आज्जीचा बटवा: जाणून घ्या, धार्मिक महत्त्व असलेल्या पिंपळाचे आरोग्यादायी फायदे…

0

आज्जीच्या बटव्यामध्ये आज आम्ही तुमचा परिचय पिंपळाच्या वृक्षाबरोबर करून देणार आहोत. तुमच्या आज्जीने सुद्धा तुम्हाला पिंपळाच्या झाडाबद्दल सांगितलेले असेलचं. आधीच्या लोकांच्या म्हणण्यानुसार ” पिंपळाचे झाड पवित्र मानले जाते. ज्याच्या घरी पिंपळाचे झाड आहे त्या घरी दारिद्र्य येत नाही.” पिंपळ वृक्षाबद्दल अशाच काही धार्मिक महत्त्वाशी आम्ही तुमचा परीचय करून देणार आहोत. काळजी करू नका फक्त धार्मिकच नाही तर औषधी उपयोग देखील आम्ही सांगणार आहोत.  चला तर करूयात पिंपळ वृक्षासह थोडा परिचय….

पिंपळाला इंग्रजीमध्ये पिपल ट्री (Peepal tree), द बो ट्री (The Bo tree), बोद्ध ट्री (Bodh Tree) म्हटलं जातं. तर उर्दू मध्ये पिंपळाला पिपल आणि गुजरातीमध्ये पिपरो असं संबोधलं जातं. पंजाबी आणि नेपाळीमध्येही पिपलचं म्हणतात.

पिंपळाच्या झाडाला अतिशय पवित्र मानले जाते. असे म्हणतात की, ज्याच्या घरी पिंपळाचे झाड असेल त्या घराला दारिद्रय़ येत नाही आणि सुख-शांती तेथे वास करते. विज्ञानानेदेखील पिंपळवृक्षाचे महत्त्व विशद केले आहे.

पिंपळाच्या झाडाला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिंपळाच्या छायेत अतिशय थंडावा असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिंपळाचं मूळ हे खूप दूरवर पसरतं. अनेक जुन्या पुराण्या आयुर्वेदीक ग्रंथामध्ये पिंपळाचं झाड आणि त्याच्या पानाबद्दल अनेक गुण सांगण्यात आले आहेत.

पिंपळाच्या पानाच्या प्रयोगामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील रंगामध्ये उजळपणा अधिक प्रमाणात मिळतो. तसंत तुमच्या शरीरावर एखादी जखम झाली असेल, सूज आली असेल अथवा त्रास होत असेल तर तुम्हाला पिंपळाच्या पानाचा उपयोग करून घेता येतो.

तसंच सेक्शुअल स्टॅमिना वाढवण्यासाठीही याचा उपयोग होतो आणि गर्भधारणेसाठीदेखील याची मदत होते. पिंपळाच्या पानामुळे रक्त चांगले होते आणि त्याच्या सालीमुळे तुमचं पोटदेखील साफ राहातं. मात्र जे काही याचे आरोग्यासाठी उपयोग आहेत ते तुम्ही अनुभवी लोक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने किंवा मार्गदर्शनाने करा.

भारतात पिंपळाची पूजा करतात. पिंपळाच्या झाडाचे जितके धार्मिक महत्त्व आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. औषधी गुणधर्मांनी युक्त अशा या पिंपळाच्या झाडांचे महत्त्व जाणून घेऊया…

पोटदुखी

पिंपळाच्या २-५ पानांची पेस्ट बनवून त्यात ५० ग्रॅम गुळ घालून मिश्रण बनवा आणि या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवून दिवसातून ३-४ वेळा खा. पोटदुखीवर आराम मिळेल.

अस्थमा

पिंपळाच्या झाडाची साल आणि पिकलेल्या फळांची वेगवेगळी पावडर बनवून ती सम प्रमाणात एकत्र करा. आणि हे मिश्रण दिवसातून ३-४ वेळा खा. अस्थमा दूर होण्यास नक्कीच मदत होईल.

साप चावल्यावर

विषारी साप चावल्यावर पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस दोन थेंब घ्या आणि त्याची पाने चावून खा. त्यामुळे विषाचा असर कमी होण्यास मदत होईल.

त्वचारोग

पिंपळाची कोवळी पाने खाणे त्वचेच्या रोगांवर उपचारात्मक ठरते.

पावलांना भेगा पडणे

पिंपळाच्या पानांचा रस भेगा पडलेल्या पावलांवर लावणे, लाभदायी ठरते.

रक्ताची शुद्धता

१-२ ग्रॅम पिंपळ बीज पावडरमध्ये मध मिसळून रोज दोन वेळा घेतल्याने रक्त शुद्ध होते.

बद्धकोष्ठता

पिंपळाची ५-१० फळे रोज खाल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आराम मिळतो.

डोळ्यांचे दुखणे

पिंपळाची पाने दुधात बुडवून डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांचे दुखणे कमी होते.

दातांचे दुखणे

पिंपळ आणि वटाच्या झाडाची साल घेऊन त्याचे एकत्र मिश्रण बनवा. हे मिश्रण गरम पाण्यात उकळवून त्याने गुळण्या केल्यास दातदुखी दूर पळेल.

हे पण वाचा

आज्जीचा बटवा : जाणून घ्या, ‘इंडियन पेनीवर्ट’ म्हणजे ‘ब्राम्ही’ या औषधी वनस्पतीचे फायदे…

आज्जीचा बटवा : देवापर्यंत तुमच्या भावना पोहचवणाऱ्या कापराचे हे सुद्धा आहेत औषधी फायदे

आज्जीचा बटवा : फोडणीत तडतडणाऱ्या मोहरीचे असे आहेत औषधी गुणधर्म, वाचून व्हाल थक्क !

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.