पुरुष वंध्यत्वाची समस्या जगभरात वेगाने वाढत आहे. वंध्यत्व हे शुक्राणूंचे कमी उत्पादन, शुक्राणूंच्या असामान्य कार्यामुळे किंवा शुक्राणूंची योग्य प्रसूती होऊ नये अशा अडथळ्यांमुळे असू शकते. सन 2017 मध्ये, एशियन जर्नल फार्मास्युटिकल आणि क्लिनिकल रिसर्चमध्ये असे नोंदवले गेले की सर्वसाधारण लोकांमध्ये वंध्यत्व सुमारे 15-20 टक्के आहे आणि पुरुष वंध्यत्व 20-40 टक्के आहे. या अभ्यासानुसार, भारतामध्ये पुरुष वंध्यत्वाच्या समस्येचे प्रमाण सुमारे 23 टक्के आहे, जे निःसंशयपणे उच्च दराचे मानले जाऊ शकते.
पुरुष वंध्यत्वाच्या या उच्च दरामागील कारणे समजून घेणे आणि नंतर त्या मूलभूत कारणांवर उपचार करणे फार महत्वाचे आहे. आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार जीवनशैली आणि वातावरणाशी संबंधित असे अनेक घटक आहेत जे पुरुष वंध्यत्वामागील मुख्य कारण असू शकतात. धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या सवयींमुळे नर सुपीकपणावर परिणाम होतो हे आपल्याला माहितचं असेल. परंतु आता अलीकडील अभ्यासानुसार इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया उपकरणांचा वाढत्या वापरामुळे पुरुषांच्या शुक्राणूंवर परिणाम होत आहे.
स्लीप या जर्नलमध्ये नुकताच अभ्यास प्रकाशित झाला होता, त्यानुसार डिजिटल मीडिया उपकरणांच्या प्रकाश-उत्सर्जन करणार्या डिस्प्लेमुळे पुरुषांच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवर नकारात्मक प्रभाव पडतो. या अभ्यासामध्ये, 21 ते 59 वर्षे वयोगटातील 116 पुरुषांचे वीर्य नमुने घेतले त्यांचे मूल्यमापन केले. अभ्यासामध्ये सामील असलेल्या सर्व पुरुषांच्या झोपेची सवय आणि डिजिटल डिव्हाइसच्या वापरासंबंधीची माहिती प्राप्त केली.
अभ्यासात पुढे म्हटले आहे की, जर संध्याकाळी आणि झोपेच्या वेळी स्मार्टफोन आणि टॅब्लेटचा वापर जास्त झाला तर पुरुषांच्या शुक्राणूंची हालचाल, प्रगतीशील गतिशीलता आणि जाडी कमी होते. या उपकरणांमधून उत्सर्जित होणार्या शॉर्ट-वेव्हलेन्थ लाइट (SWL) च्या जितका मनुष्य संपर्कात येईल तितके शुक्राणूंच्या गतीशिलतेचे प्रमाण कमी होते. याव्यतिरिक्त, अभ्यासाने हे देखील सूचित केले की दीर्घकाळापर्यंत झोपेचा कालावधी संपूर्ण शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंच्या प्रगतीशील गतीशी संबंधित असतो.
या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, मोबाइल फोन, लॅपटॉप, टॅब्लेट आणि संध्याकाळ आणि रात्री SWL उत्सर्जन करणारे डिजिटल उपकरणे ही केवळ झोपेचेचं नाही तर पुरुष वंध्यत्वाचे कारण ठरत आहे.
प्रजनन जीवशास्त्र आणि एंडोक्रिनोलॉजी या जर्नलमध्ये वर्ष 2018 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, आज मानवाच्या आजूबाजूस अनेक प्रकारच्या आयनीइज्ड आणि नॉन-आयनीकृत किरणंं आहेत आणि हे सर्व शुक्राणूजन्य प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम करतात. या प्रक्रियेद्वारेच शरीरात शुक्राणू तयार होतात.
या अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की एक्स-रे दरम्यान उत्सर्जित होणारे आयनीकृत किरण निश्चितपणे अधिक हानिकारक आणि कर्करोगास कारणीभूत आहेत. परंतु मोबाईल फोन, लॅपटॉप, संगणक, मायक्रोवेव्ह ओव्हन, टीव्ही, वायफाय, फोन टॉवर्स आणि रडार अशा नॉन-आयनीकृत किरणोत्सर्गाच्या विविध स्त्रोतांची संख्या आणि वापर देखील वेगाने वाढत आहे. या डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून रेडिएशन उत्सर्जन होण्यावर परिणाम होतो, ज्याचा परिणाम शुक्राणूंची संख्या, आकार आणि गतिशीलतेवर होतो आणि शरीरातील डीएनए, हार्मोन्स आणि अँटिऑक्सिडेटिव्ह एन्झाईम्सस देखील नुकसान होते.
या उपकरणांचा अधिक वापर करणाऱ्या पुरुषांनी हा धोका लक्षात घेऊन डिजिटल डिव्हाइसचा वापर मर्यादित केला पाहिजे किंवा हेल्थकेअर प्रोफेशनलचा सल्ला घ्यावा जेणेकरून त्यांना भविष्यात वंध्यत्वाची समस्या उद्भवू नये.
हे पण वाचा