आज्जीचा बटवा : नक्की वाचा ! उग्र वासाच्या आल्याचे ‘हे’ आहेत औषधी गुणधर्म

0

भाजीला स्वाद आणण्यासाठी आल्याचा वापर पक्वान्नात नेहमीचं केला जातो. खास म्हणजे अद्रक चहा तर बहुतेकांच्या आवडीचे पेय असते. त्यामुळे भारतीयांच्या प्रत्येकाच्या घरात अद्रक हमखास पाहिला मिळते. अद्रक ही औषधी वनस्पती आहे. औषधीय गुणांनी समृद्ध असलेल्या ( अद्रक )  आल्याबाबत  तुम्ही अधिकपणे परिचित नसाल याची आम्हाला खात्री आहे. चला तर मग जाणून घेऊयात अद्रकाचे औषधी गुणधर्म

आले हे महत्त्वाचे मसाल्याचे पीक असुन त्याची लागवड मे महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात करतात. हे पीक उष्ण हवामानात चांगले येते. आले हे चवीसाठी खाल्ले जाते वा औषध किंवा मसाला म्हणून स्वयंपाकात वापरले जाते. हळदी प्रमाणेच ‘जमिनीखालील मुळी’ म्हणून याला ओळखले जाते. आल्याच्या लागवडीची दीर्घकालीन परंपरा आहे. आशिया खंडात भारतात, तसेच दक्षिण आशिया, पश्चिम आफ्रिका व कॅरिबियन बेटे येथे त्याची लागवड केली जाते. काही वस्तूंच्या नावापासून वेगळेपणा जपण्यासाठी आल्यास काही ठिकाणी ‘आल्याचे मूळ’ असेही म्हणतात.

अद्रकास हळद इलाईची व काळे मिरे या समान पवित्र व गुणकारी मानले जाते. भारतीय उपखंडात या वनौषधीचा वापर भारतीय आयुर्वेदिक उपायांमध्ये केला गेला. नंतर इंग्रजांनी युरोपात याची आयात केल्यानंतर भारतभर याची शेती व व्यापार सुरु झाला. अशाप्रकारे हे संपूर्ण भारतातील परिवारांच्या स्वयंपाक घरात पोहोचले.

अद्रकाचे अनेक प्रकार आहेत. त्यात पिवळा व पांढरा गर असे दोन प्रमुख प्रकार आहेत. पांढरा जास्त स्वादासाठी तर पिवळा कमी तीव्र स्वादासाठी ओळखला जातो.
अद्रक पूर्णपणे सुकवूनही वापरले जाते. हे फार कमी प्रमाणत खराब होते. सुकल्यावर हे “सुंठ” म्हणून संबोधले जाते. ह्याचा वापर अनेक ठिकाणी होतो.

अद्रकाचा वापर आयुर्वेदिक औषधीमध्ये केला जातो. भारतात घरगुती औषधामध्ये अद्रक बऱ्याच प्रमाणत वापरले जाते. विविध खाद्यपदार्थात जसे ज्यूस,मुरांबे,मसाला भाज्या मध्ये अद्रकाचा वापर होतो.

अद्रकाचे औषधी गुण

  • मळमळी वर उत्तम औषध : उलटी व मळमळीची समस्या उदभवल्यास अद्रकाचा काप शहदासोबत तोंडात ठेवून चावल्यास मळमळ नाहीशी होते. गळ्यातील कफ खोकला ज्यात फार कफ येतो. त्यावर अद्रकाच्या रसात शहद मिळवून घेतल्यास लवकरच आराम मिळतो.
  • भूक वाढविणे : अद्रकातील उग्रगन्धामुळे व तीव्र स्वादामुळे तोंडातील ग्रंथींना बेचव वाटणारे अन्न चवीचे वाटू लागते. अद्रकाचे काप जेवण्याआधी तोंडात ठेवून चावल्यानंतर काहीवेळानी जेवल्यास अन्न चविष्ट लागते. त्यामुळे भूक वाढते.
  • पोटातील समस्या : अपचन, पोट दुखणे, पोटात वायू जमा होणे यावर रोज सकाळी शहदासोबत अद्रकाचा रस कोमट पाण्यासोबत घेतल्यास. पोटातील समस्या दूर होतात.
  • सर्दीपासून बचाव : सर्दीत गळ्यात कफ होतो. नाकाच्या नासिका बंद पडतात. अशा वेळी २ चम्मच अद्रक रस व शहद कोमट पाण्यासोबत सर्दी बसेपर्यंत घेतल्यास सर्दी बरी होण्यास मदत होते.
  • शरीरात कामोत्तेजना वाढविणे : आयुर्वेदात बऱ्याच ठिकाणी अद्रकाचा वापर शरीरात यौन इच्छा अधिक प्रबळ करण्यासाठी व अधिक परिणामकारक करण्यासाठी होतो. याचे उल्लेखही सापडतात.
  • शरीराच्या सांध्याच्या दुखण्यावर परिणामकारक : रोज सकाळी उन्हात बसून अद्रकाच्या तेलाची सांध्यावर चांगली मालिश करून गरम पाण्याने आंघोळ केल्यास सांध्यांच्या दुखण्यात कमतरता येते. ह्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.
  • रक्तप्रवाह सुरळीत करणे :  अद्रकात झिंक मॅग्नेशियम आणि क्रोमियम सारखे खनिज असतात. त्यामुळे अद्र्काचे शहदासोबत सेवन पहाटे निर्जळी केल्यास रक्त प्रवाह बऱ्याच प्रमाणात सुरळीत होतो.
  • श्वासासंबंधी समस्यावर प्रभावशाली : अद्रकाचा उग्र गंध व तीव्र स्वाद यामुळे हे एक बहुगुणी एक्स्पेटोरांट मानल्या जाते. हे श्वास नलिकेतील घाण बाहेर काढणे, श्वास घेण्यास त्रास व दम भरणे यावर प्रभावशाली औषध मानले जाते. अद्रक कुटून एका कपड्यात टाकून त्याचा ताजा गंध नियमित घेतल्यास श्वासासंबंधी अनेक समस्या दूर होतात.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.