fbpx
3.5 C
London
Wednesday, December 7, 2022

नक्की वाचा ! धान्य खाणे तुमच्या स्वास्थ्यासाठी आहे किती लाभदायी…

धान्य हे कायमंच आपल्या आहाराचा अविभाज्य घटक राहिलेले आहेत. मानवी जीवनाच्या उगमापासूनच आहारामध्ये धान्यांचा समावेश आहे,असे म्हटले जाते. आपले पूर्वज आपल्या आहारामध्ये फक्त पूर्ण धान्य सेवन करत होते, ते निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगले. आज, जसे आपण आधुनिक आहाराच्या पर्यायांवर तुटून पडत आहोत, तरी आपले आरोग्य पूर्वीसारख्या लोकांसारखे नाही. तेव्हा लोक दिवसातून चार वेळा जेवणात फक्त धान्य खात होते! धान्य आपल्या आरोग्यासाठी ‘चांगले आहेत की वाईट’ यामुळे नेहमीच तुमचा नक्की गोंधळ उडत असणार. चला तर जाणून घेऊयात पूर्ण धान्यांचा आहारामध्ये समावेश केल्याचे फायदे…..

हृदयरोगाचा धोका कमी

आम्हाला माहित आहे की, हृदयविकारामुळे जगात जास्तीत जास्त मृत्यू होत असतात. अनेक संशोधनात असे आढळले आहे की, संपूर्ण धान्याच्या सेवनाने हृदयाच्या समस्येचा धोका 22% कमी केला जाऊ शकतो. हृदयाच्या आरोग्यास नीट ठेवण्यासाठी लोकांनी अधिक धान्य आणि कमीतकमी रिफाईंड ग्रेन्स खावे. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होईल.

स्ट्रोकपासून बचाव

संपूर्ण धान्य अ‍ॅन्टिऑक्सिडेंट्स, फायबर आणि व्हिटॅमिन के सारख्या महत्वाच्या पोषक द्रव्यांसह समृद्ध आहे. जे स्ट्रोक प्रतिबंधासाठी उत्कृष्ट आहेत. संपूर्ण धान्य आहारात घेतल्याने स्ट्रोकचा धोका जवळपास 14% कमी होतो. अनेक तज्ज्ञांच्या आहारामध्ये धान्य खाण्याचे महत्त्व सांगितले आहे. आपल्या नियमित ब्रेडला हेल्दी ब्रेडसह बदलून घ्या.

लठ्ठपणापासून बचाव

लोकांच्या गैरसमज आहे की,धान्य वजन आणि लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत असतात. परंतु याउलट धान्यांमधे उच्च फायबर सामग्री असते. जे सेवन केल्यामुळे बऱ्याच काळ भूक लागत नाही. यामुळे आपण कुठल्याही वेळी खाणार नाही आणि तुमचे वजन आटोक्यात राहील.

टाइप -2 मधुमेहाचा धोका कमी करतो.

आरोग्याशी निगडित गोष्टींसाठी धान्य हे लाभदायी आहेत. तसेच धान्य मधुमेहासारख्या समस्येसाठीदेखील मदत करते. धान्य सेवन केल्याने लठ्ठपणापासून बचाव होते, जो टाइप -2 मधुमेहासाठी एक मुख्य धोका असतो.

पचनशक्ती वाढवते

धान्यामध्ये फायबर हा मुख्य घटक असतो. बहुतेक आरोग्याच्या परिस्थितीत फायबर उपयोगी असते. उच्च फायबर आहार घेतल्याने पाचनशक्ती चांगली होण्यास मदत होते कारण ती आतड्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवते. यामुळे पोटात होण्याऱ्या बद्धकोष्ठता, गॅस, अतिसार इत्यादी समस्या कमी होतात. म्हणून धान्य आहारात घेतल्याने पचनशक्ती वाढते.

कर्करोगाचा धोका कमी

कर्करोग हा सर्वात भयानक आजार आहे. पहिल्या स्टेजमध्ये कर्करोगाचे निदान न झाल्यास एखाद्याचे आयुष्य धोक्यात पडते. कर्करोगापासून सुरक्षित राहण्यासाठी, धान्य आहारात घ्या. धान्यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असल्याचे म्हटले जाते. यात आश्चर्य नाही की, आमचे पूर्वज निरोगी आणि दीर्घायुष्य कसे जगले.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here