ती निगेटिव्ह आली. त्यानंतर बॉडी चेकिंग वेळी त्याला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर असल्याचं निदान झालं. त्यानंतर उपचारासाठी संजय दत्तला लगेचचं अमेरिकेला हलवण्यात आल. यावेळी संजय दत्तने आपल्या इन्स्टाग्रामवरून चाहत्यांना काळजी करू नका, असा आवाहन केलं.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here