आज्जीचा बटवा : कोथिंबीरचे औषधी गुणधर्म करतील तुम्हाला थक्क,एकदा वाचाचं !
कोथिंबीर? आजीच्या बटव्यात ‘कोथिंबीर’ हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. कोथिंबीर ही सर्वांच्या माहितीतील एक वनस्पती आहे. स्वयंपाकात प्रत्येक हंगामात दररोज या वनस्पतीचा उपयोग होतो. पदार्थांमध्ये स्वाद वाढवायला, डिश गार्निश करायला कोथिंबीरचा वापर केला जातो. पण फार कमी लोकांना हे माहिती आहे की, कोथिंबीरचे औषधी उपयोग देखील आहेत. आम्ही तुम्हाला औषधी उपयोग तर सांगणारच आहोत. पण कोथिंबीरचे सौंदर्यासाठी देखील उपयोग आहेत. चला तर जाणून घेऊयात या बहुगुणी कोथिंबीरचे उपयोग…
कोथिंबीर ही रोजच्या आहारात वापरली जाणारी महत्वाची पालेभाजी आहे. कोथिंबीरीच्या विशिष्ट स्वादयुक्त पानावर इतर भाज्यांचा स्वाद वाढविण्यासाठी शाकाहारी तरी मांसाहारी पदार्थामध्ये कोथिंबीरीचा वापर करण्यात येतो. कोथिंबीरीच्या वडया, चटणी आणि कोशिंबीर लोकप्रिय आहे. हिची वाळलेली फळे म्हणजे धणे/ हे मसाल्यांत वापरतात. यात लोहाचे प्रमाण जास्त असते.
कोथिंबीरचे इतर भाषिक नावे :
- इंग्रजी नाव- Coriander
- हिंदी नाव- धनिया
- शास्त्रीय नाव- कोरिॲंड्रम सॅटिव्हम.
कोथिंबीर अन्नाचा स्वाद वाढवण्यासाठी कच्ची अथवा क्वचित शिजवून खाल्ली जाते. विदर्भात कोथिंबीरला सांबर म्हणून संबोधतात. भारतात विविध ठिकाणी सांबार म्हणजे वेगवेगळे पदार्थांचे नाव आहे. गुजराथमध्ये जेवताना पानात चिरून वाढलेल्या कांदा, किसलेले गाजर वा हिरवी पपई आदींना सांबारो म्हणतात. दक्षिणी भारतातल्या आमटीला सांबार म्हणतात.
औषधी उपयोग :
कोथिंबीरमध्ये खरंच अनेक औषधीय गुण आहेत.
- कोथिंबिरीची पाने चवीला किंचित तिखट व स्तंभक असून उचकी, दाह, कावीळ इत्यादींवर गुणकारी असतात, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो.
- फळे मूत्रल, वायुनाशी, उत्तेजक, पौष्टिक व दीपक (भूक वाढवणारे) आहेत. शूल(पोटातील वेदना) व रक्ती मुळव्याध यांवर धण्यांचा काढा देतात.
- एलर्जीमुळे होणाऱ्या दाहावर पानांचा रस आणि लेप गुणकारी असतो.
- कोथिंबीर पचनासाठी चांगली असते.कोथिंबीर रोज आहारात असल्यामुळे मधुमेहाच्या प्रमाणात कमतरता येते.
- कर्करोगापासून देखील बचाव होतो.
- कोथिंबीरीमध्ये फायबर, लोह, मॅगनीज असतात जे शरीराला अत्यंत आवश्यक असतात.
- कोथिंबीरच्या बिया(धने) मासिक पाळीसाठी अत्यंत उपयोगी असतात.
- डोळ्यांची आग होणे, तसेच डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होणे. डोळे कोरडे होणे, डोळे क्षीण होणे अशा विविध डोळ्यांच्या विकारावर कोथिंबीर उपयोगी आहे. कोथिंबीरचा ताजा रस काढून त्यात ४-५ चमचे पाणी मिसळून हा रस गाळून घ्यावा व ते पाणी डोळ्यात २-३ थेंब घालावे.
- शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच शरीराचा थकवा जाऊन उत्साह वाढविण्यासाठी २ चमचे धणे व अर्धा इंच आलं एक ग्लास पाण्यात उकळावे व हे पाणी गूळ घालून आटवावे व तयार झालेला धण्याचा चहा प्यावा. हा चहा प्यायल्याने भूकसुद्धा वाढते.
- हातापायांची उष्णतेमुळे जळजळ होत असेल तर एक चमचा धणे व जिरे रात्री पाण्यात भिजत घालावे व सकाळी उठल्यावर पाण्यामध्ये कुस्करून ते पाणी गाळून प्यावे.
(टीप: हे सर्व उपाय अनुभवी आणि तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली करा.)
सौंदर्यासाठी उपयोग :
- त्वचेसंबंधित असणाऱ्या काही समस्या ज्याप्रमाणे पिंपल्स, कोरडी त्वचा, टॅनिंग यासाठी कोथिंबीरचा खूपच चांगला फायदा होतो.
- कोथिंबीरमध्ये अँंटीसेप्टिक आणि अँटीऑक्सीडंट गुण असतात जे तुमच्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहेत. -यामध्ये विटामिन सी असून तुमच्या फ्री रॅडिकल्सशी लढण्यास याची मदत होते आणि एजिंगची लक्षणं दिसत असल्यास, यावर रोख लावण्यासही कोथिंबीरीची मदत होते.
- याशिवाय एक्झिमा आणि फंगल इन्फेक्शनसारख्या रोगांवरही कोथिंंबीर हा चांगला उपाय आहे.
- कोथिंबीरच्या पानांमध्ये चिमूटभर हळद घालून याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 15 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग थंड पाण्याने तोंड स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील चमक वाढेल आणि चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्सदेखील निघून जातील.
त्वचेबरोबरच तुमच्या केसांसाठीही कोथिंबीर उपयुक्त आहे.
- तुम्हाला अतिप्रमाणात केसगळतीच्या समस्येला सामोरं जावं लागत असेल अथवा नैसर्गिकरित्या तुमचे केस तुम्हाला स्ट्रेट करून घ्यायचे असतील तर कोथिंबीरचा रस यासाठी उपयुक्त आहे. कारण यामध्ये केसांना आवश्यक असणारे विटामिन्स आणि प्रोटीन्स असतात. जे केसांची वाढ करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
- हिरव्या कोथिंबीरचा रस काढून तो केसांमध्ये लावा. मग 30 मिनिट झाल्यावर केस धुवा. यामुळे तुमच्या केसांची गळती थांबेल. तसंच तुमचे केस जर कुरळे असतील आणि तुम्हाला ते स्ट्रेट करायचे असतील तर कोथिंबीरची पेस्ट तुम्ही तुमच्या केसांना लावा आणि साधारण 2 तास केस तसेच ठेवा आणि मग नेहमीप्रमाणे शँपूने केस धुवा. असं केल्यामुळे तुमचे केस आपोआप स्ट्रेट होतील.
हे पण वाचा