जे घडते ते भल्यासाठीच

0

बरेचदा तुमच्या आयुष्यात कोणी एक व्यक्ती येते आणि काही कालांतराने तुम्हाला जाणवते कि त्यांची तुमच्या आयुष्यातली भूमिका हि खरेच चपखल होती.त्यामागे काहीतरी कारण होते, त्यातून तुम्ही काही खास धडा घेणार होता किंवा कदाचित त्यातूनच तुमचे अस्तित्व पुढे येणार होते.अशा काही गोष्टी घडतात कि ज्या खूप भयंकर आणि दुःखद वाटतात पण पुढे जाऊन पटते कि हा अडथळा या शर्यतीत यायला हवाच होता !! आता हे तर सहाजिकच आहे कि त्या काळातल्या वेदनेतून बाहेर यायला तुम्हाला काही वेळ लागेल.सकारात्मक आणि नकारात्मक सुद्धा घटना घडत जातील आणि त्यातूनच पुढे आणखी काही नवीन भूमिका समोर येतील! पुन्हा त्या भूमिकांच्या मागे सुद्धा काहीतरी कारण असणारच 🙂 अशीच काहीतरी एक मजेदार गोष्ट आहे. एक राज एकदा त्याच्या विश्वासू सल्लागाराबरोबर एकदा जंगलात शिकारीला जातो. शिकार करता करता एक छोटासा अपघात होतो आणि विश्वासू सल्लागाराच्या तेथे असण्याने कदाचित राज्याच्या जीवावरचे संकट टळून फक्त त्याचे एक बोटेच छाटले जाते आणि मोठी इजा होते ती सल्लागाराला !!?? आणि राजाचा तो शुभचिंतक त्यावेळीही काहीसा विव्हळत म्हणतो कि जे होते ते भल्यासाठीच होते!! हे ऐकून आपला राग अनावर होऊन राजा त्याच्या शिपायांना आदेश देतो कि सल्लागाराला बंदी बनवून कारावासात ठेवा.?? असाच काही काळ लोटल्या नंतर राजा पुन्हा एकदा त्याच्या सेवकांना बरोबर घेऊन शिकारीला निघतो.आणि शिकार करत दूर जंगलात जात असताना तो एका दुर्गम आदिवासी जमातीत जाऊन अडकतो. जिथे त्यांचा मानव प्राणी बळी देण्याचा धार्मिक कार्यक्रम चालू असतो. बळी देण्यासाठी सहाजिकच राजाची निवड होते.पण राजाचे ते छाटले गेलेले बोटच त्याला बळी जाण्यापासून वाचवते कारण आदिजमातीला शरीराचे एखादे अंग नसलेला बळी त्यांच्या धार्मिक कार्यासाठी चालणारच नव्हता. आता मात्र राजाला उमगते कि सल्लागाराची त्याच्या आयुष्यातली भूमिका हि चांगल्यासाठीच होती आणि बोट छाटले जाण्याची घटना हि सुद्धा त्याच्या भल्यासाठीच होती. तेव्हा लगेचच सल्लागाराची बंदिवासातून सुटका करून त्याला त्याच्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्याची मुभा तो देतो.

Leave A Reply

Your email address will not be published.