#Biryanilover :…म्हणून सातासमुद्रा पारही भारतातील ‘या’ बिर्याणीच्या प्रकारांची होते चर्चा

0

भारतात ‘मोस्ट गुगल्ड डिश’ ही बिर्याणी आहे. बिर्याणी भारतात कशी आली? कुणासोबत आली? आणि विदेशातून येऊन भारतातच कशी प्रचलित झाली ? याबद्दल तर आम्ही तुम्हाला सांगितलेच आहे. ही डिश परदेशी बाबुंच्या जास्त आवडीची आहे. चला तर जाणून घेऊयात काळानुसार बिर्याणीचे कसे आणि किती वेगवेगळे प्रकार भारतात येत गेले.

मुघलाई बिर्याणी

मुघल शासक स्वयंपाक करणे ही एक कला मानतात. शाही जेवण बनवणे हा त्यांचा छंद असायचा. आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी आणि पाहुणचारासाठी मुघलंच्या दरबारात खास बिर्याणीची मेजवानी असायची. सध्या शाही रसोईमधील डिशेसच्या लिस्टमध्ये बिर्याणी ही टॉप वर आहे. मुघलाई बिर्याणीमध्ये मटण, राईस आणि केवड्याच्या सुगंधाचा वापर करतात. बिर्याणीला स्वाद आणि सुगंध येण्यासाठी यामध्ये केवड्याचा वापर करतात.

Mughlai Biryani

बॉम्बे बिर्याणी

जर तुम्ही बॉम्बे बिर्याणीचा स्वाद घेतला नसेल तर मग अजून तुम्ही खाल्लंच काय? असा प्रश्न अनेकजण विचारतात. बिर्याणी डिशेसच्या लिस्टमध्ये बॉम्बे बिर्याणीचे नाव नेहमी टॉपला असते. या बिर्याणीची एक खासियत आहे की यात मटण आणि भाज्यांसोबत, फ्राईड बटाट्याचा देखील समावेश असतो. या डिशमध्ये जरा गोडवा असतो. या बिर्याणी प्रकारात केवड्याचे पाणी आणि सेव्हरी (आलूबुखार) देखील असते ज्यामुळे याला एक विशिष्ट गोड चव येते.

Bombay Biryani

हैद्राबादी बिर्याणी

हैद्राबादी बिर्याणी आपल्या चवीसाठी अख्ख्या जगभरात पॉप्युलर आहे. या बिर्याणीच्या अस्तित्वाबद्दल असे मानले जाते की, ही डिश भरतात तेव्हा आली जेव्हा औरंगजेबाने निजा -उल- मुल्क ला हैदराबादची कमान सोपवली. असे म्हणतात की, आचाऱ्यांनी 50 प्रकारची बिर्याणी बनवली. ज्यामध्ये हरीण, सश्याचे मटण आणि कोळंबी मासा तसेच इतर मासे देखील टाकले होते. या बिर्याणीमध्ये लेयर केले जातात त्यात केसरचा वापर करून त्याला सुगंध आणि रंग दिला जातो. हैद्राबादी बिर्याणी ही आज जगभरात प्रसिद्ध आहे ती केवळ तिच्या चवीमुळे. आज अनेक विदेशी पर्यटक हैद्राबादी बिर्याणीची खास चव घेण्यासाठी भारतात येतात.

haidrabadi Biryani (1)

लखनवी बिर्याणी

लखनौ मध्ये बनवली जाणारी बिर्याणी ‘पक्की’ बिर्याणी म्हणून ओळखली जाते. पक्की स्टाईलमध्ये बनवल्या जाणाऱ्या या बिर्याणीमध्ये मटण आणि राईसला वेगवेगळ शिजवल जाते. दोन्ही तयार असल्यावर यांना तांब्याच्या भांड्यात लेयर करून सजवतात. लखनौच्या नावाबांची शान ही लखनौच्या बिर्याणी वरून एकेकाळी केली जायची. अनेक नवाब असे होते ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात खान-पानवर विशेष लक्ष दिले. ब्रिटीश काळात नवाबी गेली तरी मेजवानीमधली शान मात्र त्यांनी कमी होऊन दिली नाही. अजूनही अनेक नवाबांच्या घरात असेच शाही बिर्याणीचे टोप आपल्याला शिजताना दिसतात.

Lakhnavi Biryani

कलकत्ता बिर्याणी

कलकत्ता बिर्याणीबद्दल असे म्हटले जाते की, जेव्हा इंग्रजांनी वाजिद अली शाहच्या जमिनीवर जप्ती आणली आणि नंतर वाजिद अली शाह हे 1856मध्ये मेटियाब्रुजमध्ये वनवास करू लागले. त्या कठीण काळात पैशांच्या कमीमुळे बिर्याणी मध्ये ते मटणऐवजी सोनेरी रंगांचे आणि मसालेदार बटाटे टाकून शिजवत होते. या बटाट्यांमुळेच कलकत्ता बिर्याणीला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. याशिवाय यात दह्यात मॅरीनेट केलेले मटण आणि वेगळे शिजवलेले राईसचे मिश्रणसुद्धा प्रसिद्ध आहे.

Kalkatta Biryani

डिंडीगुल बिर्याणी

चेन्नई मध्ये ही बिर्याणी लोकांच्या इतकी आवडीची आहे की, जास्तकरून हॉटेल्सच्या मेनु लिस्टमध्ये बिर्याणी डिशेसच ठेवतात. ही बिर्याणी बनवण्यासाठी जिरा सांबा राईसचा उपयोग केला जातो. यात मटणाचे छोटे छोटे तुकडे करून शिजवतात, हे या डिशमधील वेगळेपण आहे. यात दही आणि लिंबूचा सुंदर स्वाद येतो.

dindigul Biryani

सिंधी बिर्याणी

सिंधी बिर्याणी खाल्ल्यानंतर एक आंबट चव जिभेवर असते, तिला अनुभवून परत ही बिर्याणी खाण्याची इच्छा होते. यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, सुगंधी मसाले आणि शेंगदाण्याचा तडका लावतात. यात आलू बुखारा देखील घालतात. याशिवाय बिर्याणीच्या लेयर मध्ये दही घातले जाते. ज्यामुळे ही आंबटचिंबट डिश बनते.

Sindhi Biryani

दूध बिर्याणी

हैदराबादची सर्वात वेगळी आणि स्पेशल आहे ‘दूध बिर्याणी’. साधारणतः बिर्याणी आपल्या स्पाइसेस मुळे चटक स्वाद असण्यावरून पॉप्युलर आहे. पण ही स्पेशल बिर्याणी आपल्या हलक्या फ्लेवरवरून ओळखली जाते. यात मलईदार दुधासोबत, नट्स आणि सुगंधी मसाले घालतात. ही लाईट फ्लेवरवाली दूध बिर्याणी सर्वात युनिक डिश आहे.

Biryani (2)

बिर्याणीच्या या लिस्टमध्ये अजून नाव आहेत. पण सध्या तुम्ही या वेगवेगळ्या स्टाईलच्या बिर्याणींचे स्वाद घ्या.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.