विशेष लेख : ‘संगीता’तली एकेकाळची ‘आशा’

1

कोमल पाटील : सुरांच्या साहाय्यान केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील आणि जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असं कुठलंच गाणं नाही. तो आवाज चैतन्य निर्माण करु शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही.त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत प्रकार नाही. आणि तो आवाज म्हणजे आशा भोसले.

आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 मध्ये सांगली इथं झाला. मास्टर दीनानाथ मंगेशकर हे त्यांचे वडील, त्यांच्या गाण्याचा वारसा आशाताईंना मिळाला. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर अशा भावंडांच मार्गदर्शन आणि त्यांची साथ या सगळ्यातून आशाताईंचा गळा घडत गेला. आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात  ‘माझा बाळ’ या चित्रपटातून केली. 1950 च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटातही अनेक गाणी गायली . पण ती विशेष गाजली नाहीत.

त्याकाळात हिंदी चित्रपट संगीतावर लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका राज्य करत होत्या. त्यामुळं आशाताईंना संधी मिळण अवघड होतं. या गायिकांच्या राज्यात राहून, गाऊन, आपल वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचं, स्वतः ला सिद्ध करण्याचं फार मोठ आव्हान आशाताईपुढ होतं. या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, मुलांची जबाबदारी, प्रतिकूल परिस्थिती या सगळ्या विपरीत घटकांशी सामना करत करत आशाताईंना ते आव्हान स्वीकारलं, आणि ते ही स्वबळावर, आत्मविश्वासान यशस्वीपणे पेलून दाखवलं.

इ.स. 1957 – इ.स. 1958 हे वर्ष आशा भोसले यांचच. अनेक कवींच्या काव्यरचनाना त्यांनी सुरांच कोंदन दिल. त्यांनी आजपर्यंत सुमारे 900 चित्रपटातून पार्श्वगायन केल. तसच 14 भाषामध्ये सुमारे 12000 गाणी गायली आहेत. नाच रे मोरा, आईए मेहेरबँ, दिव्य स्वातंत्र्य रवी, सांज ये गोकुळी, मागे उभा मंगेश… ही रेंजच अफाट आहे. हा आवाकाच अविश्वसनिय आहे. उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीत, मराठी -हिंदी चित्रपट गीत, गझल, लावण्या, डिस्को, पॉप – रॉक गाणी अशा सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई आजही तेवढ्याच ताकदीन गाऊ शकतात.

आशा भोसले या मंचावरून एक ‘उत्कृष्ठ परफॉर्मर ‘ म्हणून रसिकासमोर येतातच, पण त्या स्वयंपाकाची आवड असलेल्या, मुलांना सांभाळणाऱ्या एक परिपूर्ण गृहिणी आहेत. क्रिकेटच्या दर्दी रसिक त्या आहेत. पण एवढं यश, मानसन्मान मिळूनही त्यांचे पाय घट्टपणे जमिनीवर आहेत. सर्वात महत्वाच म्हणजे जुना काळ, प्रचंड कष्ट, धडपड या गोष्टी न विसरणाऱ्या, आवर्जून लक्षात ठेवणाऱ्या त्या एक ‘ संवेदनशील माणूस ‘ आहेत. शेवटी एकच म्हणेन,

” गंध तुमच्या श्वासाना
सप्तसुराना आयुष्य जितके
तितके आयुष्य लाभो आपणास
ही ईश्वरचरणी प्रार्थना.. “

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.