fbpx

लापर्वा होऊ नका ! कोरोनाला हरवण्यासाठी ‘हर्ड इम्युनिटी’ पुरेशी नाही, धोका अजून कायम आहे

0

जगभरात लाखो लोकांना आपल्या कवेत घेणाऱ्या कोरोनाचा नायनाट होणार केव्हा असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. अनेक संशोधक, वैज्ञानिक, डॉक्टर्स या विषाणूवर जालीम औषध शोधत आहेत. मात्र अजूनही कोणत्याही देशाला यावरील ठोस औषध सापडलेले नाही. असे असतानाचं मध्यंतरी एक रिपोर्ट समोर आला होता. या रिपोर्ट मध्ये समाजात हर्ड इम्युनिटी वाढत असल्याची माहिती आली होती. याचाच अर्थ कोरोनाशी लढण्यासाठी समाजात हर्ड इम्युनिटी वाढत असल्याने आता संसर्ग होण्याचे प्रमाण घटणार आहे, असे या रिपोर्ट मध्ये म्हंटले होते.

मात्र याच निष्कर्षावर आक्षेप घेत दिल्लीतील तज्ञ डॉक्टरांनी हर्ड इम्युनिटीने या रोगावर नियंत्रण मिळवता येणार नाही, असा निष्कर्ष काढला आहे. कोरोना हा एक महाभयंकर विषाणू आहे. त्यामुळे केवळ हर्ड इम्युनिटीच्या जोरावर त्याचे संक्रमण थांबू शकत नाही.

याबाबत Institute of Liver and Biliary Sciences चे संचालक डॉ. एस.के. सरीन यांनी म्हटले की, ‘हर्ड इम्युनिटी’ हा काही पर्याय होऊ शकत नाही. सरीन आणि त्यांच्या पथकाने दिल्लीत अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत. प्रत्येक 5 कोरोना रुग्णांपैकी 1 रुग्णांमध्ये योग्य प्रमाणात Antibodies तयार झाल्याचं आढळून आलं नाही. याचाच अर्थ अजूनही कोरोनाच्या संसर्गाची भीती कायम आहे. जो पर्यंत ठोस औषध येणार नाही, तो पर्यंत काळजी घेणे अनिवार्य आहे.

दरम्यान मुंबईत झालेल्या सिरो सर्वेक्षणात असे आढळले आहे की भिवंडी आणि ठाणे येथे अॅॅन्टीबॉडीज चाचणीचे प्रमाण 47.1 % आहे. मुंबईत 5485 जणांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 1,501 म्हणजे 27.3 टक्के लोकांना अॅॅन्टीबॉडीज असल्याचे आढळले. मुंबईतील सिरो सर्वेक्षणानुसार 57 टक्के लोकसंख्या झोपडपट्टी भागात आणि झोपडपट्टीच्या बाहेरील भागात राहते. त्यामुळे 16 टक्के लोकांच्या शरीरात अॅॅन्टीबॉडीज आढळून आले आहेत. यावरून हे सूचित होते की, अधिकृत आकडेवारीपेक्षा अधिक लोकांना यापूर्वीच कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

काय आहे हर्ड इम्युनिटी?

हर्ड इम्युनिटी ही एक प्रक्रिया आहे. यामध्ये रोग प्रतिकारशक्ती विकसित होते. ही रोग प्रतिकारशक्ती विषाणूच्या संसर्गामुळे किंवा लसीमुळे विकसित होऊ शकते. जर ही रोगप्रतिकारक क्षमता एकूण लोकसंख्येच्या 75 टक्के इतकी विकसित झाली तर ती हर्ड इम्युनिटी मानली जाते. मग चारपैकी तीन जण संक्रमित व्यक्तीसभेटले तरी त्यांना हा आजार होणार नाही आणि ते त्याचा प्रसार करणार नाहीत.

सूचना : असेच आणखी लेख वाचायचे असतील तर आमच्या https://www.facebook.com/imp.amarvani/ या फेसबुक पेजला भेट द्या

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.