एकदा वाचून तर बघा! पर्शियामधून येऊन भारतीयांच्या मनावर राज्य करणारी ही आहे भारतातील ‘मोस्ट गुगल्ड डिश’…

0

मोस्ट गुगल्ड डिश! ही काय बाबा नवीन भानगड? भानगड वगैरे काही नाही ओ… ही डिश तर तुमच्या ओळखीचीच आहे. ओळखीची म्हणण्यापेक्षा ही डिश तर तुमच्या- आमच्या हृदयाजवळची आहे. अहो विचार कसला करताय? ही डिश दुसरी तिसरी कुठलीच नसून आपल्या सर्वांची आवडती, तोंडाला चटकन पाणी सोडणारी डिश ‘बिर्याणी’ आहे. आम्हाला कळलं हा की, बिर्याणी ऐकून तुमच्यातल्या काही जणांच्या डोळ्यासमोर बिर्याणीची प्लेट आली असेल. कुणाच्या तोंडाला पाणी सुटले असेल. आज रात्रीच्या जेवणात बिर्याणी बनवायची, असाही विचार आला असेल. अहो का नाही येणार? आपण मोस्ट गुगल्ड डिश, आपल्या सर्वांची आवडती बिर्याणी डिशबद्दल बोलतोय. आ… हा… हा… बिर्याणी राईसचा तो दळवळणारा सुगंध दुरवरून आपल्याला तिच्याकडे आकर्षित करायला येतो. म्हणजे बिर्याणीच्या आकर्षणाबद्दल आता आम्ही किती सविस्तर बोलायचं, त्यासाठी शब्दही सुचे ना झालेत.

हंडीमध्ये शिजत असलेल्या बिर्याणीचा सुगंध दूरवर पसरतो आणि यावरूनच बिर्याणीचे स्वाद काय असेल ते कळते. यानंतर तर तुमचे पाय आपोआपच बिर्याणीच्या शॉपजवळ जातील, मग तुम्हाला भूक लागली असो वा नसो. भारतातील वेगवेगळ्या राज्यात बिर्याणी बनवायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि म्हणूनच काही शहरातील बिर्याणी डिश आपल्या वेगळ्या खासियतवरून प्रसिद्ध आहेत. जितकी चविष्ट उम्म-हं जितकी सुपरचविष्ट बिर्याणी आहे, तितकाच गमतीशीर आहे या बिर्याणीचा ‘इतिहास’. चला तर निघुयात एका ऐतिहासिक प्रवासावर, जिथे बिर्याणीच्या इतिहासासोबत अनेक किस्से आहेत.

अत्यंत चवीने खाल्ली जाणारी बिर्याणी पर्शियामधून जगभरात पसरली. बिर्याणी फक्त काही देशातच नाही तर जगभरात मोठ्या चवीने खाल्ली जाते. बिर्याणी हे नाव पर्शियन शब्द ‘बिरीयन’ म्हणजेच कुकिंग आधी फ्राय करणे आणि ‘बिरिंज’ म्हणजे राईस यावरून पडले. बिर्याणीबद्दल अनेक कथा-कहाण्या प्रसिद्ध आहेत. असे म्हणतात, मुघल बिर्याणीला आपल्या सोबत भारतात घेऊन आले. वेळेसोबत शाही मुघल रसोईमध्ये ही डिश अजूनच चविष्ट होत गेली.

एका रोचक कथेनुसार बिर्याणीच्या उत्पतीच क्रेडिट मुघल बादशाह शहाजहानची बेगम मुमताजला दिले जाते. असे म्हणतात की, मुमताज बेगम एकदा आर्मी बरॅक मध्ये गेली. तिथे त्यांनी बघितले की, जास्तकरून मुघल सैनिक कमजोर दिसत आहेत. सैनिकांची अशी हालत बघितल्यावर त्यांनी सैनिकांसाठी आचाऱ्यांना संतुलित आहार असलेली (balance diet) डिश बनवण्याचे आदेश दिले. यात मुमताज बेगमने आचाऱ्यांना मटन  आणि राईसचे असे मिश्रण तयार करायला सांगितले, ज्याने सैनिकांना भरपूर पोषण मिळेल. यानंतर अनेक प्रकारचे मसाले आणि केसर मिसळवून बिर्याणीचा जन्म झाला.

एका अन्य कथेनुसार, असे म्हटले जाते की अरबी व्यापारी बिर्याणीला दक्षिण भारतीय तट मालबारला घेऊन आले. तिथे तमिळ साहित्यामध्ये ‘ओन सोरू’ नामक राईसने तयार केलेल्या डिशचा उल्लेख आहे. मटण, राईस, कोथिंबीर, काळी मिरी अनेक मसाले घालून ही डिश तयार करून सैनिकांना देत होते.

आपल्या भारतीयांची एक सवय आहे कुठल्याही गोष्टीचा आपण दिलखुलास रित्या स्वागत करतो. बिर्याणी जरी विदेशातून आली असेल तरीसुध्दा आपण ही डिश मनापासून स्वीकारली आहे. इतकेच नाही तर हैद्राबादी आणि लखनवी बिर्याणी खाण्याकरता तर लोक विदेशातून भारतात येतात. भारताने बिर्याणीला इतकं डोक्यावर घेतले की प्रत्येक गल्लीबोळात, चौकात, हॉटेल इ. ठिकाणी बिर्याणी शॉप्स उपलब्ध आहेत.

बिर्याणीच्या या गंंमतीशीर इतिहासाच्या प्रवासात तुम्ही आम्हाला सोबत केली त्यासाठी धन्यवाद. तो इसी बात पर एक प्लेट बिर्यानी हो जाये?

क्रमशा…

हे पण वाचा

मद्यपान शरीरासाठी फायदेशीर, दारूचे हे गजब फायदे वाचून तुम्हीही चकित व्हाल…

…म्हणून पिंपळाच्या झाडाला देतात एवढे महत्व, झाड एक पण फायदे अनेक

आज्जीचा बटवा:  विड्याच्या पानांचे ‘हे’ औषधी गुणधर्म तुम्हाला माहित आहेत का ?

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.