मधुमेहाची प्रकरणे भारतात झपाट्याने वाढत आहेत आणि त्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे आपली जीवनशैली. मधुमेह हा एक आजार आहे ज्याचा कोणताही इलाज नाही, तो केवळ औषधांच्या मदतीने आणि आयुष्यात काही बदलांच्या नियंत्रणाखाली ठेवला जाऊ शकतो. मधुमेह हळू हळू उर्वरित अवयवांवर देखील परिणाम करते. म्हणून त्याला स्लो किलर म्हणून देखील ओळखले जाते.
व्यायाम करूनही वाटतंंय अनफिट ! ‘या’ बाबी घ्या समजून
मधुमेहाच्या रुग्णांना या आजाराशी लढा देणे हे खूपच आव्हानात्मक असते. या आजाराशी झुंज देणार्या लोकांना त्यांच्या आहारासह व्यायाम करणे देखील आवश्यक आहे. कारण सतत रक्तातील साखरेची पातळी वाढवणे प्राणघातक असल्याचे सिद्ध होऊ शकते. मधुमेह रूग्णांनी हा आजार गंभीरपणे न घेतल्यास लठ्ठपणा आणि स्ट्रोकसारखे दुष्परिणाम होऊ शकतात.
काहीवेळा फळांच्या नैसर्गिक गोडपणामुळेही शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे थोडा फळांचा आनंद घेण्यासाठी जास्त कारली खाल्ली पाहिजेत. कारण मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी कारल्याची भाजी अथवा ज्यूस हा उत्तम पर्याय असू शकतो.
पेरू हे मधुमेह नियंत्रित करणारे उत्तम फळ आहे. मात्र त्यापेक्षाही जास्त कारले हे मधुमेहावर उत्तम कार्य करू शकते. मधुमेह झालेल्या व्यक्तीने दररोज जर कारल्याचा ज्यूस घेतला तर त्याला कधीही कसलाचं त्रास होणार नाही, असे सांगितले जाते.
नक्की फरक पडेल ! वजन कमी करतायंं पण होत नाहीये ? जेवणाच्या वेळेत बदल करून बघा
कारल्यामध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म आहेत. त्यामध्ये उपस्थित लेकोटीनमुळे रक्तातील ग्लुकोज कमी होते . कारल्यामध्ये पॉलीपेप्टाइड-पी किंवा पी-इन्सुलिन देखील असते, जे मधुमेहावर नैसर्गिक मार्गाने नियंत्रण ठेवते.
ताजी कारली घेऊन त्याच्या बियाकडून रस बनवा. त्यामध्ये थोडे मीठ आणि कोथिंबीर टाका. कारल्याचा रस पिण्यास कडू लागत असेल तर त्यामध्ये मध घाला. त्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी जाणवेल. आणि याचे सेवन करा. दररोज असा रस पिल्यास रक्तातील साखर नक्कीचं नियंत्रित राहील.