देशात अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरण चांगलेचं गाजत आहे. यामध्ये रोज नवीन खुलासे आणि काही तथ्य समोर येत आहेत. त्यात आता सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया (Claustrophobia) नावाचा मानसिक आजार होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे नेमका क्लॉस्ट्रोफोबिया हा आजर आहे तरी काय ? हे आपण आज जाणून घेऊया
क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे काय :
वेब एमडी वैद्यकीय वेबसाइटनुसार क्लॉस्ट्रोफोबिया हा एक प्रकारचा भय आहे. क्लोस्ट्रोफोबियाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला बंद ठिकाणी जाताना अस्वस्थता किंवा गुदमरल्यासारखे अनुभवते. काही लोकांमध्ये क्लॉस्ट्रोफोबिया इतका असतो की त्यांना प्रत्येक बंदिस्त ठिकाणी जाण्यास भीती वाटते आणि काही लोकांना बंद असलेल्या काही खास ठिकाणी जसे की – लिफ्ट किंवा एमआरआय मशीनबद्दल भीती वाटते. तसाचं सुशांतलाही हा आजार असल्याचं त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने मीडियाला सांगितले.
नेमकी या आजाराची लक्षणे आहे तरी काय ?
क्लॉस्ट्रोफोबियाची काही लक्षणे देखील आहेत. थरथरणे किंवा थंडी वाजून येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, भीतीमुळे बांधून ठेवल्यासारखे वाटणे, जीव घाबरणे, मळमळ होणे, चक्कर येणे, ही काही सामान्य क्लॉस्ट्रोफोबियाची लक्षणंं आहेत. ज्या लोकांना क्लेस्ट्रोफोबियाचा त्रास आहे. अशा व्यक्ती लिफ्ट, विमान किंवा मेट्रो ट्रेन, बोगद्यात, बंद कार, स्नानगृह, अशा ठिकाणी जाण्यास घाबरतात.
क्लेस्ट्रोफोबियाचा उपचार करणे
क्लेस्ट्रोफोबियाचा उपचार सहसा मानसोपचारात केला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे समुपदेशन आपल्याला आपल्या भीतीवर मात करण्यास मदत करते. जर आपल्याला क्लॉस्ट्रोफोबियाची तक्रार असेल तर आपण कोणत्या थेरपीसाठी आपल्यासाठी सर्वोत्तम कार्य करेल याबद्दल आपण आपल्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे.
हे पण वाचा