आज्जीचा बटवा:  विड्याच्या पानांचे ‘हे’ औषधी गुणधर्म तुम्हाला माहित आहेत का ? 

0

‘विड्याचे पान’.. ‘पान हो तो बनारसी हो’ असा डायलॉग तुम्ही ऐकलाच असणार. त्यासोबत ‘ ओ खैके पान बनारस वाला’ हे डॉनमधील प्रसिद्ध गाणं देखील तुम्ही नक्की ऐकले असेल. आपल्यातील बहुतेकांना पान खायला आवडते. आपल्यातील काहींच्या आज्जी-आजोबांना जेवणानंतर पान खाण्याची सवय असेल. छान झणझणीत मटण, चिकन असा मांसाहारी आहार घेतल्यानंतर ‘मसाला पान’ खाणे तर आपणा सर्वांचा छंद आहे. मसाला पान असे नाव जरी घेतले तरी सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. पान खाण्याची एक प्रकारे चटकच लागते. तर, ही सवय कुणाकुणाला आवडत नाही.पान खाल्ल्यानं दात खराब होतात, असं आपल्याला वाटत असेल. पान खाणं ही वाईट सवय नसून विड्याचं पान आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
विड्याच्या पानाला धार्मिक महत्त्व देखील आहे. पान खाण्याचे अनेक औषधी उपयोग आहेत. म्हणूनच आज्जीच्या बटव्यात आज आम्ही तुम्हाला ‘विड्याच्या पानाचे’ आरोग्यदायी उपयोग सांगणार आहोत.

विडा अर्थात पान, हा भारतीय उपखंड व आग्नेय आशियात  चघळला जाणारा पदार्थ आहे. कथ्था,  चुना,  सुपारी हे आवश्यक घटक नागवेलीच्या (इतर ठिकाणी बंगला आणि कपूरी पान देखील वापरतात.) पानावर ठेवून पानाची पुरचुंडी केली की विडा बनतो. याशिवाय आवडीनुसार त्यात मुखशुद्धी करणारे ओवा, बडीशेप, चव वाढवायला गुलकंद देखील टाकले जाते. विड्यासाठी वापरायच्या पानाचेही तिखट कलकत्ता पान, पूना पान, बनारसी, छोटे जोडीने घेतले जाणारे मघई पान आदी प्रकार आहेत.
हिंदू धर्मात पानाचे फार महत्त्व आहे. कुठल्याही कामासाठी विड्याच्या पानाचे आपले वेगळे महत्त्व आहे. पूजेत पानाचे वापर देवांच्या अंघोळीसाठी केले जाते आणि पानाने त्यांच्यावर जल अर्पित करण्यात येते. एखाद्या जागेच्या शुद्धीकरणासाठी विड्याच्या पानाचा वापर केला जातो.

औषधी उपयोग:

  • जर आपल्याला हिरड्यांचा काही त्रास असेल किंवा आपले दात दुखत असतील तर विड्याच्या पानात दहा ग्राम कापूर मिसळावा आणि हे पान चावून-चावून खावं. मात्र, पान हिरवं असावं पिवळं असू नये. असं पान खाल्ल्यानं आपली दातदुखीची समस्या दूर होईल.
  • आपल्याला गुडघेदुखीची समस्या असेल किंवा आपल्याला पायाला काही लागलं असेल, तर विड्याच्या पानाला तूप लावून ते तव्यावर गरम करावे. असं गरम-गरम पान त्रास होत असलेल्या ठिकाणी लावावे. त्यानं आपला गुघडा शेकला जातो आणि तिथले दुखणेही कमी होते.
  • जर आपल्याला सर्दी झाली तर विड्याच्या पानात लवंग टाकून ते खावे. जर पान खूप कडू लागत असेल तर आपण यात साखरेची गाठी टाकू शकता.
  • विड्याच्या पानात विलायची, पेपरमिंट, लवंग, गुलकंद किंवा मध टाकून बनवलेला विडा खावा. असा विडा खाल्ल्यानं आपल्या शरीरातील आळस, थकवा दूर होतो आणि निद्रानाशाची समस्या सुद्धा दूर होते.
  • जर आपल्याला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल तर विड्याचं पान डोक्यावर लावावं. जर डोकेदुखी जास्त असेल तर आपण पानाचा रस काढून तो डोक्यावर लावावा.
  • श्वास घेण्यात आपल्याला त्रास होत असेल किंवा छातीत जळजळ होत असेल तर आपण पानावर तूप किंवा तेल लावून तव्यावर पान ठेवून त्यानं छाती शेकावी. असं केल्यानं कफ पण सुटतो आणि जळजळही कमी होते.
  • अनेक गायकांना तुम्ही पानाचं सेवन करताना पाहिलं असेल. कारण पानाचं सेवन केल्याने तुमचा आवाज स्वच्छ आणि पातळ होतो. विड्याच्या पानाचं पाणी प्यायल्यास तुमच्या गळ्याशी संबंधित अनेक समस्याही दूर होतील.
  • विड्याच्या पानाला सर्वात उत्तम माऊथ फ्रेशनर मानलं जातं. कारण या पानांमधील घटक आपल्या तोंडाची दुर्गंधी दूर करतात. यामुळे विड्याच्या पानाचा वापर हा जास्तकरून माऊथ फ्रेशनर म्हणून केला जातो.
  • पानाचा वापर हा चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग किंवा मुरूमापासून सुटका मिळवण्यासाठीही केला जातो. कारण पानांमध्ये असतात अँटी बॅक्टेरियल गुण जे तुमच्या त्वचेला फंगल इन्फेक्शनपासून वाचवतात. पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी विड्याची 8 ते 10 पान घेऊन वाटून घ्या. मग ही वाटलेली पान दोन ग्लास पाण्यात मिक्स करून ते पाणी चांगल आटेपर्यंत उकळून घ्या. आता हा फेसपॅक चेहऱ्यावर वापरा. यामुळे तुमचे पिंपल्स दूर होतील आणि चेहरा डागविरहीत होईल.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.