#Fitness : पुरुषांपेक्षा महिलांना वजन कमी करताना येतात अनेक अडचणी, जाणून घ्या कारणे…

0

वजन कमी करणे सहसा कोणासाठीही सोपे नसते. महिनोमहिने घाम गाळून आणि कष्टानंतर शरीरात थोडा बदल जाणवतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी चांगल्या जीवनशैलीबरोबरच हेल्दी डाएटचीही आवश्यकता असते. याबरोबरच, नियमित व्यायाम करणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

साधारणतः पुरुष स्त्रियांपेक्षा वेगाने वजन कमी करतात. जरी दोघेही समान आहार घेत असतील आणि सारखेच व्यायाम करत असतील. महिलांना त्यांच्या कंबरेची चरबी कमी करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. विज्ञानानुसार, पुरुष व स्त्रियांमध्ये जिन्स आणि बायोलॉजिकल अंतर असल्यामुळे स्त्रियांना वजन कमी करणे अवघड होऊन बसते.

मसल टिश्यू

पुरुषांचे मसल टिश्यू स्त्रियांपेक्षा पातळ असतात. यामुळे, त्यांची कॅलरी वेगाने बर्न होते. म्हणूनच जर दोघेही म्हणजेच महिला आणि पुरुष कमी कॅलरींचे आहार घेत असतील तर पुरुषांच्या कॅलरी स्त्रियांपेक्षा वेगाने कमी होतात.

हार्मोन

महिला आणि पुरुषांमध्ये वेगवेगळे हार्मोन्स असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. महिलांमध्ये जास्त इस्ट्रोजेन आणि कमी टेस्टोस्टेरॉन असतात. यामुळे महिला वजन कमी करण्यासाठी वेळ घेतात. याशिवाय घ्रेलिन नावाच्या हार्मोन्समुळे महिलांना कॅलरी बर्न करतानासुद्धा त्रास होतो.

बॉडी फॅट

सर्वसाधारणपणे स्त्रियांच्या शरीरातील फॅट्स पुरुषांच्या तुलनेत 6% ते 11% जास्त असतात. हे एक बायोलॉजिकल फॅक्टर आहे, जे गर्भधारणेदरम्यान मदत करते. किशोरवस्थेपासून ते महीला होईपर्यंत स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा फॅट्स जास्त असतात.

सोप्या रीतीने वजन कमी करण्याचे उपाय

  • वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआऊट करा : रोज एकच व्यायाम केल्यास वजन कमी होण्यास वेळ लागतो. तर आपल्या रोजच्या रूटीनमध्ये वेगवेगळ्या व्यायामाचा समावेश करा.
  • हेल्दी डाएट :  प्रत्येक व्यक्तीमध्ये मेटाबॉलिझम वेगवेगळा असतो. असे गरजेचे नाही की जो डाएट प्लॅन इतरांना सूट करतो, तो तुम्हाला देखील सूट होईल. म्हणून फक्त स्वतःला योग्य वाटेल असे आहार घ्या.
  • लाइफस्टाइल बदला :  फक्त व्यायाम आणि आहारामुळे वजन कमी होण्यास जास्त फायदा होत नाही. यासाठी आपल्याला आपली संपूर्ण लाइफस्टाइल बदलावी लागेल. वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे यासह आणखी बर्‍याच शारीरिक क्रिया करा. एक हेल्दी लाइफस्टाइल तयार केल्यामुळे वजन कमी करण्यात तुम्हाला नक्की मदत होईल.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.