fbpx

हे पण लक्षात असू द्या ! घरातील एका सदस्याला कोरोना झाला म्हणून सर्वांना संसर्ग होईलचं असे नाही

0

जगात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने एक प्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात एक गोष्ट अशी घडत आहे की, घरातील एका सदस्याला कोरोना झाला तर सर्व कुटुंबचं क्वारांटाईन केले जात आहे. मात्र एका अभ्यासातून असे समोर आले की, घरातील एक जन कोरोनाबाधित असला म्हणून बाकीचे सदस्य कोरोनाबाधित असतीलचं असे नाही.

अनेकदा घरात एकाला कोरोना झाला म्हणून कुटुंब विलग केले जाते. मात्र भारतीय जनआरोग्य संस्थेच्या अभ्यासात असे म्हंटले आहे की, घरातील एका सदस्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण फारचं कमी आहे. जवळ जवळ 80 ते 90 टक्के सदस्यांना कोरोनाची लागण होऊ शकत नाही.

संसर्ग होण्याऐवजी घरातील इतर सदस्यांची त्या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढते. तर कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी ही शक्ती कामी येते. त्यामुळे सर्वजण कोरोनाच्या जाळ्यात अडकले हे मानणं चुकीचे आहे, असे संस्थेचे निर्देशक दिलीप मावलकर यांनी सांगितले.

रिपोर्टमध्ये असे म्हंटले आहे की, काही मिनिटांमध्ये कोरोना व्हायरसच्या संपर्कात आल्याने त्याची लागण होऊ शकते हे मानने देखील तितकेच चुकीचे आहे. जर असं झालं असतं तर कोरोनाबाधित कुटुंबाच्या घरातील सर्वांना कोरोनाची बाधा झाली असती. मात्र काही मोजकेच कुटुंब असे आहेत ज्यांच्या घरात सगळ्यांना बाधा झाली आहे.

कुटुंबातील एका सदस्यापासून दुसऱ्या सदस्यापर्यंत कोरोना संक्रमणाचा दर 10-15 टक्के आहे, कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली परंतु उर्वरित 80-90 टक्के सदस्यांना हा आजार झाला नाही. त्यामुळे या सदस्यांमध्ये कोरोनाशी लढण्याशी प्रतिरोधक क्षमता विकसित होत असावी असा अंदाज लावला जात आहे.

भारतीय जनआरोग्य संस्थेच्या रिपोर्टमध्ये कुटुंबातील एका सदस्यापासून दुसऱ्या सदस्याला कोरोना बाधा होण्याची शक्यता फक्त 8 टक्के आहे. तसेच घरातील अंथरुण वापरल्यामुळेही बाधा होते हा संसर्गदरही कमी आहे. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींना बाधा होण्याची शक्यता असते. त्याचे प्रमाण 15-20 टक्के आहे.

कोरोनाबरोबर आता जगायला शिकलं पाहिजे असे आता जागतिक आरोग्य संघटनेने देखील सांगितले आहे. त्यामुळे कोरोनाबाबत भीती न बाळगता सकारात्मक दृष्टी ठेवून त्यावर मात करण्यासाठी शरीरामध्ये प्रतिरोधक तयार करण्याकडे सर्वांचा कल असला पाहिजे.

सूचना : असेच आणखी लेख वाचायचे असतील तर आमच्या https://www.facebook.com/imp.amarvani/ या फेसबुक पेजला भेट द्या

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.