‘अडुळसा’ म्हटल्यावर तुम्हाला कफ, खोकल्यावर गुणकारी असणारे अडुळसा टॉनिक नक्कीचं आठवले असेल. पण या औषधी वनस्पतीबद्दल तुम्हाला जास्त माहिती असणे कठीण आहे. पण काही हरकत नाही आम्ही तुम्हाला या वनस्पतीबरोबर ओळख करून देऊ. यासाठी हा लेख पूर्ण वाचा. चला तर मग करूयात थोडीशी ओळख अडुळसा औषधी वनस्पतीसोबत.
अडुळसा ही acanthaceae फॅमिलीतील सदाहरित एक झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव अॅधॅटोडा व्हॅसिका आहे. भारत, श्रीलंका, म्यानमार व मलेशिया या देशांत ती आढळते. अडुळसाची मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे औषधांत वापरली जातात.
साधारणपणे २००० वर्षांपूर्वीपासून या औषधी वनस्पतीचा उपयोग केला जात असावा, असे आयुर्वेदातील उल्लेखांवरून दिसते. अडुळसापासून आयुर्वेदीक पद्धतीने अनेक औषधे तयार केली गेली आहेत. पानांचा रस गुणकारी असतो. कफ, दमा, खोकला आणि विविध श्वसन आजारांवर अडुळसा औषध मोठ्या प्रमाणावर वापरतात. तसेच हृदयाचा आजारावरही या वनस्पतीचा उपयोग केला जातो असे म्हणतात.
औषधी वनस्पती :
- खोकला येत असून ताप येत असेल तर अडुळशाचे रसाने कमी होतो. खोकल्यावर अडुळशाचा अवलेह देतात.
- अडुळसा, ज्येष्ठमध, बेहडा, हळकुंड व साखर सारख्या प्रमाणात घेऊन मिश्रण करून ठेवावे. हे चूर्ण मोठ्यांना दोन ग्रॅम व लहान मुलांना एक ग्रॅम मधाबरोबर आठवडावर देणे. खोकला बरा होतो.
- श्वासावरील विकारात वरीलप्रमाणेच अडुळशाचा रस मध आणि पिंपळी यांचे चाटण अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे श्वास विकार बरा होण्यास मदत होते.
- रक्तपित्त म्हणजे नाकातून किंवा तोंडातून रक्त येत असल्यास अडुळसा द्यावा. 10 मि. लि. अडुळशाचा रस व तितकीच खडीसाखर घालून द्यावा, रक्त पडण्याचे कमी होते. अडुळशाच्या पानांचा डोक्यावर लेप लावला असता नाकातून वाहणारे रक्त बंद होते.
- गावात देवीची साथ आली असता ज्या मुलांस देवी आल्या नाहीत किंवा त्याची लस टोचली नाहीत, त्यास अडुळशाच्या पानांचा व ज्येष्ठमधाचा काढा रोज एक वेळ दिला असता देवी येण्याची भीती कमी होते. तो घेतल्याने देवीपासून भीती कमी रहाते.
- क्षय रोगावर औषध करताना काढ्यात अडुळशाचे एक पान व एक लहान ज्येष्ठमधाचा तुकडा सुमारे तीन ग्रॅम घालून पाव लिटर पाणी घालावे व अष्टमांश काढा करून घ्यावा. हा काढा क्षयरोगावर उत्तम समजला जातो. तेव्हा ज्या गावात अडुळशाचे झाड आहे. त्या गावात क्षयी इसमास मरणास भिण्याचे कारण नाही. क्षय झाला असता अडुळशाचा अवलेह देतात.
- अडुळसा कफनाशक आहे. अडुळशाच्या पानांच्या विड्या करून त्या ओढल्या असता छातीतील कफ पातळ होऊन दमेकरी मनुष्यास फार नीट वाटते.
- अडुळशाची पाने बारीक वाटून ती जखमेवर बांधली असता जखम भरून येते.
- अडुळसाची पाने शेकून रस काढा. डोकेदुखी होत असल्याने अडुळसाच्या पानांचा लेप करून डोक्यावर लावा. त्याने आराम मिळेल.
हे पण वाचा