आज्जीचा बटवा: जाणून घ्या, घरी सहज उपलब्ध असलेल्या बहुगुणी जिऱ्याचे आरोग्यादायी फायदे….

0

आज्जीच्या बटव्यामध्ये आपण आज जिऱ्याबद्दल माहिती घेणार आहोत. जिऱ्याबद्दल तर सगळेचं जाणून आहेत. भाजीला फोडणी देताना जास्तकरून जिऱ्याचा उपयोग होतो. जिरा आपली मैत्रीण मोहरीसह भाजीला फोडणी देताना तेलात तडतडत असतो. साधा भात खाण्यापेक्षा जिरा राईस खाणे भारतीयांच्या आवडीचे आहे. जेवणातील चव वाढवणाऱ्या जिऱ्याचे अनेक उपयोग आहेत. गृहिणी जिऱ्याचे उपयोग अनेक पदार्थांमध्ये करतात. तसेच जिऱ्याचे आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. हे तुमच्यातील क्वचितच लोकांना माहिती असेल. चला तर मग जाणून घेऊयात जिऱ्याचे आरोग्यदायी फायदे….

त्या आधी जिऱ्यासोबत थोडा अधिक परीचय करून घेऊयात…. साधारणत: जिऱ्याला जिरेगिरे किंवा जिरू म्हणतात.   इंग्रजीत याला Cumin म्हणून संबोधले जाते. याचे शास्त्रीय नाव: क्युमिनम सायमिनम आहे. हा एक प्रकारचा मसाल्याचा पदार्थ आहे.  मोहरीप्रमाणेच  जिरेसुद्धा  तेलाची  फोडणी  करण्यासाठी वापरले जातात.

जिरे हे प्रत्येक स्वयंपाक घरात सहज मिळते. जिऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर, झिंक इत्यादी भरपूर प्रमाणात असते. जिरे अन्नपदार्थांची चव वाढवते, शिवाय ते आरोग्यदायी आहे. त्याचा उपयोग औषध म्हणून केला जातो.

जिऱ्याचे फायदे कोणते जाणून घेऊयात…

  • भूक लागत नसल्यास,ओकारी होत असल्यास जिरे खाण्यास द्यावे. ओकारी थांबते, भूकही चांगली लागते.
  • अंगाला खाज सुटत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी जिरे कोमट पाण्याबरोबर खावे, खाज त्वरित थांबते.
  • लहान मुलांना बहुधा जंतचा त्रास होतो,अशा मुलांना एक ग्रम जिऱ्याची पूड, एक ग्रम वाव डिंगाची पूड व दोन ग्रम गूळ घालून गोळ्या करून दिल्या असता जंत मरतात व मुलांची प्रकती सुधारते.
  • पित्ताचा त्रास वाढून आंबट ढेकर येत असल्यास जिरे व साखर यांचे मिश्रण चघळून खावे, त्याने पित्त कमी होते.
  • जिऱ्याची पूड व सुंठ पूड मधातून खाल्ल्यास खोकला थांबतो.
  • जिऱ्यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतो, जे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास, रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतो. ज्यामुळे मासिक पाळीचा चक्रही सुरळीत राहतो.

 

  • त्वचेवर होणारे एजिंग मार्क्स कमी होण्यास मदत होते.
  • त्वचेसंदर्भातील आजार बरे होतात. एक्जिमासारख्या आजारावर जिऱ्याचा लेप लावावा.
  • अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो.
  • मधुमेहावर नियंत्रण राहते.
  • अनावश्यक चरबी शरीराबाहेर पडते.
  • हाताला घाम येत असल्यास जिरे पाण्यात उकळावे आणि ते पाणी थंड करून तहान लागल्यावर प्यावे.
  • पचनक्रिया सुधारते. पोटाचे विकारही दूर होण्यास मदत होते.
  • गॅस आणि वातावर उत्तम उपाय आहे. बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
  • शरीरातील रक्त शुद्ध होते. रक्ताची कमतरताही भरून काढते.
  • त्वचा तजेलदार होते.

(ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला अभिप्राय (Feedback) कळवा )

हे पण वाचा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.