आज्जीचा बटवा : बहुगुणी कांद्याची आयुर्वेदात अशी आहे ख्याती, तुम्हीही घ्या जाणून…

0

कांदा हे भारतातील एक महत्त्वाचे पीक आहे. फक्त भारतातचं नव्हे तर संपूर्ण जगात कांद्याचा वापर जेवणात केला जातो. कांद्याची फोडणी दिल्या शिवाय भाज्या बनवल्या जात नाही. भेळ कांद्याशिवाय कुरकुरीत वाटत नाही. महाराष्ट्रातील कांदेपोहे हे ऐकताचं अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. ग्रामीण भागात जेवणात भाजी नसेल तरी चालेल, पण कांदा मात्र हवाचं. भाकरी आणि कांदा ग्रामीण लोकांची आवडती डिश आहे. उन्हाळ्यात उन्हाळी लागते. त्यामुळे जेवणात कांदा खाल्ल्यास या समस्येपासून बचाव होतो.

आज्जीच्या बटव्यातील इतर घरगुती औषधांसारखेच कांद्यामध्ये देखील अनेक आरोग्यादायी फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कांद्याचे औषधी गुणधर्म…

कांदा संपूर्ण जगभरात खाल्ली जाणारी एक भाजी आहे. वनस्पतीचे शास्त्रीय नाव ऍलियम सेपा आहे. तुम्हाला माहित असेलच की कच्चा कांदा खाणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. तुम्ही कांद्यास सलाद मध्ये कच्चा वापरू शकता. कारण कच्चा कांदा खाण्याचे फायदे भरपूर आहेत. कच्च्या कांद्यामध्ये सल्फर आणि इतर आवश्यक विटामिन्स असतात.जे शरीरास अनेक आजारा पासून दूर ठेवतात. कच्चा कांदा तुम्ही सेंडविच, सलाद आणि चाट इत्यादी मध्ये टाकून खाऊ शकता.

औषधी उपयोग :

  • उन्हात फिरल्याने डोळ्यांची जळजळ होते. अशावेळी कांद्याच्या रसात खडीसाखर उगाळून रात्री झोपताना डोळ्यांना लावल्यास आराम मिळतो.
  • उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याचा अनेकांना त्रास होतो. त्यावर उपाय म्हणून कांद्याचा ताजा रस काढून तो नाकात टाकावा. यामुळे नाकातून रक्त येणार नाही.
  • उन्हाळ्यात हाताची जळजळ होत असेल तर हातावर कांदा घासावा. कांदा थंड असल्याने जळजळ कमी होते.
  • कांदा उष्माघातासाठी फायदेशीर मानला जातो. कपाळावर, हातावर, पायाला कांद्याचा रस लावून उन्हात गेल्यास उष्माघाताचा त्रास होत नाही.
  • सर्दीसाठी कांदा फायदेशीर असतो. सर्दी झाल्यानंतर घशात खाजेची समस्या झाल्यास कच्चा कांद्याचा रस प्यावा. कांद्याचा रस गुळामध्येदेखील पिऊ शकता. यामुळे घशाच्या खाजेला आराम मिळेल.
  • कांदा ब्लड शुगरला नियंत्रित ठेवते. मधुमेह रुग्णांनी नियमित कच्चा कांदा खावा.
  • किडनी स्टोनची समस्या असलेल्यांना कांद्याचा रस फायदेशीर आहे. कांद्याचा रस प्यायल्यास स्टोन आपोआप तुटतो आणि यूरीनच्या माध्यमातून बाहेर पडतो. तसेच कांद्याचा रस साखरेसोबत मिसळून प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होते.
  • मासिक पाळीदरम्यान पोट दुखत असेल, किंवा पाळी अनियमित येत असेल तर कांद्याचे सेवन करावे. त्यामुळे पोटदुखीला आराम मिळतो.
  • ज्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी आहे, त्यांच्यासाठी कांदा रामबाण उपाय आहे.
  • दररोज कांद्याचे सेवन केल्यास हृदयाचे आजारांचा धोका कमी होतो.
  • कांदा खाल्ल्यास ब्रेस्ट कॅन्सर, फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. तसेच कांदा खाल्ल्यास युरीन इन्फेक्शनही होत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
  • बद्धकोष्ठची समस्या झाल्यास कांदा खाणे फायदेशीर ठरते. तसेच कांद्यामुळे कॉलेस्ट्रॉलचेही प्रमाण कमी होते. कॅलरी बर्न होण्यास कांद्याची मदत होते.

(ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला अभिप्राय (Feedback) कळवा )

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.