भारतीय गवती चहाला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी, दुष्काळी भागातील शेतकरीही होऊ शकतो मालामालं

0

गेल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील शेतकऱ्यांंचे मन की बात कार्यक्रमातून गवती चहा लागवडीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. पीएम मोदी म्हणाले की, गवती चहा लागवड करून हे शेतकरी केवळ स्वत: चे सबलीकरण करीत नाहीत तर देशाच्या प्रगतीत प्रभावी योगदान देत आहेत. यावरून गवती चहाची शेती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

गवती चहाकडे एक औषधी वनस्पती म्हणून पाहिले जाते. त्यामुळे सध्या बाजारात गवती चहाला मोठी मागणी आहे. गवती चहा पासून निघणाऱ्या तेलाचा वापर साबण, सौंदर्यप्रसाधने आणि औषधांमध्ये केला जातो. त्यामुळे त्याला चांगली किंमत मिळते. गेल्या काही वर्षात, शेतकरी देखील गवती चहा पिकाकडे वाटचाल करीत आहेत.गवतीचहाची विशेष गोष्ट म्हणजे, दुष्काळग्रस्त भागात देखील याची लागवड करता येते.

बारमाही फायदेशीर पीक

गवती चहाची लागवड केल्यानंतर, सुमारे सहा महिन्यांत ते तयार होते. त्यानंतर, शेतकरी दर 70 ते 80 दिवसांनी त्याची कापणी करू शकतात. एका वर्षात पाच ते सहा वेळा याची कापणी केली जाऊ शकते. एकदा झाडाची लागवड झाल्यावर शेतकऱ्याला सुमारे सात वर्षे त्याच्याकडे बघावे लागत नाही. तसेच याला बाराही महिने बहर असल्याने शेतकऱ्याच्या दृष्टीने हे फायदेशीर पीक आहे.

स्वस्त आणि जास्त कमाई करून देणारे पिक

गवती चहाची लागवड फारशी महाग नाही, एक रोप केवळ 75 पैशात उपलब्ध होते. या लागवडीची सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की इतर पिकांच्या तुलनेत गवतीचहा या पिकला रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. त्याची पानंं कडू असल्याने प्राणी ते खात नाहीत त्यामुळे इतर पिकांप्रमाणे जास्त लक्ष नाही दिले तरी चालते. तसेच आयुर्वेदिक शेतीच्या स्वरूपात प्रत्येक राज्यातील बागायती मंडळ गवती चहा लागवडीसाठी वेगवेगळे अनुदान देते.

सरकारी अनुदान 

राज्य सरकार सामान्यत: गवती चहाच्या लागवडीसाठी एकरी 2000 रुपये अनुदान देते. याद्वारे, डिस्टिलेशन युनिट स्थापित करण्यासाठी 50 टक्के पर्यंतचे अनुदान स्वतंत्रपणे मिळू शकते. शेतकऱ्यांंच्या मदतीनुसार गवती चहा लागवडीसाठी नाबार्डमार्फत अनेक प्रकारची कर्जे दिली जातात.

भारत दरवर्षी सुमारे 1000 मे.टन गवती चहा तयार करतो, तर जगात त्याची मागणी खूप जास्त आहे. सध्या भारत केवळ 5 कोटी रुपयांची गवती चहा तेल निर्यात करीत आहे. भारतात या पिकाची गुणवत्ता चांगली असल्याने जगभरात यापासून निघणाऱ्या तेलाची ख्याती आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.