आज्जीचा बटवा : तुमच्या आवडीच्या मसूर डाळीचे हे सुद्धा आहेत फायदे…

0

आज्जीच्या बटव्यामध्ये आज आम्ही तुम्हाला मसूर डाळीसोबत ओळख करून देणार आहोत. आज आपण एक असा सत्वांचा खजिना पाहणार आहोत ज्यासाठी तुम्हाला काही वेगळा खर्च करावा लागणार नाही. उलट रोजच्या जेवणातच हा पदार्थ सामील करून तुम्ही असंख्य फायदे मिळवू शकाल. हा पदार्थ म्हणजे मसूर डाळ  मसूर डाळ ही सर्वांच्या परीचयाची आहे. तुमच्यातील बहुतेकांना मसूर डाळीची केलेली भाजी आवडीची असेल. मसुर डाळीचे अनेक उपयोग आहेत. फक्त भाजी आणि चटणीकरताच नाही तर मसूर डाळीचे अनेक फायदे आहेत. तर मसूर डाळीचे आरोग्य आणि सौंदर्याकरता ही आहेत चांगले फायदे. चला तर जाणून घेऊयात मसूर डाळीचे अनेक फायदे…

  • मसूरच्या डाळी मध्ये फॉस्फरस असते जे कॅल्शियम सोबत मिळून हाडांची मजबुती वाढवण्यात मदत करते.
  • मसूरच्या डाळीत असणाऱ्या व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुले डोळ्यांचे रोग दूर राहतात.
  • शक्यतो वर्क आऊट नंतर मसुराची डाळ खाणे हे प्रोटीन मिळवण्यासाठी मदत करते.
  • मसूर मधील कोलेजन ही त्वचेची लवचिकता वाढवते. त्यामुळे त्वचा टवटवीत दिसण्यास मदत होते
  • या डाळीतले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठ वर चांगला उपाय ठरतात. मसूर डाळ आहारात घेतल्यानंतर आतड्यांची हालचाल वाढते. परिणामी मेटाबॉलिझम सुधारते.
  • या डाळी मध्ये भूक भागवण्याची क्षमता असते, त्यामुळे अगदी बाऊलभर सूप सुद्धा समाधानकारक आहे. म्हणून अनेकदा त्याचा डाएट मध्ये समावेश केला जातो.
  • या डाळीतले ‘मॉलेब्डेनम’ हे द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करतात.

मसूर डाळीच्या पावडरच्या फेसपॅकचे फायदे :

  • चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी घरगुती उपाय मसूर डाळीचा फेसपॅक मदत करतो. मसूर डाळीत प्रोटीनची मात्राही चांगली असते. त्यामुळे त्वचेला याचा नक्कीच फायदा होतो. मसूर डाळीच्या फेसपॅकचा वापर केल्याने चेहऱ्यावरील वांग कमी होऊन त्वचा टोनही होते.
    यासाठी तुम्हाला लागेल 1 चमचा मसूर डाळ पावडर, 1 चमचा मध. हे दोन्ही घटक चांगले मिक्स करून घ्या. हे मिश्रण लावण्याआधी चेहरा चांगला धुवून घ्या आणि मगच हे मिश्रण लावा. हलक्या हाताने मालीश करत हा फेसपॅक 15 मिनिटांनी धुवून टाका.
  • बेसन आणि दह्यासोबत मसूर डाळीचा फेसपॅक बनवा. यासाठी लागणारं साहित्य आहे 1 चमचा मसूर दाळ पावडर, 1 चमचा बेसन, 1 चमचा दही आणि 2-3 चिमूट हळदीचा वापर करा. हे मिश्रण चांगलं मिक्स करून चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. चेहरा संपूर्ण सुकल्यावर ओल्या हाताने हळू हळू चेहरा साफ करा. या फेसपॅकने चेहऱ्यावरील मृत त्वचाही दूर होते. बेसन आणि दही सोबत मसूर डाळीचा फेसपॅक त्वचा उजळण्यास मदत करतो. तुमच्याकडे एखादं खास फंक्शन किंवा सण असेल तर तुम्ही याचा उपयोग उटणं म्हणूनही करू शकता. चेहरा उजळण्यासोबतच चेहऱ्यावरील डागही दूर होतात. पण चेहरा उजळण्यासाठी याचा वापर रोज करू नका, काही दिवसांच्या अंतराने करा.
  • जर तुमच्या चेहऱ्यावर रासायनिक स्क्रबचा वापर करत असाल तर सावधान व्हा. कारण तुमच्या चेहऱ्याला यामुळे नुकसान पोचू शकतं. याऐवजी नैसर्गिक आणि घरगुती उपाय म्हणून मसूर डाळीचा स्क्रब वापरा. यामुळे काही नुकसान होणार नाही.
  • मसूर डाळीच्या पावडरचा तुम्ही स्क्रब तयार करू शकता. फक्त यासाठी ही पावडर थोडी जाडसर असावी. या पावडरमध्ये थोडं पाणी मिक्स करून पेस्ट बनवा आणि चेहऱ्याला लावा. सुकल्यावर धुवून टाका. पण स्क्रबिंग करताना तुमच्या हाताने चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायला विसरू नका.
  • एक मूठ मसूर डाळा पाण्यात भिजवून ठेवा. यामध्ये 5-8 थेंब गुलाब जल मिक्स करा. रात्रभर तसंच ठेवून सकाळी बारीक वाटून घ्या. मग चेहऱ्यावर लावा. तुमची त्वचा नक्कीच तेलविरहीत दिसेल.

ज्यांची त्वचा तेलकट असेल त्यांच्यासाठीही मसूर डाळीचा फेसपॅक फारच उपयुक्त आहे. तुमचीही त्वचा तेलकट असेल तर या फेसपॅकचा नक्की वापर करा. तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि तेलकटपणा घालवण्यासाठी या फेसपॅकचा आठवड्यातून दोनदा वापर करा.

  • एका बाऊलमध्ये मसूर डाळ पावडर आणि दूध घ्या. रात्रभर हे मिश्रण भिजत ठेवा. सकाळी हे मिश्रण वाटून ते चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 20 मिनिटांनी थंड पाण्याने धुवून टाका.
    ज्यांची त्वचा कोरडी आणि निस्तेज असते त्यांनी हा फेसपॅक नक्की वापरावा. याचा वापर केल्यास तुम्हाला चेहरा मऊ आणि तजेलदार झाल्याचं जाणवेल. मध त्वचेला निरोगी ठेवतो तर मसूर डाळ प्रभावी स्क्रबिंग एजंट म्हणून काम करते. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर आठवड्यातून एकदा तरी फेसपॅकचा वापर केलाच पाहिजे.

(ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला अभिप्राय (Feedback) कळवा )

हे पण वाचा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.