नवीन शोध ! मेंदू येऊ शकतो नियंत्रणात ? अमेरिकेच्या एलेन यांनी आणले मेंदूचे मेमरी कार्ड

0

विज्ञानाने अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. अनेक अनियंत्रित गोष्टीवरही विज्ञानाने नियंत्रण मिळवले आहे. त्यात आता अमेरिकेचे एलेन यांनी मेंदूमध्ये चीप बसवण्याचे तंत्र विकसित केले आहे. या चिपमुळे मेंदूतील डेटा संकलित करता येणार आहे.

खरे तर शरीरातील सर्वात क्लिष्ट अवयव हा मेंदू आहे. मात्र विज्ञानाने या अवयवाची सर्जरी करण्याचेही तंत्र शोधले आहे. आज अनेक मेंदूच्या यशस्वीरित्या सर्जरी होत आहेत. त्यामुळे मेंदू हा क्लिष्ट अवयव असला तरी मनावाने त्याचा सखोल अभ्यास करून त्यातील बारीक-सारीक गोष्टींचा उलगडा केला आहे.

याच मेंदूच्या अभ्यासात आणि संशोधनात भर म्हणून अमेरिकेचे व्यावसायिक एलन मस्क यांनी मेंदूची चीप बनवली आहे. एलन यांची न्यूरोलिंक कंपनी गेल्या काही वर्षांपासून मानवी मेंदू समजून घेणाऱ्या चीपवर काम करतेय.

एलन यांची कंपनी ही नेहमीचं वेगवेगळे प्रयोग काम करत असते. याआधीही त्यांनी इलेक्ट्रिक कार बाजारात आणली होती. तर आता या मेंदूची चीप आणून वेगळा प्रयोग केला आहे.

एलन यांनी विकसित केलेल्या या चीपचे प्रात्यक्षिकही करण्यात आले आहेत. हे प्रात्यक्षिक डुक्करांवर करण्यात आले आहे. कंपनीने डुक्कराच्या मेंदूत ही चीप बसवून त्यावर प्रयोग करुन पाहीला. नाण्याच्या आकाराची चीप डुक्कराच्या मेंदूजवळ बसवली होती.

एलन मस्क यांनी ३ डुक्करांबद्दल माहीती दिली. त्यातील एकाच्या डोक्यात चीप होती. दुसऱ्याच्या डोक्यातून चीप लावून काढण्यात आली होती. तर तिसऱ्याला यापैकी काही करण्यात आलं नव्हतं.

न्यूरालिंकच्या टीमने केलेला हा प्रयत्न यशस्वी ठरला. Gertrude नावाच्या डुक्कराला चीप लावलेली. त्याचे विचार वायरलेस सिग्नलमधून कम्प्यूटरवर दिसू लागले होते.

अशा प्रकारची चीप येणाऱ्या काळात मानवी मेंदूमध्ये देखील बसवली जाऊ शकते. स्कल सर्जरीच्या माध्यमातून ही प्रक्रीया करता येऊ शकणार आहे.

ही चीप मेंदूच्या आजारांबाबत देखील माहिती देऊ शकते. जसे की स्मरणशक्ती संदर्भातील आजार, स्पायनल कॉर्ड आणि मूव्हमेंट संदर्भातील आजार ठीक होऊ शकतील असे एलन मस्क सांगतात. मेंदू नियंत्रणात आणून वैज्ञानिकदृष्ट्या काही करुन घेता येणार आहे.

मात्र या चीपमुळे मेंदूचे सिग्नल सहज रेकॉर्ड होत असले तरी त्याचे डिकोडिंग करणे फार कठीण आहे. कोणीही आतापर्यंत शंभर टक्के ही भाषा समजू शकला नाही, त्यामुळे या सिग्नलचा खुलासा करणे आव्हानात्मक असणार आहे, असे काही न्यूरोसर्जनचे मत आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.