fbpx
2.8 C
London
Monday, February 6, 2023

संभ्रमित करणारी परिस्थिती : कोरोनाची लस नक्की येणार कधी ?

जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना आता सर्वच देशांना कोरोना लसीची प्रतीक्षा आहे. मात्र ही लस येणार केव्हा याबाबत संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य समोर येत आहेत. नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनावरची लस येण्यास 2021 साल उजाडेल असे सांगितले आहे. तर दुसरीकडे अनेक औषध निर्माण कंपन्या लसीच्या चाचण्या घेण्यात अंतिम टप्यात आल्या आहेत. त्यामुळे जरी लस सर्व चाचण्यांमधून पास झाली तरी तिचे नंतरचे उत्पादन आणि जगभरात होणारे वितरण यासाठी नक्कीचं काही वेळ जाईल आणि ही लस 2021मध्ये उपलब्ध होईल, असे WHOचे कार्यकारी संचालक माइक रायन यांनी म्हंटल आहे.

काय म्हणाले माईक रायन ?

“कोरोनाचं वॅक्सीन संशोधकांना चांगलं यश मिळवून देत आहे. पण 2021 आधी ही वॅक्सीन उपलब्ध होऊ शकत नाही. 2021 च्या सुरुवातीच्या टप्प्यात हे वॅक्सीन तयार झालं तरीही ते सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात वेळ लागू शकतो. वॅक्सीन तयार होण्याचा वेग थोडा कमी झाला असला तरीही त्याच्या सुरक्षा मानकामध्ये कोणतीही तडजोड होऊ नये याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. बऱ्याच वॅक्सीनचं काम अंतिम टप्प्यात आहे. या वॅक्सीनची सुरक्षितता आणि परिणाम यामध्ये अद्याप असफल झाले नाहीत. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची निरीक्षणं काय येतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.”

आतापर्यंत किती देशांनी केले संशोधन ?

कोरोनाने जसा देशात प्रवेश केला तसा प्रत्येक देशाने कोरोनावर लस शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया, भारत, ब्रिटन आदि देश कोरोनावर लस शोधण्यात आघाडीवर आहेत. त्यातल्या त्यात ऑक्सफोर्डचा कोरोनावरील मानवी चाचणीचा दुसरा टप्पा यशस्वीपणे पार पडला असून आता अंतिम टप्प्यातील निरीक्षण सुरू आहे. तर 13 जुलैला आलेल्या वृत्तानुसार रुस म्हणजेच रशिया हे कोरोना लसीच्या चाचण्या घेण्यात पुढे आहे.

रशियन वृत्तसंस्था स्पुतनिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वदीम तारासोव म्हणाले की, “जगातील पहिल्या कोरोना लसीची क्लिनिकल चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.” त्यांनी सांगितले की ‘मॉस्को आधारित सरकारी वैद्यकीय विद्यापीठ सेचेनोफने या चाचण्या घेतल्या आणि ही लस मानवांवर सुरक्षित असल्याचे आढळले.

18 जून रोजी, विद्यापीठाने रशियाच्या गॅमिली इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीद्वारे तयार केलेल्या लसीची क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या होत्या.

जानेवारी महितन्यापासूनच ऑक्सफर्डमधील संशोधक कोरोनासाठीच्या लसीच्या संशोधन प्रक्रियेवर काम करत होते. सध्या ते या लसीच्या मानवी चाचणीच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्याव पोहोचले आहेत. Lancet, Phase 1 results मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार लसीमुळं कोणत्याही प्रकारची इजा होत नाही आहे किंवा तिचे विपरीत परिणाम होत नाही आहेत. शिवाय या लसीमुळं मानवी शरीरात उत्तम रोगप्रतिकारक शक्तीची निर्मिती होत आहे. आता पुढच्या टप्प्यामध्ये ही रोगप्रतिकारक शक्ती कोविडविरोधात संरक्षणात्मक ठरते का, हे पाहिलं जाणार आहे.

तर भारत सरकारने येत्या 15 ऑगस्टला भारतात कोरोना लस येईल असा दावा केला आहे. भारत बायोटेक ही औषध निर्माण करणारी कंपनी यावर काम करत आहे. COVAXIN असं या लसीचं नाव आहे. या कंपनीने काही दिवसांन पूर्वीच ICMRकडून वॅक्सीनची ह्युमन ट्रायल घेण्याची परवानगी मिळवली होती.

जगात आतापर्यंत कितीजणांना कोरोनाचा विळखा

जगात आता पर्यंत 1 कोटी 37 लाख 9 हजार 312 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 93 लाख 54 हजार 812 जण रिकव्हर झाले आहेत. तर 6 लाख 3 हजार,312 जणांना मात्र या रोगामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे यापेक्षा अजून वाताहात होयू नये म्हणून कोरोनाची लस येणे आवश्यक असल्याचं प्रत्येकाचं म्हणन आहे.

कोरोनाने झालेले नुकसान

जगभारत आलेल्या या महामारीमुळे जीवितहानी झालीच आहे त्याचबरोबर वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना याचा मोठा फटका बसला आहे. तर अनेक उद्योग-धंदे हे अजूनही बंद आहेत. जागतिक शेअर मार्केट मधील गडगडले आकडे अजूनही खालीच्या अंकांवरच खेळत आहेत. इंधनाची मागणी एकाकी घटल्यामुळे खनिज तेलाच्या किंमतीत एवढ्या प्रमाणात झालेली घसरण पहिल्यांदाच पाहिला मिळाली . अनेक कंपन्यांमध्ये कामगार कपात झाली, अशा अनेक घटना या जगावरील आर्थिक संकटाचे द्योतक आहे.

कोरोनाची लस नेमकी येणार केव्हा ?

आता प्रत्येक सामान्य नागरिक प्रयोगशाळेत काम करणाऱ्या डॉक्टरांकडे आणि तज्ञांकडे आशा लावून बसला आहे. की आता कोरोनाची लस येणार केव्हा ? कारण प्रत्येकजण आता पुन्हा पूर्वी सारखे जीवन जगू इच्छित आहे. बंद खोलीत किती दिवस लॉकडाऊन राहायचं असा प्रश्न तो विचारू लागला आहे. घरी बसून आता साठवलेली पुंजी देखील संपली आहे. त्यामुळे लवकरात लवकर या कोरोनाचा नायनाट करणारी लस यावी आणि पुन्हा जनजीवन पूर्वपदावर यावं अशी सर्वांचीच इच्छा आहे.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here