शरीरात यूरिक ऍसिडची वाढ ही धोकादायक आहे. या ऍसिडमुळे संधिवात, तीव्र वेदना आणि सांध्यातील सूज येणे असा त्रास होतो. संधिवात झाल्यास तो कमी करणे खूप कठीण आहे. युरिक ऍसिड कमी करण्याचे बरेच मार्ग आहेत, परंतु सर्वप्रथम हे जाणून घेणे आवश्यक आहे की आपल्या शरीरातील यूरिक ऍसिडची पातळी कशी वाढत आहे.
प्रोटीनयुक्त पदार्थ तसेच इतर बर्याच गोष्टी खाल्ल्याने, शरीरात प्यूरिन नावाचा एक घटक तयार होतो, त्यानंतर त्याचे तुकडे होतात आणि ते यूरिक ऍसिडमध्ये बदलते. सहसा युरिक ऍसिड ते मूत्रमार्गे बाहेर पडते. परंतु जेव्हा शरीरात जास्त यूरिक ऍसिड असते तेव्हा स्थिती आणखी खराब होऊ लागते. अशा परिस्थितीत, बर्याच लोकांचा प्रश्न आहे की यूरिक ऍसिड कसे कमी करावे.
जेव्हा आपल्या आहाराद्वारे यूरिक ऍसिड वाढले जाते, तेव्हा काय खावे? असं प्रश्न निर्माण होतो. जर आपल्याला खरोखर यूरिक ऍसिड नियंत्रित करायचे असेल तर आपल्याला आपल्या यूरिक ऍसिड आहाराचे अनुसरण करावे लागेल, ज्यामध्ये काही गोष्टींचा समावेश असेल तसेच बर्याच गोष्टी टाळल्याही जातील.
प्रोटीनचे जास्त सेवन केल्याने शरीरात यूरिक ऍसिड वाढू शकतो. प्यूरिन नावाचे प्रोटीन शरीरात उच्च यूरिक ऍसिडसाठी जबाबदार आहे. आपण अशा प्रकारचे प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्यास आपण आपल्या आहारात काही बदल केले पाहिजेत. प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये चरबीयुक्त दूध, चीज, राजमा, मासे, मटण, अंडी इत्यादीचे सेवन कमी केलं पाहिजे.
यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी, आहारात फायबरयुक्त गोष्टी समाविष्ट करा. फायबरमुळे रुग्ण सूज, सांधेदुखीपासून मुक्त होऊ शकतात. बरेच पदार्थ आहेत जे फायबरने परिपूर्ण आहेत, आपल्याला त्यांचे सेवन वाढविणे आवश्यक आहे. फायबरने समृद्ध असलेले काही पदार्थ आहेत. वाटाणे, ब्राऊन राईस, सुकामेवा, ब्राऊन ब्रेड, फळे, डाळी, ब्रोकली, सोयाबीन, अवोकॅडो या पदार्थांची यूरिक ऍसिड कमी करण्यास मदत होते.
मानवी शरीराच्या चालण्यातच काय, तर ताठ मुद्रेत सुद्धा पायांचे अनन्यसाधारण महत्व आहे. चालताना आणि उभे राहिले असताना शरिराला संतुलित ठेण्यासाठी पायांच्या रचनेची महत्वाची भूमिका आहे. अमेरिकी शिशुरोग वैद्यकीय संघटना या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार मानवी पाय 50 वर्षे वयापर्यंत सरासरी 75, 000 मैल इतके चालत असतात. गुडघे, पायांची बोटे आणि टाचा दुखत असतील तर शरीरात युरिक अॅसिड वाढल्याचे समजावे. कोणतीही सांधेदुखी झाली आणि थोडय़ा दिवसांत बरी होत नसेल तर ‘युरिक अॅसिड’ वाढले असे सहजपणे म्हटले जाते. घरगुती उपायांनी ही समस्या दूर करता येते जसे…
- सकाळी रिकाम्यापोटी दोन -तीन आक्रोड खावेत.
- जेवणानंतर चमचाभर जवस चावून खाता येईल.
- कोरफडीचा रस आणि आवळ्याचा रस यांचे मिश्रण पिता येईल.
- दररोज नारळपाणी प्यायल्याने ही दूर होते.
- आहारात ओव्याचा समावेश करावा. पाण्यासोबत ओवा खाता येईल.
- चमचाभर अश्वगंधाची पूड, चमचाभर मध गरम दुधात घालून प्या. उन्हाळ्यात अश्वगंधाचे प्रमाण कमी ठेवावे.
- युरिक अॅसिडमुळे शरीरात गाठी होतात. हे टाळण्यासाठी पाण्यात चमचाभर बेकिंग सोडा घालून प्या. यामुळे गाठी विरघळतात.
हे पण वाचा
आज्जीचा बटवा: विड्याच्या पानांचे ‘हे’ औषधी गुणधर्म तुम्हाला माहित आहेत का ?
आज्जीचा बटवा : मुखशुद्धीसाठी असलेली विलायची आहे अधिक गुणकारी, जाणून घ्या फायदे….