आज्जीचा बटवा : मधाळ ‘मधा’मध्ये सुद्धा आहेत अनेक औषधीय गुण, जाणून घ्या कोणते….

0

तुम्ही सुद्धा हे अनुभवले असेल की, जडी- बुटी वाले बाबा,आयुर्वेदिक बुआ तुमच्या आजारावर किंवा दुखण्यावर तुम्हाला औषधी पावडरच्या छोट्या छोट्या पुड्या देतात. “ते पावडर मधासोबत चाटण करून घ्या” असे ते सांगतात. म्हणजेच ‘मधा’मध्येही काही औषधीयुक्त गुण आहेत. हे यावरून सिद्ध होते. आयुर्वेदामध्ये मधालाही महत्त्व आहे, हे समजते. तर आज आम्ही आज्जीच्या बटव्यात तुम्हाला मधाचे आरोग्यदायी उपयोग सांगणार आहोत. आम्हाला माहिती आहे ‘मध’ ऐकून तुम्हालाही मधाळ वाटत असेल.

चला तर करूयात थोडा परिचय मधासोबत…

फुलांच्या परागकणांची मधमाश्यांच्या लाळेशी प्रक्रिया होऊन मध तयार होतो. मध हा नैसर्गिकपणे मिळत असला तरीही ज्या पोळ्यांत हा जंगली मध तयार होतो, तेथून तो काढून जमा करणे अवघड असते. त्यामुळे मधुमक्षिका पालन केंद्रांत मधमाश्यांना लाकडी खोक्यांमध्ये मधाची पोळी बांधू द्यायला उद्युक्त केले जाते, आणि त्या पोळ्यांतून नियमितपणे मध गोळा करता येतो. मधात जो गोडवा असतो तो ग्लूकोज़ आणि एकलशर्करा फ्रुक्टोज मुळे असतो. मधाचा प्रयोग औषधि रूपात ही होताे. यात ग्लूकोज व अन्य शर्करा तसेच विटामिन, खनिज आणि अमीनो अम्ल पण असतात ज्यात अनेक पौष्टिक तत्व मिळतात जे जख्म ठीक करायला आणि उतकांच्या वाढी साठीच्या उपचारात मदत करते.

मधमाशा हा मध जांभूळ, ओवा, करंज, कारवी, निलगिरी, मोहरी, लिची, शेवगा, सूर्यफूल, हिरडा-गेळा, ओमरेंदा इत्यादी वनस्पतींच्या फुलोर्‍यांतून गोळा करतात. महाबळेश्वरात यांपैकी जांभळाचा मध विपुल प्रमाणात मिळतो.अस्सल मध चाखल्यानंतर जिभेवर त्या मधाचा गोडवा फक्त पंधरा सेकंदात नष्ट होतो, तर साखरेचा पाक अथवा कृत्रिम मध यांचा जिभेवरील गोडवा पंधरा मिनिटे टिकून राहतो.

आयुर्वेदात मध हा औषध व अनुपान म्हणून वापरण्यात येतो. अनेक औषधे मधातून देतात. आयुर्वेदानुसार मध दिवसाच्या कोणत्या वेळी सेवन केला जातो आणि थंड पाण्यातून की कोमट यांप्रमाणे मधाचे औषधी गुणधर्म बदलतात.

आरोग्यदायी उपयोग:

  • मधामध्ये व्हिटामीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्याने शरिरात शक्ती, स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढवतो.
  • कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे. कफ आणि दमा यामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यास खोकल्यात आराम मिळतो.
  • उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरते.
  • रक्ताला स्वच्छ करण्यासाठी मधाचा वापर केला पाहिजे.
  • हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदय योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी आणि हृदयाच्या रोगापासून वाचण्यासाठी मध खाल्ले पाहिजे.
  •  रोज मध खाल्याने आरोग्य कायम राहते आणि शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो.
  • मधाचे सेवन केल्यावर पिंपल्स दूर करण्यात उपयोगी ठरते. तुम्ही गुलाबजल, लिंबू आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो.
  • उन्हाळ्यात रोज पाण्यात मध टाकून प्यायल्यास पोट हलके राहते.
  • पिकलेल्या आंब्याच्या रसात मध टाकून खाल्ल्यास कावीळ दूर करण्यात फायदा होतो.
  • चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी मध, दुधाची साय आणि बेसन यांचे उटणे लावल्यास चेहरा मुलायम होतो. यामुळे चेहऱ्यात चमक येईल.
  • रोज मध खाल्याने किडनी आणि आतडे चांगले राहतात.
  • मध जखमेला स्वच्छ करणे, दुर्गंधी आणि दुखण्याला दूर करणे आणि जखम लवकर बरी करण्यात उपयोगी ठरतो.

हे पण वाचा

आज्जीचा बटवा : स्मरणशक्ती वाढवणाऱ्या बदामाचे ‘हे’ सुद्धा आहेत फायदे, जाणून तुम्हीही व्हाल थक्क

आज्जीचा बटवा : जाणून घ्या नॅचरल बॅक्टेरियाचे आरोग्य आणि सौंदर्यासाठीचे फायदे…

आज्जीचा बटवा : पानपुड्याची शोभा वाढवणारा ‘ओवा’ आहे आरोग्यदायी, जाणून घ्या फायदे…

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.