#BirthdaySpecial : अजूनही ‘इन आँखो की मस्ती के मस्ताने हजारो है’

0

बॉलीवूडची ‘एव्हरग्रीन डिवा’ अभिनेत्री रेखाचा आज 66वा जन्मदिवस आहे. ‘ उमर के साथ साथ, चेहरे का निखार भी कम हो जाता है।’ हिंदीतील असा डायलॉग तर तुम्ही नेहमीच ऐकत असणार आणि हे वास्तविक रुपात खरंच आहे. पण अभिनेत्री रेखा या वास्तविकतेला अपवाद आहे. अभिनेत्री रेखा ही बॉलीवूडमधील सौंदर्याच नाणं आहे. जस जसे रेखाचे वय वाढत चालले आहे, तसेच तिच्या सौंदर्यात अधिकचं भर पडत आहे. रेखाच्या सौंदर्यातील सादगीमुळे ती अनेकांच्या मनावर राज्य करते. ‘इन आँखो की मस्ती के, दिवाने हजारो है’ असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

रेखामध्ये अनेक सुंदर कला आहेत. रेखाच्या फक्त सौंदर्यातच नाही तर अभिनयातही तितकीच जादू आहे. रेखाच्या नृत्यकलेने तर तिला खरी प्रसिद्धी दिली आहे. मुजरा करणे असो वा बॉलीवूड फॉर्म, कुठल्याही फॉर्ममध्ये रेखाने आपल्या नृत्याने सर्वांच्या मनांवर राज्य केले आहे. रेखाला आणि तिच्या नृत्यकलेला प्रसिद्धी देणारे काही गीत तर तुम्हाला माहिती असतीलंच. पण जर तुम्ही विसरले असणार तर काळजी करू नका. आम्ही आहोत ना, चला तर जाणून घेऊयात रेखाचे प्रसिद्ध मुजरा गीत जे तुम्हाला आजही गुणगुणायला आणि नृत्य करायला भाग पाडतील…

‘दिल चीज क्या है’-

1981 मधील अभिनेत्री रेखाचा चित्रपट ‘उमराव जान’ या चित्रपटातील ही गझल आहे. गायिका ‘आशा भोसले’ यांनी आपल्या सुंदर आवाजात हे गाणे गायले आहे. रेखाने आपल्या दिलकश अदांनी मुजरा करून या गाण्याच्या सुंदरतेत आणखी भर घातली आहे.

Rekha 23

 

सलामे इश्क मेरी जान-

1978 मध्ये रेखा आणि अमिताभ बच्चनचा चित्रपट ‘मुकद्दर का सिकंदर’ प्रसिद्ध झाला. गायिका ‘लता मंगेशकर’ यांनी आपल्या आवाजात हे गाणे गायले आहे. रेखाने आपल्या नटखट अंदाजात हा मुजरा केल्याचे दिसून येते.

Rekha 24

 

इन आँखो की मस्ती के-

1981 मधील ‘उमराव जान’ या चित्रपटातील “इन आँखो की मस्ती के दिवाने हजारो है” हे आणखी एक मुजरा गीत प्रसिद्ध झाले. गायिका आशा भोसले यांनी हे गीत गायले आहे.

Rekha

अठरा बरस की तू होने को-

अमिताभ बच्चन आणि रेखाच्या ‘सुहाग’ या चित्रपटातील हे सुंदर गाणे आहे. या गाण्याला लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी आपला आवाज दिला आहे.

 

Rekha 25

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.