सोपा उपाय ! रात्रीच्या वेळी पोट दुखत असेल तर करून बघा ‘हा’ उपाय, मिनिटात वेदना गायब

0

दैनंदिन जीवनात आपण बर्‍याचदा अशा पदार्थांचे सेवन करतो जे कधीकधी आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. पोटाचे आजारांचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी पोटदुखी ही एक मोठी समस्या आहे. या समस्येमुळे आपण आपल्या घरातील सदस्यांना अनेकदा त्रासलेले पाहिले असेल. विशेषत: रात्रीच्या वेळी ही समस्या अधिक प्रबळ होते.

ओटीपोटात दुखणे ही बर्‍याच गंभीर आजारांची सुरुवातीची लक्षणही आहे, जी वेळेवर उपचार करणे खूप महत्वाचे आहे. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आम्ही असेच काही घरगुती उपचार सांगत आहोत ज्याचा वापर करून आपण घरच्या घरी पोटदुखीच्या समस्येपासून आराम मिळवू शकता.

अगदी सोपं : घरच्या घरीचं माउथवॉश बनवा आणि तोंडाची दुर्गंधी घालवा

का होते पोट दुखी ?

ओटीपोटात दुखण्याची समस्या सहसा बद्धकोष्ठता, पाचक प्रणालीमध्ये बिघाड आणि कधीकधी छातीत जळजळ झाल्यामुळे होते. जास्त करून पोटदुखी ही बद्धकोष्ठतेमुळे होते.

‘हा’ आहे सोपा उपाय

पोटदुखीसाठी हा घरगुती उपाय अवलंबण्यासाठी तुम्हाला घरात असणारी सामग्रीचं वापरावी लागेल. यासाठी चमचा बारीक चिरलेले आले, 1 चमचा चहा पावडर , 1 चमचा मध, 1 चमचा लिंबाचा रस घ्या.

प्रथम 2 ग्लास पाणी घ्या आणि उकळण्यासाठी एका भांड्यात ठेवा. पाणी उकळण्यास सुरवात झाली की चहा पावडर आणि आल्याचे तुकडे घाला आणि 5 मिनिटे चांगले उकळा.
आता मध घालून एक मिनिटानंतर काढा काढून घ्या आणि थंड होऊ द्या. एका ग्लासमध्ये काढा घ्या आणि त्यात लिंबाचा रस घाला आणि मग त्याचे सेवन करा.

आपण दिवसातून दोन ते तीन वेळा पिण्यासाठी याचा वापर करू शकता. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जर आपल्याला गंभीर आजार असेल तर उशीर न करता वैद्यकीय सल्ला घ्या.

फुफ्फुसाचा स्टेज 3 कॅॅन्सर असा आहे भयावह, उपचारानंतर जगण्याची असते आशा

कसा होईल परिणाम ?

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी माहितीनुसार, आले आणि मधात विशेष गुणधर्म आहेत जे पोटातील अनेक प्रकारच्या समस्यांवर मात करू शकतात. त्याच वेळी, वैज्ञानिक अभ्यासात याची पुष्टी केली गेली आहे की, जर मध आणि आले एकत्र खाल्ले तर पोटातील दुखण्याला लगेचचं आराम मिळवतो. जर रात्रीच्या वेळी आपल्याला पोटदुखी जाणवत असेल तर आपण हा उपचार प्रामुख्याने करून पहा.

आज्जीचा बटवा : फोडणीत तडतडणाऱ्या लसणाचे औषधी गुणधर्म एकदा वाचाचं

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.