दुधाचे सेवन नक्की कसे करावे याबाबत अनेकांना संभ्रम असतो. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला योग्य पद्धतीने दुधाचे सेवन कसे करावे याबाबत सांगणार आहोत. फक्त इतकेच नाही तर गायीचे दूध प्यायल्याने कुठल्या प्रकारचे फायदे होतात हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दूध पिण्याची योग्य वेळ
- सकाळी नाष्ट्यामध्ये दूध घेतले जाऊ शकते. परंतु दुधासह, हलका आहार घ्यावा ज्यामध्ये मीठ असलेले पदार्थ नाहीत. मीठाचे पदार्थ कधीही दुधाबरोबर खाऊ नये.
- 24 तासांत एकदा दूध घ्या. परंतु हे लक्षात घ्या की दूध पिण्यापूर्वी मिठाचे किंवा आंबट पदार्थ खाऊ नयेत आणि दूध पिल्यानंतर लगेच मिठाचे किंवा आंबट पदार्थ खाऊ नये.
- रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही दुध घेऊ शकता. परंतु जेवणानंतर कमीतकमी दोन तासांच्या अंतराने दूध घ्यावे. तरच आपल्याला त्याचा पूर्ण लाभ मिळेल.
दूध पिण्याचे फायदे :
- दूध पिण्यामुळे कॅल्शियम आणि मेंदूचा विकास होतो. या गोष्टी सामान्यत: मुलांसाठी योग्य मानल्या जातात. कारण मोठ्यांना वाटते की त्यांच्या मेंदूचा जितका विकास व्हायचा होता, तो झाला आहे.
- दूध प्यायल्याने डोकं आणि शरीर शांत होते. मानसिकदृष्ट्या देखील दूध घेणे चांगले आहे.
- जर तुम्ही दुधात थोडी हळद मिसळून प्याल तर तुमच्या शरीराच्या वेदना कमी होतील. कारण दूध आणि हळद एकत्र पेन किलर म्हणून काम करतात. जे वेदना नष्ट करतात.
धूम्रपान सोडण्यास मदतगार
हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल की, “धूम्रपान व्यसन सोडण्यास कोणते पदार्थ प्रभावी ठरू शकतात?” या विषयावरील संशोधनात असे दिसून आले आहे की, दूध पिल्याने धूम्रपान करण्याची तलब कमी होऊ शकते. संशोधनाशी संबंधित तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एखादी व्यक्ती धूम्रपान करण्याची तलब उठल्यास जर एक एक घुट घेत दुधाचे सेवन करीत असेल तर काही आठवड्यांत त्याच्या इच्छाशक्ती आणि दुधाच्या गुणांमुळे तो स्मोकिंगच्या तलबवर नियंत्रण ठेवू शकतो.