fbpx
-1.2 C
London
Thursday, December 8, 2022

नक्की वाचा ! ‘या’ पोषक घटकांमुळे नाश्त्यामध्ये खातात रवा-उपमा

जर तुम्हाला नाश्त्यामध्ये खाण्यासाठी चांगले (स्वादिष्ट आणि निरोगी) पदार्थ मिळाले तर दिवसभर मूड चांगला असतो आणि तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टिविटीमध्ये पण चांगले परिणाम दिसतात. आता गरज फक्त आपले कार्य आणि आपल्या शरीराची आवश्यकता समजून घेण्याची आहे. परंतु आपल्यातील बर्‍याच जणांना हे कळतच नाही. चला तर जाणून घेऊयात रवा-उपमा आपल्या दिवसाची सुरुवात अधिक चांगली करण्यास कसे लाभदायी आहे…

दक्षिण भारतात सुजीला रवा म्हणतात. उत्तर भारत आणि हिंदी भाषिक राज्यांमध्ये रव्याचा शिरा नेहमी बनवतात. शिरा प्रत्येकजण उत्साहाने खातो. अशाचप्रकारे सुजीपासून तयार केलेला उपमा म्हणजे रवा उपमा. हे दक्षिण भारतातले लोकप्रिय खाद्य आहे.

रव्यातील गुणधर्म

  • रवा गव्हापासून बनविला जातो. हे फायबरने समृद्ध आहे म्हणून आपल्या पचनसंस्थेला हे पचन करणे सोपे जाते. -फायबरचे पचन हळू हळू होते, म्हणून फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने शारिरीक उर्जा लांब काळापर्यंत टिकून राहते.
  •  रव्यापासून बनवलेला उपमा खाल्ल्यानंतर तुम्हाला भूक लवकर लागणार नाही, पेंग येणार नाही आणि तुम्ही अधिक काळापर्यंत ऊर्जावान राहाल.

रवा उपमा खाण्याचे फायदे

  •  रवा उपमा तयार करताना त्यात भाज्या घातल्या जातात. म्हणजेच ते खाल्ल्याने तुम्हाला संपूर्ण पोषण मिळते.
  • रवा उपमा बनवण्यासाठी शेंगदाणे आणि ड्राय फ्रूट्स वापरतात. हे खाल्ल्याने तुम्हाला सर्व आवश्यक अमीनो एसिडस्, ओमेगा -3 फॅटी एसिडस्, फॉलिक एसिड आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात.
  • रवा उपमा फॅटफ्री आणि कोलेस्टेरॉल फ्री असतो. तर आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठीही हा एक उत्तम नाश्ता आहे.

स्वादिष्ट नाश्ता

  • रवा उपमा खायला खूप स्वादिष्ट आणि आरोग्यासाठीच्या गुणांनी देखील भरपूर आहे. म्हणूनच, दक्षिण भारतातील या पदार्थाने देशातील प्रत्येक भागात आणि प्रत्येक घरी आपले स्थान बनवले आहे.
  • आज पोहा (मुख्यत: मध्य भारतीय आहार), दही चुडा (मुख्यत: बिहारी पदार्थ), रवा उपमा आणि इडली (दक्षिण भारतीय खाद्य) यांनी आपापल्या राज्यांच्या सीमा ओलांडल्या आहेत आणि हे राष्ट्रीय खाद्यपदार्थ झाले आहेत.
  • याचे मुख्य कारण म्हणजे हे पदार्थ तयार करण्यास कमी वेळ लागतो. हे पदार्थ पोषक तत्वांनी समृद्ध असतात आणि तेलाच्या कमीपणामुळे स्वास्थ्याला हानी पोहोचत नाही. यासह, हे पदार्थ पचनासाठी खूप चांगले आहेत म्हणून त्यांना खाल्ल्यानंतर सुस्तपणा जाणवत नाही.
Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here