सध्याच्या या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर तणावग्रस्त परिस्थिती आहे.
या तणावग्रस्त परिस्थिती मध्ये स्वतःला तणावमुक्त ठेवून आपल्याला या कोरोनाच्या परिस्थितीवर मात करायची आहे.
आज आम्ही तुम्हाला अशाच ८ गोष्टी सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला तणावमुक्त राहण्यासाठी मदत होईल. चला तर मग पाहूया काय आहेत या ८ गोष्टी
१). मोकळ्या हवेत चाला
मानसिक संतुलन राखण्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी मोकळ्या हवेत फिरणे हा एक प्रभावी उपाय आहे. यामुळे मानसिक ताण कमी होतो.त्याच बरोबर डोकेदुखीच्या समस्येवर देखील हा रामबाण उपाय आहे.
२). काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा
काही लोक हे अबोल असतात त्यांना आपल्या समस्या लोकांबरोबर बोलणे त्या शेअर करणे फारसे आवडत नाही. त्यांच्या लिहिणे हा एक उत्तम पर्याय आहे. या मध्ये तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी लिहू शकता या मुळे तुमचे मन शांत होण्यास मदत होईल.
३). वातावरणात बदल
बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला नकारात्मक दृष्टीने विचार करणारे लोक असतात त्यांच्यामुळे जशी सृष्टी तशी दृष्टी
या उक्तीप्रमाणे आपणही नकारात्मक विचार करण्यास सुरुवात करतो. आपल्यामधील नकारात्मक विचार बदलण्यासाठी वातावरणात बदल करणे हा एक प्रभावी उपाय आहे यामुळे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते व मन हलके होण्यास मदत होते.
४). आपल्या चिंता एकमेकांसोबत शेअर करा
मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी एकमेकांशी बोलले पाहिजे आपल्या चिंता आपल्या समस्या या आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर तयार करणे हा एक चिंतामुक्त राहण्यासाठी प्रभावी मार्ग आहे.
५). जीवन पद्धती बदलून पहा
सातत्याने रोज एकच काम अथवा एकच गोष्ट केल्यास त्या गोष्टीचा कंटाळा येण्यास सुरुवात होते. याच्यासाठी तणावमुक्त राहण्यासाठी आपली रोजची जीवन पद्धतीमध्ये थोडासा बदल करून पहा.
६). आपल्या आवडीच्या कामांना वेळ द्या
बऱ्याच वेळा आपल्या मनातील सुरू विचारांचे काहूर दूर करण्यासाठी आपल्या आवडीची कामे अथवा आपल्या आवडीचे छंद जोपासल्याने मानसिक स्वास्थ्य उत्तम राहून मन प्रसन्न व उत्साहवर्धक होते.
७). एक दीर्घ श्वास घ्या
जेव्हा आपण तणावामध्ये असतो त्यावेळी आपल्या श्वासोच्छवास कार्यान्वित करणे उत्तम उपाय आहे, यामुळे तणावमुक्त राहण्यास मदत होते.
८). स्वतःची काळजी घ्या
ताणतणाव अथवा काळजी वाटत असताना स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. बऱ्याचदा चिंताग्रस्त व्यक्ती आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करताना दिसून येतो यामुळे जीवनपद्धती बदलून अधिक ताण तणाव येतो याच साठी स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये.