‘आलू अमृतसरी’ ही एक साधी डिश आहे ज्यात बटाट्यांना कांदे, टोमॅटो आणि भारतीय मसाल्यांबरोबर शिजवले जाते. ही एक पंजाबी डिश आहे. त्यामुळे ही भाजी पंजाबमधील घरांमध्ये नेहमीच बनविली जाते. तुम्ही तुमच्या घरातील पार्ट्यांमध्येही ही भाजी सर्व्ह करू शकता. ही डिश चवीला खूप टेस्टी असते. रात्रीच्या जेवणात दाल तडका, बूंदी रायता आणि फुलके यांच्याबरोबर तुम्ही आलू अमृतसरी सर्व्ह करू शकता.चला तर जाणून घेऊयात रेसिपी…
साहित्य :
4 लांब आकारात चिरलेले बटाटे, 1 चमचा ओवा, 2 लांब आकारात चिरलेले कांदे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आले- लसूण, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, अर्धा चमचा हल्दी पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा मिरची पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, स्वादानुसार मीठ आणि गरजेनुसार तेल.
कृती :
- आलू अमृतसरी बनवण्याकरता सगळ्यात आधी प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करा. त्यानंतर त्यात ओवा घालून 10 सेकंद शिजू द्या.
- 10 सेकंद झाल्यावर त्यात कांदा, हिरव्या मिरच्या, आले-लसूण घाला आणि कांदा लाल होई पर्यंत शिजवा.
- कांदे नरम झाल्यावर टोमॅटोसहित सर्व मसाले घाला आणि टोमॅटो नरम होई पर्यंत शिजवा. त्यानंतर यात बटाटे घालून सर्व मिक्स करून घ्या.
- मिक्स केल्यानंतर यात अर्धा कप पाणी टाका आणि त्यात मीठ घालून कुकर बंद करा. कुकरच्या 2 शिट्या येत पर्यंत शिजवून त्यानंतर गॅस बंद करा.
- कुकरचे झाकण स्वतः उघडू द्या. त्यानंतर झाकण काढून त्यात कोथिंबीर घालून नीट मिक्स करून घ्या.
- सर्व्हिंग प्लेटमध्ये आलू अमृतसरी सर्व्ह करून तुमच्या आवडीने ही डिश गर्निश करा. तुमची डिश तयार आहे.
हे पण वाचा