fbpx
-0.3 C
London
Thursday, December 8, 2022

जाणून घ्या ! भारतातील सर्वोत्कृष्ट दहा बिस्किट ब्रँड्स

जर तुम्ही स्कुल, कॉलेज, ऑफिस, पार्क किंवा घरी असालं तर तुम्हाला आपल्या सोबत नेहमी एक बिस्किटचा पुडा ठेवायला आवडतो. भारतीयांना बनवून काही खाण्याऐवजी बिस्कीट खाणे जास्त आवडते. यामुळे बेकरी आणि बिस्कीट इंडस्ट्रीमध्ये जास्त वाढ होताना दिसते. एखाद्या जागी तुम्ही खाऊ शकत नाही पण तुम्हाला भूक लागली आहे तर तुम्ही नक्कीच गुपचूप बिस्कीट खाऊ शकता. जगामध्ये भारतातच जास्त बिस्कीट खाल्ले जातात. आणि आताच्या काळात तर सगळ्यांना ब्रँडेड खायची, घालायची सवय आहे. म्हणून चला तर जाणून घेऊयात भारतातील ‘टॉप टेन’ बिस्किट्स ब्रँड…

10. ओरिओ

ओरिओ बिस्किट ब्रँड भारतात दहाव्या क्रमांकावर आहे. मुळात ते एक प्रकारचे सँडविच कुकी असतात ज्यात दोन चॉकलेट वेफर्स असतात आणि मध्ये गोड क्रीम भरतात. इतरांच्या तुलनेत ओरिओ बिस्किटची किंमत जरा जास्त आहे.

Oreo

9.ड्यूक्स बिस्किट

ड्युक्स बिस्कीट एक क्रीम बिस्किट आहे. सुंदर चवीची क्रिम आणि कुरकुरीत वेफर्ससह , तोंडात गेल्यागेल्या वितळविण्यायोग्य ही बिस्किटे असतात. फ्लेवर्समध्ये अननस, स्ट्रॉबेरी आणि संतरा आहेत. मोजो व्हेनिला, काजू डीलाइट, क्रीम फॉर फन ऑरेंज, चोको डिजायर आणि कोको डीलाइट हे ड्यूक्स बिस्किट प्रकार आहेत. ड्यूक्स हा एक सुप्रसिद्ध ब्रँड आहे आणि तो भारतात 9व्या क्रमांकावर आहे.

Dukes

8.क्रीमिका बिस्किट

क्रिमिका उत्तर भारतातील सर्वात लोकप्रिय बिस्किट ब्रँड आहे. त्याचे काही प्रकार देखील आहेत मॅगीक्रीम, डाएट मेरी, बिस्को, डायजेस्टिव्ह आणि बटर क्रॅकर.

cremica

7.पतंजली बिस्किट

पतंजली हा बिस्किट ब्रँड म्हणून नव्याने जोडला गेला आहे. पतंजलीने भारतातील पहिल्या दहा मोठ्या एफएमसीजी कंपन्यांच्या यादीत समावेश केला आहे. पतंजलीचा असा दावा आहे की, ते अतिथींना गव्हाच्या पीठाने तयार केलेले बिस्किट ऑफर करतात. ज्यामध्ये मैदा नाही, ट्रिस्फेट आणि कोलेस्टेरॉल असलेले पदार्थ नाही.

patanjali

6. रोझ

रोझ बिस्किटांची निर्मिती वीरमनी बिस्किट इंडस्ट्रीज लिमिटेड करते, जी व्हीबीआयएल म्हणून प्रसिद्ध आहे. हैदराबादच्या बाहेरील भागात 1987 मध्ये कंपनीची स्थापना झाली. या कंपनीमध्ये कुकीज, क्रीम बिस्किट, मेरी बिस्किट, खारी बिस्किटे, ग्लूकोज बिस्किट इत्यादी विविध प्रकारचे बिस्किटे तयार होतात.

Rose

5.अनमोल

अनमोलने 1994 मध्ये आपला प्रवास सुरू केला, अनमोल बिस्किट आज भारतातील बिस्किट ब्रँडमध्ये सर्वात वेगाने विकसित होत आहे. ते क्रीम, आरोग्य, सॉल्टेड, सेमीस्वीट आणि स्वीट सारख्या जवळजवळ सर्व प्रकारचे बिस्किट्स बनवतात. अनमोल बिस्किटे भारतातील पहिल्या दहा बिस्किट ब्रँडमध्ये पाचव्या स्थानावर आहेत.

Anmol

4.प्रिया गोल्ड

प्रिया गोल्ड बिस्किटे 1992 मध्ये स्थापन झालेल्या ‘सूर्या फूड अँड ऍग्रो लिमिटेड’ या कंपनीमध्ये तयार केली जातात. कंपनी बिस्किटे, कुकीज, चॉकलेट्स, कन्फेक्शनरी, शीतपेये, केक्स इत्यादी बनवतात. प्रियागोल्ड बिस्किटांची टॅगलाइन “प्रिया गोल्ड, हक से” अशी आहे.

PriyaGold

3.सनफिस्ट बिस्किटे

आयटीसी समूहाने सन 2003 मध्ये सनफिस्ट लाँच करुन बिस्किट डिपार्टमेंट सुरू केला आहे. त्यानंतर सनफिस्ट बिस्कीट ब्रँड लगेच लोकप्रिय झाले.

Sunfeast

2.ब्रिटानिया बिस्किटे

कोलकातामध्ये भांडवलाच्या अत्यल्प रकमेसह 1892 मध्ये ब्रिटनिया कंपनीची स्थापना झाली. ब्रेड, केक्स, बिस्किटे, रस्क आणि इतर खाद्यपदार्थांची ते विक्री करतात. गुड डे बिस्किटे हे ब्रिटानियाचे सर्वात लोकप्रिय आणि बेस्ट सेलिंग बिस्किटे आहेत. “स्वस्थ खा, चांगले विचार करा” ही ब्रिटानियाची टॅग लाइन आहे.

Britannia

1.पारले बिस्किटे –

पारले भारतातील लोकप्रिय बिस्किट ब्रँडच्या शर्यतीत विजेता आहे. ‘पारले प्रॉडक्ट्स लिमिटेड’ कंपनी सन 1929मध्ये स्थापित करण्यात आली. या कंपनीचे भारतात 7 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत. पारलेचा पार्ले – जी हे बिस्कीट तर सर्वात जास्त लोकप्रिय आहे. गरिबा पासून ते श्रीमंतापर्यंत सर्वांना एकच वेड लावणारे हे बिस्कीट अनेक दशकांपासून भारतीय बाजार पेठेत आपली हुकुमत गाजवत आहे.

Parle - G

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here