कबाबचे नाव ऐकलं की लगेच कबाबप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटते. हरभरा कबाब, टुंडे कबाब, हरियाली कबाब, पत्थर कबाब, शामी कबाब, दही कबाब इ. किती तरी प्रकारचे कबाब आपल्या कडे बनवले जातात. फक्त भारतातच नाही तर कबाब अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. मग जर आता याचा सुगंध अख्ख्या जगात दरवळत आहे. तर कबाबचा इतिहास देखील खूप गमतीशीर असेल नाही? चला तर जाणून घेऊयात व्हेज ते नॉन व्हेज कबाबचा इतिहास….
मोरक्कोचे प्रसिद्ध यात्री इब्न बतुताचे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. त्यांच्यानुसार 1200च्या दशकात कबाब भारतीय अन्नामध्ये सामील झाला. पण हा पदार्थ मूळ भारतीय नसून तुर्कीमधील आहे. तुर्कीमध्ये कबाबला ‘कबुबा’ म्हणतात. कबुबा म्हणजेच असे मांस ज्याला पाण्याशिवाय शिजवतात. मात्र भारत आणि अन्य देशात याला कबाब म्हणूनच ओळखतात. असे म्हणतात की, तुर्की सैनिक यात्रेदरम्यान मांस वाचवण्यासाठी मांस आपल्या तलवारी वर ठेवून भाजत होते. भाजलेल्या मांसाला भरपूर प्रकारच्या मसाल्यांसोबत खात होते. कबाबबद्दल उल्लेख 1377 मध्ये लिहलेली बुक Kyssa-i Yusuf मध्ये आहे. त्यानंतर कबाबची ख्याती अख्या जगात पसरली.
चंगेज खानला सुद्धा कबाब आवडत होते. इतिहासकारांनी सांगितले की, जेव्हा तो आपल्या सेनेसोबत युद्ध लढायला जात होता. तेव्हा त्याच्या बेगम सैनिकांना मांस, कांदा, तांदुळ, मसाले इ. बांधून देत होत्या. युद्धभूमीवर किंवा कुठे आरामासाठी थांबले असल्यास तेसुद्धा तुर्की लोकांसारखं मांस तलवारीवर ठेवून भाजून खात होते. चंगेज खान सुद्धा तेच अन्न खात होता, जे अन्न त्याच्या सेनेसाठी शिजवले जात होते.
16व्या शतकात मुमताज महलचे चिरंजीव औरंगजेबने गोलकुंडा किल्ल्यावर विजय मिळवल्यानंतर सैनिकांसाठी कबाब बनवायला सांगितले होते. पण आता मांस तलवारी वर नाही तर तिथे मिळणाऱ्या ग्रॅनाईट दगडांवर भाजले होते.अशा प्रकारे कबाब आपल्या थाळीचा भाग बनला. आता फक्त मांसानेच नाही तर भाज्या आणि पनीरचे देखील कबाब बनवले जातात. यात हराभरा कबाब, पनीर टिक्का, दही कबाब इ. नावे आहेत. कबाबच्या या व्हेजिटेरियन प्रकारांचा शोध मात्र भारतातच लागला.
म्हणजेच एकूण भरपूर शतकांपासून कबाब आपल्या जेवणाच्या थाळीचा एक खास भाग आहे. कबाब खाल्ल्यानंतर प्रत्येकजण हेच म्हणतो- ‘व्वा! क्या बात है?’ हो की नाही.
हे पण वाचा