आज्जीचा बटवा : पुराणात आणि आयुर्वेदात नारळाला आहे विशेष महत्व, का ते एकदा वाचाचं ?

0

नारळ हे भारतीयांसाठी केवळ एक फळ नाही तर भारतीय मानवी जीवनाचा एक भाग आहे. भारतीयांमध्ये नारळ या फळाचा उपयोग भरपूर प्रमाणात करतात. प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात नारळ फोडून करतात. पूजा केल्यानंतर प्रसादात नारळ हे असलेच पाहिजे. याबद्दल तर सर्वांना माहितीच आहे. पण नारळात काही औषधी गुणधर्म देखील आहेत. यामागील कारण हे खूप क्वचित लोक सांगू शकतात. चला तर जाणून घेऊयात नारळशी निगडीत काही गोष्टी…

नारळाचे पौराणिक महत्व

हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान नारळ हे फळ पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ म्हणतात. नारळचा वापर सगळ्यात जास्त मंदिरांमध्ये केला जातो. दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणात नारळ अर्पण केले जातात. या नारळाच्या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते, कारण या झाडाच्या सगळ्या अगांचा उपयोग करता येतो. नारळाला साधारणपणे तीन डोळे असतात, म्हणून त्याला शंकराचे प्रतीक समजतात. बुडाशी एकच भोक किंवा डोळा असलेल्या नारळास एकाक्ष नारळ म्हणतात. असा नारळ सापडणे शुभशकुन समजले जाते.

विष्णुपुराणात एकाक्ष नारळ श्री लक्ष्मी चे प्रतीक आहे. दिवाळी, कोजागरी पौर्णिमामध्ये, लक्ष्मी पुजामध्ये नरकल वापरतात. तसेच बंगाली समाजातील लोक लोख्खी पूजामध्ये शहाळी वा ताजे नारळ वापरतात. तांबे कलश किंवा मातिचा कुंभावर आणि शहाळी नारळावर सिंदूराने बंगाली हिंदु स्वस्तिक चिन्ह काढतात. या दिवशी भक्तीने शंखासहित लक्ष्मीनारायणाची पूजा करतात.

हिंदूंच्या धार्मिक विधींमध्ये नारळाला फार महत्त्व आहे. पूजेसाठी पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यावर बाजूंनी आंब्याची पाने लावून मधोमध नारळ उभा ठेवतात. शुभकार्यात पाहुणे मंडळींना नारळ देण्याची पद्धत आहे. तसेच इमारतीच्या पायाभरणीप्रसंगी आणि देवदेवतांसमोर नारळ फोडतात व खोबरे प्रसाद म्हणून वाटतात.भारतात रामायण, महाभारत व पुराणांत नारळाचा उल्लेख आढळतो परंतु वेदांमध्ये त्याच्या संबंधी उल्लेख नाही.

ओल्या नारळाला शहाळे असे म्हणतात. याचे पाणी शक्तिवर्धक, थंड व खनिजसंपन्न असते. आजारी, अपचन, जुलाब झालेल्या व्यक्तींना विशेष उपयोगी समजले जाते. शहाळ्यातून निघणार्‍या पक्व नारळाला शुभ प्रसंगी श्रीफळ म्हणतात.नाराळातीला सुख्या खोबरऱ्याला गोटा खोबरे म्हणतात. . कोकोनट लॅ. कोकॉस न्यूसिफेरा असे नारळाचे शास्त्रीय नाव आहे. याचा प्रसार उष्ण कटिबंधातील समुद्रकिनाऱ्याजवळच्या प्रदेशांत विशेष आहे. हिंदी व पॅसिफिक या महासागरांतील बेटांत नैसर्गिक अवस्थेत व गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांचे खालचे प्रदेश, द. भारत, मलबार, कोकण, कारवार, श्रीलंका इ. भागांत हे मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहे.

नारळाचा आरोग्यासाठी उपयोग

  • नारळाच्या झाडाला आपण कल्पवृक्ष म्हणतो ते काही खोटं नाही, नारळाचे बहुगुणी उपयोग आहेत.
  • नारळाचे पाणी, ओल्या नारळाचा खवलेला कीस, नारळाचे दूध, सुके खोबरे, नारळाचे तेल, नारळाची करवंटी हे सारं सौंदर्यवृद्धीसाठी महत्त्वाचं आहे. त्याचा उपयोग करून अनेक नामांकित तारकाही त्वचा तजेलदार ठेवतात.

त्वचा

  • पावसाळ्याच्या दिवसात चेहरा चिकचिकीत ऑईली होणे ही खूप मोठी समस्या तरुणींसमोर उभी राहते, त्यावर उपाय म्हणजे नारळाचे पाणी. ते आपण चेह-याला लावून ठेवले तर त्यामुळे त्वचा निर्मळ आणि नितळ राखण्यासाठीही मदत होईल.
  • ओल्या नारळाच्या गरामध्ये प्रथिने, तेल आणि इतर काही ऑरगॅनिक तत्त्व असतात त्यामुळे त्वचेला त्याचा फायदा होतो. निस्तेज व कोरडी त्वचा असलेल्यांनी नारळाच्या पाण्यामध्ये दुधावरील थोडी साय मिसळून त्याने त्वचेला हळुवार हाताने मसाज करावा, त्वचा ग्लो करेल.
  • नारळाचे पाणी व दूध त्वचेच्या क्लिंझिंगसाठीही उपयुक्त ठरतात . कोरडेपणामुळे जेव्हा त्वचा काळवंडलेली, निस्तेज आणि रखरखीत वाटायला लागते तेव्हा नियमित नारळाच्या दुधाने चेह-याला मसाज केल्यास त्वचा पुन्हा स्निग्ध तुकतुकीत दिसायला लागते.

गर्भधारणेनंतर

  • नारळाच्या पाण्याविषयी एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गर्भधारणेनंतर आठवडयातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी नियमित प्यायल्यास बाळाची कांती सुधारते आणि बाळाचा रंग उजळतो. शिवाय टॉनिक म्हणूनही ते उपयुक्त आहे.

केस

  • पावसाळ्यामध्ये केस धुणे म्हणजे एक मोठा प्रश्न असतो. केसासाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे. केस धुण्यापूर्वी साधारण एक तास आधी नारळाचे पाणी केसांना आणि टाळूला चोळावे. यामुळे केस मुलायम होतातच, शिवाय केसांच्या मुळांचे पोषण होऊन केस गळण्याचे प्रमाण कमी होऊन केसांची वाढ होते.

वजन कमी करण्यास उपयुक्त

  • नारळाच्या दुधात अधिक प्रमाणात फॅट्स असले तरी हे फॅट्स मीडियम चिल्ड फॅटी अ‍ॅसिड असतात. यामुळे हे फॅट्स शरीरात चरबीप्रमाणे साचत नाहीत. त्याचबरोबर नारळाच्या दुधामुळे बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.