आज्जीचा बटवा : टोमॅटोचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?

0

‘टमाटर’ हा शब्द ऐकला की आठवते ‘ टमाटरची चटणी’ आणि नक्कीच चटणीच नाव वाचून तुमच्या तोंडाला पाणी सुटले असेल. टमाटरला ‘टोमॅटो’ म्हणून जास्तकरून संबोधले जाते. टोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे.

लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात टोमॅटोचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. खाण्याशिवाय वजन कमी करण्यांमध्ये आणि अनेक आजारांचा सामना करण्यात टोमॅटो गुणकारी आहे. आज आजीच्या बटव्यामध्ये जाणून घ्या, किचनमध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या टोमॅटोचे आरोग्यदायी फायदे…

  • टोमॅटोही अक्षरक्षः गुणांची खाण आहे. यामध्ये व्हिटॅमीन के आणि कॅल्शिअम आढळतं. ही दोन्ही तत्त्वं हाडांना मजबूत करण्यात आणि हाडांची दुरूस्ती करण्यात उपयोगी पडतात. तसंच टोमॅटोमधील व्हिटॅमीन सी आणि अँटीऑक्सीडंट हाडातील दोष दूर करण्यास मदत करतं.
  • टोमॅटोमध्ये एन्टी ओक्सिडेंट गुण असतात. जे आपल्या शरीरात कॅन्सर पसरवणाऱ्या सेल्स ची वाढ होऊन देत नाही. जर आपण रोज एक टोमॅटो खात असाल तर आपला शरीर निरोगी आणि सुरक्षित राहील.
  • जर आपण रोज एक टोमॅटो खात असाल तर आपल्या शरीरात वाहणारा रक्त योग्य प्रकारे कार्य करतो. जर आपण टोमॅटो खात नसाल तर त्याचा सूप बनवून पिऊ शकता तसेच भाजी मध्ये त्याचा उपयोग करू शकता. आपल्या शरीरातील रक्त संचारन योग्य प्रकारे चालेल. आपला रक्त अजून लाल गडद होईल.
  • जर आपल्याला डोळ्यांच्या संबंधी काही समस्या असतील तर आपण टोमॅटो चे रोज सेवन करा आपल्याला फायदा होईल. आपल्या डोळ्यांची नजर चांगली होईल व आपले डोळे अधिक सुंदर दिसतात. टोमॅटो मध्ये विटामिन A व विटामिन C दोन्ही भरपूर प्रमाणात असतात आणि हे डोळ्यांसाठी खूप फायदेमंद असतात.

Tomato (1)

  • टोमॅटो मध्ये केरोटीन नावाचे एक तत्व असते. जो आपल्या शरीरातील वेदना दूर करण्यासाठी मदत करतो. जर आपल्याला सांधेदुखी चा त्रास असेल किंवा संधिवात असेल आणि हे आजार जर आपल्याला दूर करायचे असतील तर रोज टोमॅटो चे सेवन करायला सुरवात करा. कारण यात असलेले औषधी गुण आपला सांधेदुखी सारखा आजार दूर करण्यास मदत करेल टोमॅटो मध्ये पाण्याची मात्रा भरपूर असते आणि टोमॅटो मध्ये फायबर ही उचित मात्रेत असतो. तर आपण रोज टोमॅटो चा सेवन करत असाल तर आपला वजन कमी होण्यास मदत होईल आणि आपण निरोगी व तंदुरुस्त राहाल.
  • जर आपल्याला पोटासंबंधी समस्या असतील किंवा आपल्या पोटात जंत झाले असतील तर टोमॅटो कापून त्यात हिंग घालून त्याचे सेवन करा, आपल्याला फायदा होईल. किंवा कच्चा टोमॅटो कापून त्यात काळी मिरी पावडर टाकून 2 ते ३ दिवस याचे सेवन करत असाल तर हे आपल्यासाठी लाभदायी ठरेल. आणि आपल्याला गॅसची समस्या होणार नाही. तसेच अस्वस्थ व अतिसार सारख्या समस्या देखील होणार नाहीत.
  • जर तुम्हाला लो किंवा बैचेन वाटत असेल तर टोमॅटो ज्यूस प्या. कारण टोमॅटोचा ज्यूस शरीराला उर्जा देतो.
  • टोमॅटोचं सेवन हाय बीपीने त्रस्त असलेल्या लोकांसाठीही फायदेशीर आहे. कारण टोमॅटोमध्ये पॉटेशिअम भरपूर प्रमाणात आढळतं. त्यामुळे टोमॅटोचा एक कप ज्यूसही फायदेशीर आहे. हृदयरोगांमध्येही टोमॅटो ज्यूसचं सेवन गुणकारी असतं. पण हा ज्यूस घेण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
  • टोमॅटोचा ज्यूस फक्त मोठ्यांनाच नाहीतर लहानांसाठीही फायदेशीर आहे. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासात यामुळे मदत होते. याशिवाय मुलांच्या पोटात जंत झाल्यास सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो ज्यूसमध्ये काळीमिरी घालून दिल्यास फायदा होतो.
  • टोमॅटोमध्ये व्हिटॅमीन ए आणि सी आढळतं, जे डोळ्यांची नजर वाढवण्यास मदत करतं.  याशिवाय टोमॅटोमुळे डोळ्यांना होणारा रांताधळेपणाही कमी होतो. टोमॅटो मोतीबिंदूची वाढही रोखतो.

(ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला अभिप्राय (Feedback) कळवा )

हे पण वाचा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.