fbpx
2.7 C
London
Saturday, January 28, 2023

जाणून घ्या ! पुराणातील तुळस आणि विज्ञानातील ‘Ocimum sanctum’चे महत्व

प्रत्येक भारतीय घरात तुम्हाला प्रवेश करताना वृंदावनात किंवा कुंडीत लावलेले एक छोटेसे रोपटे दिसेल. त्या रोपट्याच्या अवतीभोवती तुम्हाला अगरबत्तीच्या काड्या छोट्या पणत्या, रांगोळी अशी सगळी व्यवस्था दिसेल. होय, तुम्ही बरोबर ओळखलंत! आम्ही ‘तुळशी’ बद्दलच बोलत आहोत. प्रत्येक भारतीय घरात ‘तुळस’ असते, हे तर सर्वांना माहिती आहे. पण ती का असते? याचा कुणी विचार केला आहे? तुळस आरोग्यासाठी उपयोगी असते, लाभदायी असते, हे सर्वांनाच माहिती आहे. पण ती कशी? याचा कधी विचार केलाय? नाही ना! काळजी करायचं काही कारण नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आमच्या या लेखातून देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करु.

तुळसला इंग्रजीमध्ये साधारणतः ‘होली बेसिल’ या नावाने ओळखले जाते. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘Ocimum sanctum‘ हे आहे. पुदिनाच्या कुळातील म्हणजेच ‘लॅमीएसी फॅमिली’मधील ही एक सुगंधी वनस्पती आहे. युरोप वर आफ्रिका खंडामध्ये बहुतेक भूप्रदेशात तुळशीची झुडुपे आढळतात. तुळशीची पाने लंबगोलाकार आणि किंचित टोकदार असतात. तुळशीचा तुरा म्हणजे तुळशीची फुले होत. या फुलांना ‘मंजिरी’ असे म्हटले जाते.

वनस्पती शास्त्रज्ञांनुसार इतर झाडे 12 तास ऑक्सिजन आणि 12 तास कार्बन डायऑक्साइड हवेत सोडतात. मात्र तुळस ही अशी एकमेव वनस्पती आहे जी दिवसातील 20 तास ऑक्सिजन आणि फक्त 4 तास कार्बन डायऑक्साइड हवेत सोडते. यावरून तुम्ही ‘तुळशीचे महत्त्व’ याबद्दल अंदाज लावू शकता. तुळशीच्या पुढीलप्रमाणे अनेक जाती आहेत.

औषधी तुळस (Ocimum viride), कापूर तुळस, कॅन्फर बेसिल(Ocimum kilimandscharicum), काळी तुळस/ सब्जा/पंजाबी तुळस Holy basil (Ocimum americanum),कृष्ण तुळस – Sacred basil (Ocumum sanctum/tenuiflorum), रान तुळस – Sweet basil (Ocimum basilicum), राम तुळस – Shrubby basil (Ocimum gratissimum).

तुळशीचे हिंदू धर्मातील स्थान

हिंदू धर्मामध्ये तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. तुळशी मांगल्याचे आणि पावित्र्याचे प्रतिक आहे, असे मानले जाते. तुळस वृंदावनात माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे तूळस भारतीयांच्या मनाशी जूळलेले रोपटे आहे. त्यामूळे यास सर्वत्र एक खास महत्व असते. तुळशीशिवाय भगवान विष्णूची पूजा करणे व्यर्थ आहे. तुळशीची मंजिरी देवांची प्रतिनिधी असते, असे मानले जाते. मानवी जीवनात तुळशीचे फार महत्त्व आहे कारण ते एकाच वेळी अनेक रोगांचे निर्मूलन करते.

हिंदू स्त्रिया नित्याने तुळशीची पूजा करतात. पूजा करताना वृंदावनात असलेल्या तुळशीच्या रोपट्याच्या अवतीभोवती प्रदक्षिणा घालतात. संध्याकाळी तुळशीपुढे दिवा ठेवतात.

वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात आणि स्त्रिया त्यांच्या डोक्यावर तुळशीचे रोपटे ठेऊन वारीला जाताना दिसतात. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुलसीपत्र ठेवले जाते, याचा अर्थ सर्वस्वी त्याग करणे असा होतो.

आजही हिन्दू लोकांच्या मते तुळस वृंदावन आपल्या घरास सर्व नकारात्मक आणि वाईट परिणामांपासून वाचवते. तुळशीतील प्रतिजैविक आणि वेदनानाशक गुणामुळे हे प्रत्येकास हवेहवेसे वाटते. तूळसपानाचा चहा पिल्यास ताजेतवाने वाटते. शरीरात सकारात्मक उर्जा प्रवाहीत होते व मानसिक दृष्टया व्यक्ती प्रबळ होतो.

उत्तम औषधी वनस्पती

 • या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत.
 • आयुर्वेदामध्ये काळ्या तुळशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. औषधी गुणधर्माच्या बाबतीत काळी तुळस अत्यंत उपयुक्त आहे. लहान मुलाच्या खोकल्यावर, किवा टॉनिक म्हणून पानाच्या रसाचा उपयोग करतात.
 • पचनामध्ये काळ्या तुळशीच्या रसाचा पाचक म्हणून उपयोग होतो.
 • नायटा झाल्यावर तुळशीच्या पाण्याचा रस करून त्या जागी लावतात.
 • कानाच्या दुखण्यावर उपाय म्हणुन तुळशीच्या पानाचा रस उपयुक्त ठरतो.
 • तुळस उष्णतेच्या त्रासापासून आराम देते . तुळशीचे बी ६ तास पाण्यात भिजवतात. भिजलेल्या बिया दुध-साखरेबरोबर सेवन केल्यास उष्णता कमी होते.
 • मधमाशीचा दंश झाल्यास तुळशीतली माती वापरल्यास आराम पडतो.
 • कीडा, मुंगी अगर डास चावल्यास तुळशीची ४-५ पाने धुवून तळहातावर तंबाखूसारखी चोळतात व निघालेला रस दंशाच्या जागी लावतात. त्याने आग होणे थांबते.
 • तुळस मोठया प्रमाणात प्राणवायू सोडते, त्यामुळे सकाळी व संध्याकाळी तुळशीला प्रदक्षिणा घालण्याने आरोग्य उत्तम राहते.
 • दातांमध्ये तुळसतेल भरल्यास दातांच्या वेदना कमी होतात. ताजी पाने खाल्ल्यास तोंडातील दुर्गंधी कमी होते.
 • तुळस आपल्याला विविध संक्रमणापासून वाचवते. तुळस पानांचे 2, 3 थेंब पाण्यात टाकल्यास पाणी निर्जंतुक होते.
 • लहान बाळांच्या अंघोळीसाठी तुळशीच्या पानांना पाण्यात टाकून त्याने अंघोळ करणे ,आरोग्यदायी मानले जाते.
 • तुळस पाने सुगंधीत असतात. याच्या पानांचा सुगंध घेतल्यास श्वसनतंत्रातील जिवाणूंचे संक्रमण कमी होते.
  प्रत्येक घरासमोर एक तुळस असल्यास घरातील हवा शुध्द होते.
 • तुळस पानांना कूटून त्यांना मधासोबत घेतल्यास गळयातील कफ दूर होतो.
 • भारतात पारंपारीक पध्दतीने विविध जैविक संक्रमणात विविध औषंधीसोबत तुळसपानांचा वापर केला जातो.
 • तुळशीच्या पानांचा, मुळांचा, फुलांचा, फांदयांचा, बिजाचा आणि खोडाचा वापर वेगवेगळया प्रकारे औषधी म्हणून करता येतो.
 • तुळसपानांचा वापर त्वचासंक्रमणावरही होतो. तूळस पानांचा लेप त्वचा संक्रमणावर लावून उन्हात बसून मग वाळल्यावर कोमट पाण्याने अंघोळ केल्यास फार लाभ मिळतात. स्त्रिया तुळसपानाच्या लेपास उत्तम बॉडी माॅश्चरायझर म्हणून वापरतात. स्त्रियांच्या खाजगी जागांवरील विविध संक्रमणासाठी तुळसपानांच्या लेपाचा वापर होतो. तुळशीच्या पानांनी अंघोळ केल्यास त्वचा टवटवीत होते. तसेच त्वचेवर संक्रमण होत नाही.
 • डोळयांमध्ये संक्रमण झाल्यास त्यांना तुळसपानांनी धूतल्यास डोळयातील संक्रमण बरे होते. डोळयांची सूज, आणि डोळे जळजळीवर तूळसतेल डोळयांत 2,3 थेंब टाकल्यास डोळे निरोगी होतात. डोळयातील विविध व्याधींसाठी वापरल्या जाणा-या आयुर्वेदिक ड्राॅप आणि औषधीमध्ये तुळसतेलाचा वापर होतो.
Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here