”जेवण फ्रीजमध्ये ठेवले आहे, गरम करून खाऊन घे.” आणि “आज रात्री वेळ नाही एक्सट्रा जेवण बनवून फ्रीजमध्ये ठेवते.” अशी वाक्ये आता जवळजवळ प्रत्येक घरी बोलली जातात. आजच्या धावपळीच्या जीवनात ताजे अन्न मिळणे अवघड झाले आहे. जेवण झाल्यावर उरलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवतात. अशाप्रकारे अन्नाचा अपव्यय होत नाही, परंतु काहीवेळा बर्याच दिवसांपासून फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. चला तर जाणून घेऊयात, फ्रीजमध्ये ठेवलेले शिळे अन्न किती काळ सुरक्षित असते…
कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवू नका
जर आपण देखील कच्चे आणि शिजवलेले अन्न फ्रिजमध्ये शेल्फवर ठेवले आहेत तर आपण चूक करीत आहात. या दोघांना एकाच कप्प्यात ठेवल्याने फ्रीजमधील बॅक्टेरियांना वाढण्याची संधी मिळते. यामुळे कच्च्या भाज्या आणि शिजवलेले पदार्थ लवकर खराब होण्याचीही शक्यता आहे. कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगवेगळ्या शेल्फमध्ये ठेवा.
भात जास्त काळ ठेवू नका
आपण बर्याचदा रात्री किंवा दिवसा भात बनवतो आणि उरलेले दुसर्या दिवशी खायचे म्हणून फ्रिजमध्ये ठेवतो. जर भात खराब होण्यापूर्वी खायचा असेल तर तो फ्रिजमध्ये २ दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवू नका.
कणिक किंवा पोळ्या बरेच दिवस ठेवू नका
बर्याचदा कामावर जाणाऱ्या महिला रात्री कणिक मळून सकाळी लवकर पोळ्या करायच्या म्हणून फ्रीजमध्ये ठेवतात. पण वेळ वाचवण्याची सवय त्यांच्या आरोग्यावर किती वाईट परिणाम करते, याबद्दल त्यांना कल्पना नसते. शिळ्या पोळ्या किंवा शिळ्या कणिकपासून बनवलेल्या भाकरीमुळे पोटदुखी होते आणि बद्धकोष्ठतेची भीती असते. 2 दिवसांपासून फ्रीजमध्ये ठेवलेली भाकर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होऊ शकते.
2 दिवसांपेक्षा जास्त काळ वरण फ्रिजमध्ये ठेवू नका
प्रत्येक घरी शरीराला प्रोटिन्स मिळावे म्हणून वरण बनवतात. जेवणानंतर उरलेले वरण फ्रीजमध्ये ठेवले जाते. दोन दिवसांपेक्षा जास्त काळ फ्रीजमध्ये असलेले वरण खाऊ नये.
फळे आणि भाज्या
त्याचप्रमाणे चिरलेली फळे फ्रिजमध्ये अधिक दिवस ठेऊ नका. चिरलेले फळ जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले असेल तर ते सात ते आठ तासांत खा, कारण त्यानंतर फळ खराब होण्याची शक्यता वाढते. शिजवलेल्या भाज्या शक्य तितक्या झाकून ठेवा आणि स्टीलच्या भांड्यात ठेवा. आपण हे एअर टाइट डब्यातही ठेवू शकता.
हे पण वाचा
#आरोग्यम : स्मरणशक्ती वाढवायची आहे, ‘या’ गोष्टी करून पहा ठरतील फायदेशीर
आज्जीचा बटवा : गवती चहा आहे खूप गुणकारी, ‘या’ आजारांवर ठरतो उपयोगी
आज्जीचा बटवा : सगळ्या शारीरिक व्याधींवर मात करतो पुदिना, जाणून घ्या फायदे