You Tube कडून 2020मधील सर्वाधिक लोकप्रिय व्हिडीओंची यादी जाहीर

युट्यूबवर यंदाच्या वर्षी भारताच्या दृष्टीकोनातून पाहायचं झाल्यास गेमिंग, चालू घडामोडी, टेक्नोलॉजी अशा अनेक विषयांवरील व्हिडीओंचा गाजावाजा पाहायला मिळाला

0

गेल्या काही वर्षांमध्ये मनोरंजनाचं साधन म्हणून (You tube) युट्युबकडेही गांभीर्यानं पाहिलं जाऊ लागलं . माहिती, प्रवास, अभ्यासू, शैक्षणिक, विनोदी, कलात्मक अशा अनेक प्रकारच्या व्हिडीओ या वर्तुळात नेटकऱ्यांची मनं जिंकून गेल्या. त्यातच आता (You Tube India) कडून यंदाच्या वर्षी प्रचंड गाजलेल्या अशा काही लोकप्रिय व्हिडिओ, गाणी आणि युट्यूब कंटेंट क्रिएटर्सची याही जाहीर करण्यात आली आहे.

कला विश्वाची वेगळीच बाजू या यादीच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे. एका वेगळ्याच प्रेक्षकवर्गाच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या कलाकारांनी शून्यातून सुरु केलेला त्यांचा प्रवास आणि आजच्या घडीला त्यांच्या वाट्याला आलेलं हे यश पाहता, खऱ्या अर्थानं ते प्रशंसेस पात्र ठरत आहेत.

युट्यूबवर यंदाच्या वर्षी गेमिंग, चालू घडामोडी, टेक्नोलॉजी अशा अनेक विषयांवरील व्हिडीओंचा गाजावाजा पाहायला मिळाला. ज्याचा थेट फायदा युट्यूब कंटेंट साकारणाऱ्या काही युट्यूबर्सना झाला.

2020 मधील भारतातील टॉप युट्यूब कंटेंट क्रिएटर

 • कॅरी मिनाटी
 • टोटल गेमिंग
 • टेक्नो गेमर्ज
 • जेकेके एन्टरटेन्मेंट
 • आशिष चंचलानी वाईन्स
 • राऊंड2हेल
 • टेक्लिकल गुरुजी
 • कुकिंग शुकिंग हिंदी
 • देसी गेमर्ज
 • द म्रिदुल

2020 मध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले म्युझिक व्हिडीओ

 • बादशाह- गेंदा फूल Badshah – Genda Phool | JacquelineFernandez | Payal Dev | Official Music Video 2020
 • मोटो (ऑफिशिअल व्हिडीओ)
 • ala vaikunthapurramuloo- ButtaBomma Full Video Song
 • सुमित गोस्वामी – फिलिंग्स
 • इलिगल वेपन 2.0 – स्ट्रीट डान्सर 3डी
 • गोवा बीच – टोनी कक्कर, नेहा कक्कर
 • एमिवे बंटाय – एमिवे फिरसे मचाएंगे
 • ala vaikunthapurramuloo – रुमालू रुमाला
 • मुकाबला – स्ट्रीट डान्सर 3डी, ए. आर रेहमान, प्रभुदेवा, वरुण डी.
 • बी प्राक- दिल तोड के.

2020 या वर्षी देशात सर्वाधिक ट्रेंडमध्ये आलेले व्हिडिओ

 • कॅरी मिनाटी- Stop Making Assumption
 • जेकेके एंटरटेन्मेंट – छोटू दादा ट्रॅक्टर वाला | Chotu dada tractor wala
 • मेक जोक ऑफ- Make joke of || MJO || The Lockdown
 • टीआरटी Ertugrul by PTV – Ertugrul Ghazi | Episode 1 | Season 1
 • ब्रिस्टी होम किचन – Chocolate Cake Only 3 ingredients in Lockdown Without egg, oven maida
 • ई टीव्ही धी- Pandu performance | Dhee champions
 • राऊंड2हेल – The Time Freeze | Round2Hell | R2H
 • आशिष चंचलानी वाईन्स – Office Exam Aur Vaccine
 • बीबी की वाईन्स – Angry Masetrji – Part 15
 • तारक मेहता का उलटा चष्मा – Tapu proposes to sonu on valentines day
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.